कृत्रिम बुध्दीमत्ता (Artificial Intellingence)
“कृत्रिम बुध्दीमत्ता” म्हणजे काय रे भाऊ? एवढे दिवस आपला असा समज होता की, बुध्दीमत्ता ही दैवी देणगी आहे. ती सगळ्याना कमी अधिक प्रमाणात असते. याच बुध्दीमत्तेमूळे माणूस चंद्रावर पोहचला. कृत्रिम उपग्रह प्लुटोच्या पुढे गेली. जगाच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडण्याचे प्रयत्न चालू आहेत. वेगवेगळे क्रांतीकारी शोध, रोगांवर नियंत्रण आणि सुखसोयी यांच्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मग कृत्रिम बुध्दीमत्ता हे काय प्रकरण आहे?
कॉलेजमध्ये असताना सांख्यिकी शास्त्र
(Statstical Science) हा एक विषय होता. ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील आकडेवारी
आणि नित्कर्ष यांची सांगड कशी घालायची हे शिकवले जायचे. तेव्हा हे सगळे प्रत्यक्ष संपर्क,
सर्वेक्षण, माहिती जमा करणे, विश्लेषण आणि अनुमान हे वैयक्तिकरीत्या केले जात
होते. नंतर उपग्रह, रोबोट, वेगवेगळ्या संस्था, फेसबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड,
टेलिफोन किंवा मोबाईल कंपन्या यांची मदत घेऊन माहिती व तंत्रज्ञान या गोंडस
नावाखाली केले जायचे. तुम्ही म्हणाल यात चुक काय? एखादा माहितीचा स्त्रोत मिळाल्यावर
त्याचा आपल्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घ्यायचा यासाठी विशेष तंत्रज्ञ नेमले
जातात मग ती माहिती वेगवेगळ्या निकषांवर पडताळून पाहिली जाते. त्यातून येणारे
अनुमान मांडून त्याचा कसा वापर करायचा हे ठरविले जाते. यात कधी कधी गैरवापर होण्याची
शक्यता असते. यात लागणारी बुध्दीमत्ता मानवीच असते. काही जण FB वर कोणती माहिती टाकायला
घाबरत असतात कारण ही अशी सामाजिक माध्यमे माहितीचे स्त्रोत असून प्रत्येक कृती
याद्वारे नोंदीत केली जाते आणि त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरीही आपण महत्व देतो ते माहिती व
तंत्रज्ञानाला! आपली कोणतीही वैयक्तिक
माहिती कुणाला न देणे, पासवर्ड दुस-याला मिळणार नाही याची खबरदारी घेणे. कोणतेही
ऑनलाईन व्यवहार जपून करणे हे अत्यंत महत्वाचे ठरते. सायबर गुन्ह्यांची होणारी
वाढती संख्या विचारात घेता माहितीचा पुर नियंत्रणात ठेवणे गरजेचे झाले आहे.
प्रत्येक कंपनीची, शासनाची, संस्थेची काही माहिती राखीव ठेवली पाहिजे ज्यावर
कोणाला कब्जा करता कामा नये. त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य
ठरते. कोणताही व्यवहार बिनचेह-याचा (Faceless), पारदर्शक,नि:पक्षपातीपणे करावेत या
हेतूने कृत्रिम बुध्दीमत्तेचा (Artificial Intellingence) वापर केला जातो विशेषत:
आर्थिक व्यवहार, संरक्षण किंवा देशहिताशी संबधित व्यवहार.
प्रामाणिकपणा आणि कर्तव्याप्रती बांधिलकी हे
प्रत्येक कर्मचा-यापुढेही आव्हान ठरते. एका कंपनीची, देशाची कुटूंबाची माहिती नको
त्या हातात पडली तर किती अनर्थ होवू शकेल याची कल्पना करता येणार नाही. आधुनिक तंत्रज्ञान जसे सोईचे आहे तसे गैरव्यवहार
होऊ शकतात याकडे गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. किंबहूना त्यासाठी प्राधान्यतत्वावर
नियमावली किंवा एसओपी (Standard Operating Procedure) तयार करणे महत्वाचे ठरते.
तसेच या माहिती संवर्धनाचा उपयोग योग्य कारणासाठी केल्यास त्याचे दिर्घकालीन फायदे
आपल्या देशाला होतील. तसे आपण करू शकतो का?
कसे करता येईल आणि त्याचा उपयोग देशाची प्रगती व विकासासाठी कसा होऊ शकेल याचा
विचार झाला पाहिजे.
विज्ञान हे गृहितकांवर व निष्कर्षांवर आधारित असते. त्यामूळे निरीक्षण आणि संशोधनासाठी माहिती उपलब्ध करून देणे हे ही महत्वाचे असते. अशी कृत्रिम बुध्दीमत्ता (Artificial Intellingence) म्हटले तर वरदान नाहीतर शाप ठरू शकेल याचे भान राखले पाहिजे. नैसर्गिक साधनांना पर्याय म्हणून वापरण्यात मुळीच हरकत नाही. त्यासाठी काही ठिकाणी वेगळ्या शाखा कार्यरत असतात. याद्वारे व्यवसायवृध्दी, शासन निर्णय घेतले जाऊ शकतात, ज्याद्वारे निर्णयक्षमता वाढीस लागून वेगवेगळे उपाययोजना आखल्या जावू शकतात.

Comments
Post a Comment