पाळणाघराची गरज

          50 वर्षापुर्वींपासून स्त्रिया नौकरी करायला लागल्या तेव्हा एकत्र कुटूंब पध्दतीमूळे मुलांची गैरसोय होत नसे. जेव्हा विभक्त कुटूंबपध्दतीचे स्तोम बळावल्यावर किंवा कधी नाईलाजाने (कुणीच उपलब्ध नसल्यामूळे) पाळणाघराची गरज निर्माण होत गेली. अनेक गोंडस नावे देण्यात आली, “बेबी केअर”, “नर्सरी” आणि “डे-केअर” अशा नावाने हा एक चांगला घरगूती व्यवसाय ब-याच जणांना सोईचासुध्दा झाला. दोघांची गरज आणि मदत अशी “एकमेकां सहाय्य करू “अशी ही व्यवस्था चांगलीच होती व आहे.

           मला स्वत:ला मात्र ही समस्या खूप जाणवली कारण तेव्हा लालबागला कुणीही तयार नव्हते. ब-याच प्रयत्नांती शेजार-या इमारतीमधली बाई तयार झाल्यामूळे मुलींची सोय झाली. सुदैवाने दोघींनाही चांगली पाळणाघरे मिळालयामूळे शाळेत जाईपर्यंतचा प्रश्न तरी सुटला. शाळा सुरू झाल्यावर मात्र दुहेरी कसरत सुरू झाली कारण शाळा एकीकडे आणि ऑफीस दुसरीकडे. तरी नव-याने ही जबाबदारी लीलया पार पाडली.  आता त्याचे फार आश्चर्य वाटते पण त्यातही एक आनंद असायचा.

        हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे आजच्या “तुझी माझी रेशीम गाठ” एपिसोडमधील पाळणाघरात सोडताना आईची होणारी तगमग, ओढ, बाळाची काळजी इत्यादी. परदेशात तर हे पाळणाघर आणि शास्त्रियदृष्टया प्रशिक्षीत अशा बाया मिळतात. त्यामूळे तिकडे एवढी काळजी नसते. इथे मात्र जागा, स्वच्छता, झोप, वागणूक आणि आपआपसात कसे संबंध तयार होणार यावर सगळे काही अवलंबून असते. यासाठी व्यावसायीक प्रशिक्षण देण्यात यावे असे मला वाटते. असेही आपलयाकडे आई-बाबा होण्या अगोदर समूपदेशन वगैरे म्हणावे तेवढे प्रचलित नाही.  बाळांना कसे हाताळावे, त्यांच्या आवडी-निवडी, झोपवणे, खाणे-पिणे अशा अनेक गोष्टी नवरा-बायकोनी आधी शिकून घेतल्यातर पुढे सोपे जाईल. म्हणतात ना पाण्यात पडले तर आपोआप पोहता येते किंवा आई झाली की आपोआप सगळे जमते. एका अर्थी बरोबर आहे, पण आधी कल्पना दिली तर दोघांनाही आनंद आणि विश्वास वाटेल.

         तसे असे हे पाळणाघर स्वच्छ, मुलांना हवे हवेसे वाटणारे, आनंद देणारे, त्यांच्या मानसिक आणि शारिरिक आनंद, गरजा भागवणारे असावे, एवढी तरी किमान अपेक्षा असावी. कित्येक वेळा ट्रेन मध्ये मी बायकांना, मुलींना बघते. जेव्हा त्या पोटाला कांगारू बॅग, बॅगेत बाळ, हातात पिशव्या असे करून कशा गर्दीत चढतात आणि उतरतात हे बघून काळजी आणि कौतूक वाटते. यासाठी एक नियम सरकार आणि खाजगी आस्थापनाने विचारात घ्यावा असे वाटते. कार्यालयाच्या जवळ पाळणाघर असावीत. शक्यतो घर किंवा ऑफिस जे सोईचे असेल तिथे मुलांना ठेवावे, त्यासाठी नियमावली करावी. त्यांची तपासणी करावी. व्यावसायिक दृष्टीकोण बाळगल्यास चांगली सेवा आपोआप दिली जाते.

         दिवसेंदिवस “वृध्दांचे पालकत्व” हा एक प्रश्न निर्माण होत आहे, त्यांच्यासाठी पाळणाघरे तयार केली पाहिजेत. एकटेपण आणि सोबत यामूळे दैनंदिन गरजा भागविणे दोघांनाही शक्य होईल. उत्तम मार्ग म्हणजे एकत्र कुटूंब पध्दती, निदान मुले 5 वर्ष होईपर्यंत तरी अंगिकारावी जेणेकरून मुले मोठी झाल्यावरसुध्दा प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा तयार होईल. बघा विचार करून!


Comments

  1. वृद्धांचे पालकत्व असे तुम्ही म्हणालात म्हणजे दत्तक घेणे का ? आणि त्यांच्यासाठी पाळणाघरे म्हणालात तर भरपूर पाळणाघरे आहेत आणि खूप चांगल्या रीतीने बघतात , पण समाज काय म्हणतो लोक किती नाव ठेवतात अजून ती मेंटॅलिटी तयार झालेली नाही ..त्यासाठी सर्वांची मानसिक तयारी झाली पाहिजे असा तुमच्या मनातला विचार आहे का बाकी लहान मुलांसाठी पाळणाघर ! लेख मस्तच

    ReplyDelete
    Replies
    1. Ho nakkich.ata vichar karava lagel.

      Dhanyawad 🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव