धडपडणारी माणसे

          लहान मूल नीट चालायला लागेपर्यंत शंभरदा धडपडते. पडल्यावर रडते पुन्हा चालायचा प्रयत्न करते. एकदा स्थिरावल्यावर धडपडणे कमी होते. मोठेपणी मात्र सगळीकडे हातपाय मारत असताना धडपडत असतो. कधी यशस्वी होतो तर कधी अयशस्वी पण धडपड चालूच असते. कधी शिक्षण, नौकरी, छोकरी कधी घर, कधी पदोन्नती तर आणखी काही. याव्यतिरीक्त धडपडणारी माणसे म्हणजे अजिबात शांत बसणारी माणसे. सारखी उठबस करणार. अनाठायी धावपळ करणारी, अवती भोवती सगळ्या कामाची जबाबदारी स्व:ताची समजून त्यासाठी धडपडणारी, सगळ्या अनर्थाला स्व:तालाच जबाबदार समजणारी अशा अनेक प्रकारच्या व्यक्ती मी बघितल्या. त्या उलट सतत आपल्याच कोषात रहाणारी जग कुठे चालले आपण कुठे चाललो आहे याचा अजिबात विधीनिषेध नसणारी. काय करावे, काही समजत नाही अशी भांबावलेली माणसेपण या जगात असतात.

            विशिष्ट ध्येयासाठी धडपडणारी माणसे बघितले की कौतूक वाटते पण त्या व्यक्तिच्या धडपडीला यश आले तर बरे अन्यथा वाईट वाटते. कार्यालयात अशा अनेकांशी संपर्क येतो. काही दिवसांनी एक तर तो यशस्वी होतो किंवा त्याने धडपड सोडून दिलेली असते. मग प्रश्न पडतो. खरंच एवढ्या धडपडीची आवश्यकता होती का? आपल्या जीवापेक्षा आणि गरजेपेक्षा जास्त मिळवणे हे एकच कारण असते का? कधी थांबायचे हे यांना ठरवता येत नसेल का? अशी धडपडणारी माणसे कधी कधी इतिहास घडवतात. सगळे जग त्यांचे कौतूक करते. धडपडीचे सार्थक झाले असे वाटणारा हा क्षण प्रत्येकाच्या जीवनात यावा, हीच अपेक्षा!

 

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव