जल- एक संजीवनी
पृथ्वीवरील पाण्याचे एकूण प्रमाण 1.386 अब्ज किमी³ (333 दशलक्ष घनमीटर) आहे, त्यात 97.5% मीठ पाणी आणि 2.5% ताजे पाणी आहे. या गोड्या पाण्यापैकी केवळ 0.3% पृष्ठभागावर द्रव स्वरूपात उपलब्ध आहे. आपल्या भारतीय परंपरेत पाण्याला अन्यनसाधारण महत्व आहे. जीव जगण्यासाठी हवा आणि पाणी लागते नाहीतर पाण्यावाचून तडफडणारे अनेक सजीव आपण बघतो.
पाण्याचे रुपांतर तीर्थात आणि तिर्थाचे रुपांतर औषधांमध्ये करणे एवढे सामर्थ्य पाण्यात आहे. वरील मंत्र म्हणून पळीभर पाणी पिले तर अकाली येणारा मृत्यू टळतो, व्याधींचे निवारण होते. अन्नपचन, शिजवणे, पिकविणे, नासविणे व धुवून स्वच्छ करणे, गाळ खाली बसणे इ. अनेक प्रक्रिया पाण्याद्वारे शक्य होतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किमान 2 ते 3 लिटर पाणी आपण आपल्याही नकळत वेगवेगळ्या स्वरुपात पीत असतो. आदी मानवापासून माणूस शक्यतो पाण्याजवळ रहाणे पसंत करतो. निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मदत करीतच असतो. आपण पाण्याचा अपव्यय न करता जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेतला पाहिजे.
आपल्या शरीरात
आणि पृथ्वी भोवती 2/3 पाणीच आहे. पाण्याशिवाय
जीवसृष्टी टिकू शकत नाही. आणखी 25 वर्षांनी पाण्यावरून युध्दे होतील असे भाकित
सांगण्यात येते. एवढी पाण्याची नितांत गरज आपल्याला असते आणि आपण मात्र 24 तास
पाणी वाया घालवत असतो. त्याच्यावर काही नियंत्रण आणावे लागेल अन्यथा पुढच्या
पिढीला पाणी मिळणे शक्य होणार नाही. जलसंवर्धन,“पाणी अडवा आणि पाणी जिरवा” हा एक
महत्वाचा मुद्दा “वसुंधरा बचाव” या मोहीमेत अंतर्भूत आहे. निसर्गाची अवकृपा झाली
तर त्सुनामी, पुर, ढगफूटी इत्यादी मार्गाने तेच पाणी जीवित आणि वित्तहानीस कारणीभूत
ठरते. जागतिक तापमानवाढीमूळे (Global Warming)
बर्फ वितळायला लागून पाण्याची पातळी वाढून सखल भाग पाण्याखाली जाणार हे भाकित इंग्रजी
चित्रपट “Day after tomorrow” 10 वर्षापूर्वी आलेल्या या चित्रपटातून याचे चित्रण
केलेले आहे. काही प्रमाणात याचा अनुभव आपण
सध्या घेतच आहोत.
भारतात मराठवाडा, विदर्भ, मध्यप्रदेश या
ठिकाणच्या परिसरात महिनोंनमहीने गोड्या पाण्याचा थेंब मिळत नाही. हली बाटलीबंद पाणी उपलब्ध होत असल्याने थोडासा
दिलासा मिळतो. असे विकतचे पाणी किती आणि कसे पुरणार? चंद्रावर, मंगळावर, शनि आणि गुरूच्या काही
उपग्रहावर पाणी आहे का? याचा शोध घेतला जात आहे. काही दिवसांनी त्या गृहावरील मनुष्यवस्तीसाठी
तेथील पाण्याचा वापर करणे आवश्यक ठरेल. आपले सण,उत्सव,देवळात, जेवताना, जेवण झाल्यावर,
झोपताना, उठल्यावर सगळीकडे पाणी लागते. जीव गेल्यावरसुध्दा शेवटचे पळीभर पाणी
पाजावे लागते जेणेकरून त्याच्या आत्म्याला आणि शरीराला शांती लाभावी. अशा या पाण्याला “जल संजीवनी”म्हणतात ते उगीच
नाही. दिवसभरात केव्हाही आपण जे पाणी पितो तेव्हा प्रत्येकवेळी पाणी पिताना सकारात्मक
विचार केल्यास नक्कीच फायदा होईल. पाण्याचे समन्यायी वाटप झाल्यास स्थैर्य निर्माण
होऊन राज्यात तसेच देशाची प्रगती होऊ शकेल.
पुर्वी कोणाच्या घरी गेल्यावर आधी गुळ-पाणी देत असत,खुप चांगली पध्दत होती ती! उन्हातून “आलेल्या आणि घशाची कोरड पडलेल्या जीवास शांतता लाभावी” असा दुहेरी हेतू यातून साध्य व्हावयाचा. आजही देवळात गेल्यावर आपण पळीभर तीर्थ पिले की शांत होतो आणि देवळात गेल्याचे एक समाधान मिळते म्हणुनच तहानलेल्या जीवाला पाणी पाजणे हे आपण पुण्याचे काम समजतो.

सुंदर लेख... पाण्याची निकड किती महत्वाची आहे याबद्दल विस्तृत विवेचन केले आहे...
ReplyDeleteDhanyawad 🙏 Bhau!
ReplyDeleteछान आहे लेख.
ReplyDelete