कार्यसंस्कृती (Work Culture)
कार्यसंस्कृती म्हणजे रे काय भाऊ? ( Work Culture) म्हटले की पटकन समजते. जशी प्रत्येक देशाची, कर्मचा-याची, संस्थेची, कंपनीची काम करण्याची कालांतराने एक पध्दत तयार होते तिला कार्यपध्दती म्हटले जाते. Standard Operating Procedure (SOP) किंवा Line of Action असे अनेक पर्यायी शब्द सांगता येतील. प्रत्येक कामाला एक शिस्त, वळण आणि ते काम करणा-या व्यक्तीचा ठसा त्या कामावर उमटलेला असतो. हळूहळू ते काम त्या व्यक्तीची ओळख बनून जाते. काहीजण पटापट काम हातावेगळे करून मोकळे होतात. काहीजण जो पर्यंत कोणी सांगत नाहीत तोपर्यंत आराम करतात तर काहीजण इतरांची कामे स्वता:ची समजून उरकून टाकतात. काहीजण कामामध्ये शॉर्टकट मारुन लवकर कसे संपेल याचा विचार करतात तर काही जण सगळी कामे स्वता: केली तर चांगली होतात या विश्वासाने दुस-यांना सांगत नाहीत तर दुस-यांशी गोड बोलून काम हसत खेळत पार पाडून स्वत:च मोठेपणा घेणारे पण महाभाग असतात.
कार्यक्रम
आखणे, कृतीत आणणे आणि त्याची अंमलबजावणी करणे असा तिहेरी कार्यक्रम म्हणजे
कार्यसंस्कृती असे म्हणता येईल. सर्वसाधारणपणे कार्यालयात वरिष्ठ पातळीवर निर्णय
घेऊन त्याची अमंलबजावणी कशी करता येईल यासाठी कृती आराखडा आखला जातो. त्याला छेद देण्याचे धाडस कुणी सहसा करीत नाही.
हाच नियम देशाला व व्यक्तीलासुध्दा लागू होतो. घरगूती कार्यक्रमसुध्दा याच
पध्दतीने आखले जातात. इथेही सहसा विरोध होत नाही. काही वेळा नाईलाज म्हणून किंवा
काळाची गरज ओळखून यात लवचिकता ठेवावी लागते. तशी ती ठेवली तरच स्वागतार्ह ठरते. अन्यथा कंटाळवाणे, एकसूरी किंवा नित्यकर्म होऊन
रहाते. त्यासाठी दुराग्रह स्वत:चाच हेका चालवणे, अरेरावी एखाद्या कार्यक्रमात
अडथळा आणू शकते किंवा त्या व्यक्तीबद्दल, संस्थेबद्दल किंवा वरिष्ठांबद्दल अनास्था
निर्माण करू शकते. परिणामी लोक सहभाग अपेक्षित असतो किंवा साहचार्य अपेक्षित असते
ते हळूहळू कमी होत जाते. लोक मनाने लांब
जातात व शेवटी कोण वारस? हा प्रश्न निर्माण होतो.
हे
टाळण्यासाठी नवनवीन प्रयोग, नविन संकल्पना, इतरांचा सक्रिय सहभाग व त्यांच्या
मतांचा आदर लक्षात घेऊन त्यानुसार लवचिक
धोरण राबविणे कधीही श्रेयस्कर ठरते. व्यवस्थित प्रशिक्षण, दुरदृष्टी आणि गरज यांचा
सुयोग्य ताळमेळ घातल्यास ही कार्यसंस्कृती आपलीशी वाटण्यास मुळीच हरकत नसावी. सहकारी चळवळ, लोकशाही आणि पारदर्शकता स्विकारणे
हाच स्वराज्य मिळविण्याचा अंतस्थ हेतू होता. आपण त्याचा किती जागरुकतेने विचार करतो आणि
वागतो हे आपल्यावर अवलंबून आहे.
तुम्हीही
तुमच्या घरात ही कार्यसंस्कृती अंगी बाळगू शकता का? जेणेकरून एकाच व्यक्तीवर
अन्याय न होता सगळ्यांचा सहभाग आणि विकास होण्यास मदत होईल. एकखांबी
नेतृत्वापेक्षा अनेक खांबी आधारस्तंभ घर
टिकण्यास/संस्कृती टिकण्यास मदत होईल. त्यातही
परस्पर सामंजस्य, सहकार्य आणि जाणीव असणे अपेक्षित असते. दिर्घकालीन फायद्यासाठी
आता थोडा वाईटपणा घेणे सोईचे नाही का?
बघा पटते का तुम्हाला!
बाय द वे, लिंबू, मोसंबी, संत्री उभे की आडवे कापायचे? की सोलायचे? तुम्ही ठरवा.
Comments
Post a Comment