आयुष्य एक कोडे

          !! युध्दिष्ठराला यक्ष प्रश्न विचारी जेव्हा ती होती प्राचीन शब्दकोडी

            उत्तर सोपे पण प्रश्न कठीण भारी, माथा जवळ आहे पण वाट नागमोडी !!

           अशी कविता व्हॉटसअपवर आली तेव्हा मजा वाटली. लहानपणची आठवण आली. मनोरंजन, चातुर्य आणि बुध्दीमत्ता अशा अर्थाने अनेक कोडी आपण तेव्हा सोडवली असतील. मोठे झाल्यावर स्पर्धात्मक परिक्षेत काही वेळा अशा प्रकारचे प्रश्न असतात. तेव्हा आपण अभ्यास करतो आणि कालांतराने विसरून जातो. गेट-टुगेदर, पिकनिक जेव्हा इतर मनोरंजनाची साधने उपलब्ध नव्हती तेव्हा या कोड्यांचे भरपूर देवाणघेवाण होत होती. एकाला कळले की, दुस-याला सांगण्याची भारी हौस असे.

           काही जण पुर्वी मुद्दाम शब्द कोडे सोडविण्यासाठी म्हणून पेपर विकत घेत असत. त्यावेळी मला कोडी सोडविण्यात विनाकारण वेळ घालवतात याचा राग यायचा. शब्द सामर्थ्य वाढते, विरंगूळा आणि डोक्याला चालना असे समर्थन करायचे. त्यावेळी मला वाटायचे आयुष्याचे कोडे अजून सुटले नाही. तर या शाब्दिक किंवा आकड्यांमध्ये का गुंतून रहायचे? जे अशी कोडी तयार करतात त्यांचे नक्कीच कौतूक वाटते. मर्यादित कालावधीसाठी किंवा जेव्हा काहीच सुचेनासे होते तेव्हा मेंदूला तरतरी येण्यासाठी थोडावेळ ठीक आहे. अन्यथा त्याचे व्यसन लागून वेळेचा अपव्यय होतो.

           आयुष्य हे एक कोडे आहे म्हणून तर जगण्यात मजा आहे. माणसे अशी का वागतात? परिस्थितीमूळे माणूस राजाचा रंक होतो आणि या उलट रंकाचा राजा होतो. अशी अनेक कोडी माणसाला विचार करायला भाग पाडतात. 99% प्रयत्न केल्यावर सुध्दा दैवाचा 1% सगळ्यांना मिळतो असे नाही. सर्वतोपरी प्रयत्न करून सुध्द्दा काही जण यशस्वी होतात तर काही जण नाही. कुठेतरी अनिश्चितता, संभ्रम आणि कुतूहल शिल्लक ठेवले आहे म्हणून तर जगण्याची गोडी आणि प्रगती करण्यासाठी माणुस उत्सूक असतो. योग्य प्रयत्न करण्यात खरी मजा असते. जीवात जीव असेपर्यंत माणूस प्रयत्नशील असतो. अन्यथा त्याने कोडे सोडविण्याचा प्रयत्न केला नसता तर जिंकणे किंवा हरणे याची मजाही चाखता आली नसती.

 

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव