मनी नाही भाव आणि “वडा”(देवा) मला पाव
“मनी नाही भाव आणि वडा मला पाव” असा संत गाडगे महाराजांचा अभंग आपल्या अंधविश्वासावर मार्मीक टिका करतो. असेही आपण ब-याच गोष्टींचे अंधानुकरण करत असतो त्यातली ही एक “वट पोर्णिमा” ज्यामूळे मूळ उद्देश बाजूला राहून नुसता दिखावा ठरतो. हल्ली सामाजिक माध्यमे तर यासाठी एक चावडी ठरली आहे. वेगवेगळे मिम्स, फोटो, रांगोळी, जिंगल्स, चॅट्स असे सगळे जण आपआपले हात धूवून घेतात. त्यात हा विषय जिव्हाळ्याचा समजून पुरूष सुध्दा हिरहिरीने भाग घेतात याचे नवल वाटते. खरं तर वटपुजा करावी किंवा करु नये, केली तर कशी करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. केली तर अगदी साग्रसंगीत नाहीतर उगीच सात जन्म कशाला अडकवा असे म्हणून सोईस्कर रित्या दुर्लक्ष करणारे आहेत. पुरूषही तेवढीच आपली सुटका झाली म्हणून खूष असतात.
मी आणि माझ्या आधीच्या पिढीने सर्व
काही मनापासून आता पर्यंत केले. वातावरणही तसे पोषक होते. वडाची फांदी आणून पुजा करणे
हा प्रकार पटत नाही. काही जण फोटोची पुजा करू लागले तर काही जण सार्वजनिक ठिकाणी वडाच्या
झाडाची पुजा करतात. असे अनेक प्रकार अस्तित्वात येऊ लागले.
नुकतेच आपण “कोविड” महामारीतून बाहेर
पडत आहोत. धोका पूर्णपणे टळलेला नसताना खरंतर
सण उत्सव साजरे करणे चुकीचे असे वाटते. मनाला पटत नाही म्हणून छोटीशी, घरगूती देवाकडे
नव-यासाठी दिर्घायुष्य मागितले की झाले, त्यासाठी एवढा दिखावा कशाला? पुर्वीच्या काळी
हे सर्व आवश्यक होते कारण एकाच जन्मात 7 दशके तरी नवरा जिवंत रहावा त्यासाठी आपल्या
पुर्वजांनी “पती हाच देव” मानणा-या स्त्रियांसाठी सांगितलेला वस्तूपाठ होता. त्यानिमित्याने
स्त्रिया घराबाहेर नैसर्गिक वातावरणात नव-यासाठी आणि पर्यायाने स्वत:साठी एक दिवस राखिव
ठेवला जायचा. दुसरा हेतू वृक्ष संवर्धन ही तेव्हाही गरज होती आणि आताही आहे.
आता मात्र कोविड कालावधीत बाहेर पडणे
शक्य नाही. नवरा-बायकोच्या भूमिका बदलेल्या आहेत. पती हा देव या ऐवजी सखा, सोबती, मार्गदर्शक
अशी भूमिका बदललेली आहे. वयाचा मुद्दा तर गौण ठरलेला आहे. जर आपण झाडे लावत नाही तर
झाडे तोडायचा काय अधिकार? नव-याबद्द्ल जर चांगल्या इच्छा नसतील तर उगीच जबरदस्तीचा
रामराम कशाला? पुरुषही हल्ली सुधारित मताचे असल्याने ते ही असे काही मानत नाही. स्त्रियांना
सुध्दा करीयर, नौकरी यातून वेळ कुठे असतो? तेव्हा माझ्या मते नव-याला झाड समजून त्याच्या
भोवती एक प्रदक्षिणा घालून लग्नात दिलेल्या वचनांची आठवण करून दिल्यास किंवा आताच्या
भाषेत परवाना नुतनीकरण केल्याचे समाधान मिळेल आणि परंपरा सांभाळल्याचे समाधान मिळून,
एकमेकांना बांधिल रहातील. तुम्हाला काय वाटते?
छान लेख
ReplyDelete