मानवी मनोगुणांचा शोध घेणा-या कथा (Chicken Soup for the Soul)
साधारण 8-10 वर्षापूर्वी मला “Chicken Soup for the Soul” या पुस्तक वाचनाचे वेड लागले ते अजूनही कायम आहे. कितीतरी जणांना बक्षीस, भेटवस्तू म्हणून देण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग झाला. त्या पुस्तकातल्या छोट्या छोट्या गोष्टी मुलींना वाचून दाखवयाला ब-या पडल्या. त्यानंतर 2-3 वर्षांपूर्वी जेव्हा मी फेसबुकवर कार्यरत झाले तेव्हा सर्व प्रथम “Chicken Soup for the Soul” या प्रकाशनातर्फे छापणा-या चित्रांसकट सुविचार मी शेअर करु लागले. तेव्हा बहिणींची आणि मैत्रीणींची उत्सुकता चाळवली गेली. एवढे काय तू शेअर करतेस? थोड्याच दिवसात फेसबुकवरून तुला बोलावून सत्कार करण्यात येईल - इति नवरा. अशी अस्मादिकांनी चेष्टा करून झाली म्हणून आज याच विषयावर हा लेखन प्रपंच.
आपला
सर्वसाधारण गैरसमज असा असतो की, भारतीय तेवढे प्रेमळ, भावनाशील, दयावान वगैरे
मात्र या पुस्तकात परदेशातील मुले स्त्रिया, पुरूष, शिक्षक, विद्यार्थी, आई व मुले
व पिता यांचे एकमेकातील जिव्हाळ्याचे संबध, भावनिक संघर्ष आणि त्यातून निघालेले
किंवा काढलेले जीवनाचे सार जे अंतरात्म्याला सुखावते किंवा प्रगल्भ करते. असे अनेक
अनुभव अनेक लेखकांनी लघुकथा स्वरूपात या पुस्तकात प्रस्तूत केलेले आहेत. त्यात
अनेक नात्यांवर वेगवेगळे भाग असे 10-15 तरी पुस्तके मी वाचलेली आहेत. अजून किती वाचायचे
राहिलेत हे माहित नाही. ग्रंथालयात कायम अनुपलब्धच असते, यावरून या पुस्तकाची किती
मागणी आहे हे लक्षात येईल. हे पुस्तक मराठीत भाषांतरीत केलेले आहे.
या पुस्तकात
अनेक मान्यवर लेखकांच्या लघूकथा असतात. प्रत्येक कथेचा गाभा हा एकमेकांतील
जिव्हाळ्याचे संबध, भावनिक संर्घष आणि त्यातून निघालेले किंवा काढलेले जीवनाचे सार
यावर आधारित असतो. फेसबुकवर पण हयाच लेखकांचे विचार चित्रासहीत सुविचार म्हणून
प्रसृत केले जातात. एकूणच मला ही संकल्पना खूप आवडली म्हणून मी सगळ्यांना शेअर
करते तर काय बिघडले? माझ्या रडारवर एकूण 20 जणे आहेत, त्यातले 2 जण जरी वाचून खुष
झाले तरी मला समाधान वाटेल. फेसबुकवर लाईक
दिले की कळते तरी. Whatsup वर मात्र वाचून
न वाचल्यासारखे करतात हे बघून मला आश्चर्य वाटते. खरंच ते वाचत नाहीत की वाचूनही
त्यांना कमेंटस करावसे वाटत नाही ते देव जाणे. दुर्लक्ष करणे एवढेच आपण करू शकतो.
आहारातील
“सुप” या बद्दल थोडेसे. आजारी माणसाला पिण्यासाठी सुप शक्तीवर्धक, रेचक, सोपा,
स्वस्त आणि मस्त असा पातळ पदार्थ. त्यात शाकाहारी व मासांहारी असे दोन प्रकार
असतात. मला मात्र टॉमेटो आणि सर्व भाज्या यांव्यतिरीक्त कोणतेही अन्य सुप आवडत
नाही. वाचताना मात्र “चिकन सुप” चालते-इति कन्या. चिकन सुप आत्म्यालापण खुष करते म्हणून
या शिर्षकाची ही जन्मकथा असावी. या कथामधून छोट्या छोट्या गोष्टीतून आपण इतरांना
कसे मदत करू शकतो,त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो आणि जीवनातल्या अवघड परिस्थीतीवर मात
करू शकतो हे लिहीलेले आहे. वेगगेगळ्या नात्यांमधला संघर्ष आणि वागणूकीतून मिळणारी
कलाटणी, एकमेकांसाठी नाती जपणे किती महत्वाचे हे सोदाहरण पटवून देण्यात आलेले आहे.
स्वार्थासाठी आपण अनेक गोष्टी करत असतो पण एकदा नि:स्वार्थ बुध्दीने वागून बघा.
असे अनेक संदेश या कथांमधून आपल्याला मिळतात आणि आपण अजून जास्त प्रगल्भ बनत जातो.
खूप काही अलंकार, उत्प्रेक्षा किंवा जड भाषा नसून सहज, सोप्या आणि हलक्या फुलक्या
रितीने जीवन जगण्याचे सार कशात आहे हे आपल्याला या कथा शिकवतात. अशा या “छोटा पॅक
आणि बडा धमाका” स्वरुप पुस्तकाने मला विलक्षण अंतर्मूख केले. तुम्हालाही हे पुस्तक
वाचायला आवडेल आणि तसे वागण्याचा प्रयत्न एकाने जरी केला तरी माझ्या लिखाणाचा
उद्देश सफल झाला असे मला वाटेल. “चिकन सूप फॉर द सोल” हे पुस्तक सर्वत्र आणि ॲमेझोनवरपण
उपलब्ध आहे.

छान कथा
ReplyDeleteDhanyawad 🙏
Deleteहे पुस्तक संग्रहात आहे. अप्रतिम पुस्तक आहे.
ReplyDeleteतशीच या पुस्तकाची कठीण काळासाठी, दाम्पत्यासाठी, काम करणार्यांसाठी अशी संस्करणेही आहे.
आपण छान लिहिले आहे. असेच लिहित राहा. शेअर करत राहा.
Dhanyawad 🙏
DeleteDhanyawad 🙏
Delete