विना सहकार नाही उध्दार
“विना सहकार नाही उध्दार” हे आपले परवलीचे वाक्य इसवी सन 60च्या दशकातले होते. ब-याच गोष्टी आपण सहकारी तत्वावर राबविण्याचा प्रयत्न केला, अजूनही करीत आहोत,याला म्हणावे तसे यश मिळत नाही. खरं तर मिश्र अर्थव्यवस्था आपण स्विकारली तेव्हाच अप्रत्यक्षपणे मान्य केलेले होते की, खाजगी आणि सरकारी तत्वे दोन्ही एकमेकास पुरक तर्हेने अंमलात आणली जातील. या दोघांचे काही तोटे लक्षात घेता तिस-या तत्वाची अमंलबजावणी करणे गरजेचे ठरले कारण आपली लोकसंख्या, कमी पैसा आणि बुध्दीमत्ता व कौशल्य यांची अमाप उपलब्धता. सहकार ही एक चळवळ असुन अगदी तळागाळातल्या लोकांपासून सुरू करणे शक्य असलेली योजना आकर्षक वाटते,कारण त्यात अनेकांचे अनेक स्तरांवर भले होणार असते. कोणत्याही चांगल्या योजनेचे भवितव्य ठरविणे, त्याच्या प्रामाणिक हेतूवर आणि अंमलबजावणीवर अवलंबून असते. या आघाडीवर आपण अनेकदा कमी पडतो. स्वार्थ बळावला की, अशा छोट्या पातळीवरच्या योजना हमखास बारगळतात.
जो इस्त्रायल पाणी उपलब्ध नसताना ही सहकारी
तत्वाची अमंलबजावणी करुन अख्या जगाला धान्य व फळे पुरवितो आणि आपण मात्र शेतक-याला
आत्महत्या करायला भाग पडतो. शेती,
उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्रात हे सहकारी तत्वे लागू केल्यास आपण नक्की प्रगती करू
शकू. किमान आत्महत्या तरी थांबतील पण पुढाकार कोण घेणार? एकत्र कोण येणार? आणि आपआपल्या
दर्जाची खात्री कोण देणार?
सहकारी तत्वे म्हणजे काय? सहकारी कायदा लागू असल्यामूळे त्या
अंतर्गत नियम पाळून एकमेकास “सहाय करू अवघे धरू सुपंथ” या म्हणी प्रमाणे सर्व जण एकाच
ध्येयाने, एकत्र येऊन “ना नफा ना तोटा” हे तत्व स्विकारून अनेकांचे भले करण्याच्या
उद्देशाने केलेले कोणतेही संघटन, संस्था, व्यापारी, धंदा, बॅंक व्यवसाय असू शकते.
यासाठी सरकारी मदत वेगवेगळ्या सोयी व सवलती आणि सर्वसामान्य माणूस सुध्दा मालक बनू
शकतो हे स्वप्न दाखवणारे तत्व होय. मग भलेही नफा होणार नाही पण दिर्घकालीन समानता
आणि समृध्दी फायदेशीर ठरू शकते.
जी गोष्ट
राष्ट्र, समाज तीच गोष्ट वैयक्तिक पातळीवर आपण कुटूंबातही लागू करू शकतात. हल्ली
प्रत्येक जण स्वतंत्र व्यक्ती म्हणून आई-वडीलांना न जुमानता नवी दिशा शोधत असतो. अशा वेळी जर अनेकांच्या मदतीतून, सहका-याने
एखादा उद्योगधंदा, व्यवसाय किंवा व्यापार सुरू करत असतील तर काय हरकत आहे? कमी
भांडवल, जास्त मनुष्यबळ आणि कौशल्य ही आपली वैशिष्ट्ये या तत्वाला अगदी योग्य आहेत
फक्त प्रबळ ईच्छा, इतरांची साथ आणि प्रामाणिक हेतू कोणालाही प्रगतीपासून रोखू शकत
नाही. शिवाय जे अनेक गहन प्रश्न, गरीबी,अज्ञान आणि पैसा या तत्वानुसार सोडविले जाऊ
शकतात यावर विश्वास हवा आणि लोकांनाही हे पटले पाहिजे. असेही आपण हे तत्व अप्रत्यक्षरित्या
अमंलात आणतच असतो. मालकीभाव निर्माण होणे
आणि त्याप्रमाणे वागणे हे महत्वाचे. अन्यथा अनेक गैरव्यवहार घडू शकतात. प्रामाणिक
ईच्छा आणि नेतृत्व चांगले लाभल्यास हे सहज शक्य आहे.
सहकारी तत्वावर सुत गिरण्या, साखर कारखाने आणि बॅंका अश्या अनेक सहकारी संस्था तुम्ही बघितल्या असतील,त्यांना प्रोत्साहन देऊन शासन त्यांना मदत करीतच असते. सगळ्यांना काम मिळाल्यावर समृध्दी आणि पैसा पाठोपाठ येतो. शेवटी आपल्याला वैयक्तिक,सामाजिक आणि देशपातळीवर प्रगती हवीच आहे. काही जण चीन आणि रशीयाचे उदाहरण देऊन वाद घालतील. आपल्या सारख्या विकसनशील देशाला आर्थिक संकट टाळण्यासाठी सहकाराशिवाय पर्याय नसतो फक्त त्यासाठी आपली मानसिकता ही “मी, माझी वरून आम्ही, आमच्याकडे” अशी बदलणे अपेक्षित आहे. मग करणार ना प्रयत्न? सगळ्यांना समाविष्ट केल्यानंतर जबाबदारी आपोआप येते,जबाबदारी आली की कर्तव्यही आपोआप येते आणि कर्तव्य निष्ठेने पार पाडली जातात. अशी सुजाण नागरिकता लवकरच तयार होवो ही अपेक्षा.

मस्त लिहिलंय
ReplyDeleteDhanyawad 🙏
ReplyDeleteDhanyawad 🙏
ReplyDeleteमी नाही, आम्ही आमच्याकडे सर्वतोपरी बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि जबाबदारीने सुजाण नागरिक व्हायचा प्रयत्न करू . छान नवीन नवीन वाचायला मिळते.
ReplyDeleteDhanyawad 🙏
Delete👍👍👌👌
ReplyDelete