अंधारबनाची पावसाळी भटकंती
पावसाळा आला की दरवर्षी आमच्याकडे मी सोडून सगळ्यांना पावसाळी भटकंतीचे (Treaking) वेध लागतात. असेच एकदा जुलै 2017 मध्ये नेटवर बघून पिंपरी, पुणे येथील एका संस्थेमार्फत “अंधारबन भटकंती”ठरली. आम्ही दोघे, आमच्या 2 मुली आणि भावाची 2 मुले असे एकूण कुटूंबातील 6 जण जायचे ठरले. त्याआधी कर्नाळा, पेठ, माथेरान, महाबळेश्वर पावसात झालेले होते. त्यामूळे पावसाचे विशेष असे वाटत नव्हते. जाताना पाऊस नव्हता त्यामूळे दादरहून रात्री 12 वाजता एकूण 15-16 जण एका मीनी बसमधून निघालो. रात्री 2 वाजता एके ठिकाणी घरगूती जागेत थांबून थोडीशी विश्रांती घेतली. स्त्रिया, मुले व पुरुष सगळे एकत्र असे 2 खोल्यांत झोपलो. जेमतेम 2-3 तास झोप लागली आणि सकाळी 7 वाजता न्याहरी करून ताजेतवाने होऊन चालायला सुरूवात केली. गट नायकाने सांगितल्यानुसार रेनकोट, टोपी, सुके खाणे आणि बिस्कीटे सोबत घेतली होती. चालणे उत्साहात सूरू झाले. मला चालायचा थोडा कंटाळा परंतू निसर्ग आणि सोबत मुले आणि मूली यांच्या हसत खिदळण्यामूळे चालणे मजेशीर होत होते. कॉलेजची मूले-मूली होती. निसर्गरम्य परिसर आणि अनवट वाट असल्यामूळे प्रवास आल्हाददायक होता. आधी सुरवातीस मजा वाटली. जसे जसे उंच चढायला लागलो आणि मोठा पाऊस सुरु झाला. झुळझुळ वहाणा-या नदीला अचानक मोठे पाणी जे ओलांडून आम्हाला पलीकडे जायचे होते ते पात्र मोठे होत होते. सगळ्यांनी एक साखळी तयार केली तरी पैलतीरावर जायला छोट्या दोरी शिवाय अन्य साधने उपलब्ध नव्हती. एक-एक जण दोरीला धरून जीव मुठीत घेऊन पलीकडे जावू लागला. एक मुलगी तर हात सुटून ब-याच अंतरापर्यंत वहात गेली. पुढे गेल्यावर नशीबाने तीला थोडा आधार मिळाला व मुलांनी तेवढ्या वेळेत जिवावर उदार होऊन तिला धरले आणि सुखरुप कडेला आणले. माझा पाय निसटला आणि मी पाण्यात पडले आणि मला वाटले आता सर्व संपले.( आईचे शब्द आठवले “पाण्यापासून जप”) मला पण एकाने आधार देऊन व्यवस्थित पुढे आणले. परतीचा प्रवास तसा अवघड होता. नशीब कोणी प्राणि-पक्षी भेटले नाहीत. नंतर एके ठिकाणी 2 वाजता जेवणासाठी लहान गावात थांबलो. तिथल्या स्थानिकांना भाजी-भाकरीची ऑर्डर दिलेले होती तिथे थांबून थोडा आराम करून परतीचा प्रवास सूरू झाला.
उतरताना मात्र प्रत्येक ठिकाणी
घसरगूंडी करत एकदाचे परतीच्या गाडीच्या प्रतिक्षेत थांबलो तर ड्रायव्हर बराच वेळ
गायब. एक तास झाला तरी पत्ताच नाही. 8 तास
चालून माझे व इतरांचे हाल झालेले होते. त्यात ब-याच जणांचे मोबाईल पाणी जाऊन बंद
पडले. कोण थकून गलीतगात्र झाले तर कुणी एकदम गळून गेले असे अनेक प्रकार झाले. नंतर
एकदाचा ड्रायव्हर आला आणि आम्ही सगळ्यांनी अक्षरश: स्वता:ला गाडीत झोकून दिले. एक
शब्दही न बोलता एक एक जण उतरून शेवटी आम्ही दादरला पोहोचलो. या पावसाळी
भ्रमंतीच्या निमित्त्याने मी निसर्गाच्या सहवासात 7-8 तास सलग चालू शकते हा
साक्षात्कार झाला हेही नसे थोडके. अशी ही
भ्रमंती निसर्गाजवळ जाण्यासाठी आणि मानसिक आणि शारिरीक क्षमता तपासून पहाण्याचा एक
चांगला छंद असून ज्यांमूळे आपण निसर्गाकडून ऊर्जा प्राप्त करून घेऊ शकतो. त्यासाठी
खालील सुरक्षितेबाबतच्या टिपा लक्षात ठेवाव्यात.
·
संपूर्ण स्लीव्ह कपडे घालणे आणि छत्री घेऊन
जाणे चांगले.
·
आपल्याबरोबर कागदाचे टॉवेल्स आणि लहान
टॉवेल्सदेखील ठेवा.
·
सॅन्डविचसारखे हलके स्नॅक पॅक करा आणि चॉकलेट
व बिस्कीट ठेवा.
·
टॉर्च आणि छोटा चाकू सोबत घ्या.
·
पेन किलर स्प्रे किंवा आयोडीन सोबत असलेले
बरे.
·
बॅकसॅक घ्या आणि टिकाऊ आणि उच्च
दर्जाचे ट्रेकिंग बूट घाला, विशेषत: वॉटर प्रूफ वाले जसे की आपण प्रवाह
आणि धबधब्यातून जात असाल.
·
पॉवर बँक आणि पर्याप्त
पाणी सोबत घ्या.
·
तुम्ही रात्रीसाठी तळ ठोकला असेल तर डास प्रतिबंधक सोबत ठेवा.
·
कचरा टाकू नका आणि जोरात
संगीत वाजवू नका किंवा एखादी गडबड होऊ देऊ नका जे स्थानिक लोकांच्या नित्यकर्मात
अडथळा आणू शकेल.
·
ट्रेकपूर्वी तुम्ही प्रकृती ठीक असल्याची
खात्री करा आणि जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराचा त्रास असेल तर
प्रयत्न करु नका.
·
मोठी
उतरंड, खडी
खडक आणि दगडांवर काळजीपूर्वक पाय ठेवा.

Re-lived the entire experience again.
ReplyDeleteआपण असे काहीतरी पुन्हा अनुसूचित केले पाहिजे. (यावेळी काहीतरी सोपे )
You mean to say planned?
ReplyDeleteआखण्याची आवश्यकता आहे!
धन्यवाद!👍