खलील जिब्रान आणि आपण

 

            ब-याच वर्षांनी “वाचन समाधी” का काय ती काल लागली.  निमित्त होते “खलील जिब्रानचे उत्कृष्ट कथा” हे पुस्तक.  खलील जिब्रानच्या काही उत्कृष्ट लेखांचे स्मिता लिमये यांनी मराठीत अनुवादीत केलेले “खलील जिब्रानचे उत्कृष्ट कथा” हे पुस्तक.  ब-याच वर्षानी हे पुस्तक वेगळ्या स्वरूपात वाचायला मिळाले.  कॉलेजमध्ये असताना कधीतरी हा लेखक वाचनात आला होता.

         “खलील जिब्रानचे उत्कृष्ट कथा” या पुस्तकातील संदेशयुक्त विचार वाचनीय आणि लक्षपुर्वक अंमलात आणल्यास आयुष्यात येणा-या ब-याच शंकाचे निरसन होईल.  यासाठी खाली काही विचार देत आहे.

1) तुमची सर्वात सुंदर वस्त्रे  कुणा दुस-याच व्यक्तींनी विणलेली आहेत.  तुमच्यासाठी स्वादिष्ट भोजन जे दुस-यांच्या स्वयंपाकघरात खाल्ले जाते.

2)  तुमचे सुखदायक अंथरूण ज्यावर तुम्ही दुस-या कोणाच्या घरात झोपलेले आहात. तर मग तुम्हीच सांगा तुम्ही स्वत:ला त्या दुस-या माणसापासून कसे काय अलग करू शकता?

3)  तुम्ही आपल्या भुकेपेक्षा जास्त खाऊ शकत नाही म्हणून अर्धी भाकरी तुम्ही खाल्ली आहे ती कुणा दुस-याचा वाटा आहे आणि हो तुम्हाला थोडी भाकरी अकस्मात येणा-या पाहुण्यासाठी राखून ठेवायला हवी.

4)  जर तुमच्या हृदयात ज्वालामूखी धगधगतो आहे तर आपल्या हातात फूल उमलण्याची आशा तुम्ही कशी काय करता?

5)  जीवन एक दिर्घ यात्रा आहे. मंदगतीचे लोक तिला वेगवान समजून त्यातून वेगळे निघून जातात आणि वेगाने चालणारे पण तीला अत्यंत मंदगतीचे समजून त्यातून निघून जातात.

     कथा:-  मोती    

             एका शिंपलीने दुस-या शिंपलीला म्हटले, “माझ्या पोटात वेदना होत आहेत, खुप जोराच्या वेदना ! अगदी जड आणि गोळा आल्यासारख्या ! मला खुपच दु:ख होतय”. दुस-या शिंपलीने मोठ्या घमेंडीत म्हटले “परमेश्वराचे आभार ! मला तर आतून बाहेरून चांगले वाटतेय. त्याचवेळी एक खेकडा, जो जवळून जात होता आणि ज्याने दोघींचे बोलणे ऐकले होते तो म्हणाला, “तू आतून बाहेरून ठिकठाक आहेस, पण जे दु:ख तुझ्या शेजारणीला होते आहे, ते एका अनमोल मोत्यांमूळे होतंय”.

         खलील जिब्रान दांभिकतेच्या पुर्ण विरोधात होता. त्यांनी आपल्या कथांमधून दांभिकतेला आव्हान तर दिलेच पण आपल्या अंतर्मनाला विचार करायला भाग पाडले. वयाच्या 15व्या वर्षी त्याने “The Prophet” काढलेले पुस्तक ही एक जगातील सर्वश्रेष्ठ कलाकृती मानली जाते.  तो एकाच वेळी कवी, चित्रकार, विचारवंत होता. वयाच्या 48 वर्षी जगाचा निरोप घेणारा खलील जिब्रान जगाला जीवनाचे तत्वज्ञान 19व्या शतकात शिकवतो, जे आजच्या युगातही मार्गदर्शक ठरते. त्याने स्वता: अनेक कष्ट सहन करून सुध्दा प्रत्येक संदेश असा दिला ज्यामूळे संपूर्ण मानवजात सुख, चैन आणि आरामाचे जीवन जगण्यालायक ठरू शकेल. विशेष म्हणजे कमीत कमी शब्दात ज्याला आपण हल्ली “अलक कथा” म्हणतो हे त्यावेळी लिहील्या गेल्या होत्या. ज्यामधून जीवनाचे समग्र दर्शन तर घडते परंतू  त्याच वेळी कटू सत्य स्विकारण्याचे धैर्य लाभते.

          आपल्याकडे सुध्दा ज्ञानेश्वरांसारखी संतपरंपरा, धर्मग्रंथ, रीती-रिवाज या सगळ्या तत्वज्ञानावर आधारित असून त्याचे पालन केल्यास एक समृध्द आयुष्य जगण्यास एसओपी (System Operting Process) ठरू शकते. आपले दुर्देव हे की आपल्याकडे तत्वज्ञान, अध्यात्म हा विषय काढला की लोकांच्या कपाळावर आठ्या उमटतात. न्यायालयात केवळ शपथ घेण्यापुरतेच गीतेचा वापर होतो. एरवी ना आपण वाचतो, ना कधी त्यातील उपदेशांचा विचार करतो. तेच इतर लोक कुराण, बायबल आणि ग्रंथसाहिबांचे वाचन नियमित करतात, त्यामूळे त्यांच्यावर नेहमी त्यात असलेल्या वचनांचा पगडा बसतो. आपण मात्र हे म्हातारपणात करू किंवा आपले काम नाही, वेळ नाही या सबबीखाली आणि धर्माचा अभ्यास करणे आपल्याला कमीपणा वाटतो.

           वास्तविक काही प्राथमिक तत्वांचा अभ्यास लहानपणापासून मनावर बिंबवल्यास आणि त्यांची अमंलबजावणी केल्यास सुखी आणि आनंददायी आयुष्य आपण जगू शकतो. मधून मधून मोठ्यांनीसुध्दा ज्ञानेश्वरी, दासबोध, गीतारहस्य यांचे वाचन करणे आवश्यक आहे. आताच्या धकाधकीच्या जीवनात अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे या तत्वज्ञानरुपी ग्रंथात आणि संदेशात मिळू शकतात.  मनाची स्वच्छता होते आणि नैराश्य टाळणे हे सुध्दा शक्य होईल. त्याबरोबरच मन:शांती आणि समाधान मिळू शकेल.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव