माझे अलिबाग पर्यटन


            दोन वर्ष घरात ( नाईलाजाने ) राहून अगदी कंटाळा आला होता. आता कुठे कोविड बंधने शिथील होतात बघून आम्ही अलिबागला जायचे ठरविले. माझी, पती आणि मुलीची सुट्टी, गर्दी, रहाण्याची व्यवस्था, सरकारी बंधने इत्यादी अडथळे पार करून एकदाचे दस-याच्या दिवशी अलिबागला कॅटरमन बोटीने आम्ही सीमोल्लंघन केले.  बरेच दिवस समूद्र पाहिला नव्हता, अनायासे सगळे जुळून आले. 

         समुद्राच्या समोर सरकारी विश्रामगृह “तुषार” असल्यामूळे 3 दिवसात आरामात खाणे, पिणे, फिरणे आणि थकून भागून झोपणे इत्यादी मजा चालू होती. त्यात किल्ले कुलाबा, जंजीरा नुकतेच खुले झाले असल्यामूळे माफक गर्दीत छानपैकी बघून झाले. अलिबाग, किहीम, काशीद, मांडवा, नागाव, मुरुड, रेवस, वरसोली, आवास चौपाट्या यथेच्छ फिरून झाले,  काढले.  बिर्ला मंदीर, अलिबागमधील बालाजी आणि विठ्ठल ररुमाईचे मंदीर बघितले. सोबतीला शाकाहारी-मासांहारी जेवण होतेच.  समूद्र समोर असल्याने सकाळ, संध्याकाळ,  रात्री फिरायला मजा येत होती.  एकूण प्रवास आणि पर्यटन यशस्वी होऊन रविवारी संध्याकाळी बोटीने मूंबईत परत आलो.

         अशा या अलीबागला  आजपर्यंत आम्ही वेगवेगळ्या लोकांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी 5-6 वेळा गेलो तरी कंटाळा येत नाही.  गावी जाऊन आल्याचे समाधान मिळते. किमान 3-13 माणसे अशी एके काळी 20 वर्षापूर्वी एकत्र गेलो होतो तेव्हा तर खूप धमाल आली होती.  त्यावेळी आमचा संसारसुध्दा “हम दो हमारी एक” अशी होती. आताही तसेच होते. काळाच्या ओघात ब-याच गोष्टी बदलतात. त्यावेळी किल्ल्यात जाण्यासाठी शिडाची बोट, घोडा गाडी होती. आता वॉटरबोट व नवनवीन साहसी खेळ, ट्रेक्टर, डबल सायकल, उंट, घोडे अशा मंडळींची भर पडली होती. सन 2019 मध्ये आम्ही सर्व बहिण-भाऊ, भाऊजी-वहीनी आणि त्यांच्या आई व सासू असे एकत्रित ट्रिप केली होती,त्याच्या आठवणी ताज्या होत्याच.

         पर्यटनामध्ये एक लक्षणीय गोष्ट जाणवली म्हणजे नुसते पैसे उडवणे, मजा करणे, घराबाहेर वेळ घालविणे एवढाच मर्यादीत न ठेवता, तिथल्या सुख-सोई कशा वाढतील याकडे लक्ष देऊन,पुरातत्व विभागाने किल्यांची डागडूजी करावी,लोकांना आर्कषक वाटावे असे काही तरी केले पाहिजे.  गाईड, खाण्या-पिण्याची व्यवस्था, प्रथमोपचार ईत्यादीची सोय करावी. सरकारी कर भरावा लागतो व तो भरला पाहिजे पण त्याप्रमाणात किल्यांवर थोड्याफार सुविधा दिल्या पाहिजेत. तेथील काम करणा-या कर्मचा-याला प्रशिक्षण देऊन त्यांना पर्यटनाबद्दल जागरूक केले पाहिजे.  भारतीय सोशिक म्हणून सहन करतात पण पुढच्या पिढीने यावे असे वाटत असेल तर तश्या सुधारणा केल्या पाहिजेत.

           एकूण काय पर्यटनाबाबतची दृष्टी बदलण्याची गरज आहे.  शासन आणि लोकांचा सहभागही तेवढाच महत्वाचा आहे.  किल्ल्यांची डागडूजी,साफसफाई, माहिती फलक, पाण्याची सोय केल्यास अनेक पर्यटक आकर्षित होतील. जेट्टी उभारणे, जल पर्यटनास वाव आहे. पर्यायी व्यवस्थेचा आपल्याकडे विचार होत नाही. हल्ली चार चाकी काढून फिरायचे एक फॅड असते. पुन्हा त्या गाड्यांचे प्रदुषण, गावच्या लोकांना त्रास इत्यादी अनेक नवीन समस्या निर्माण होणार त्याचा सामना करावा लागेल. एवढा खोल विचार करायला कोणाकडे वेळ नाही.  पर्यटकांनी स्वच्छता आणि शिस्त बाळगली पाहिजे. लोक परदेशी पर्यटन करतात तेथे गेल्यावर सर्व नियम पाळतात मात्र आपल्याकडे तेवढी जागरुकता दिसत नाही.

       आपल्याकडेही अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत ती मनावर घेतली तर विकसित होऊ शकतात.  आपल्याला लाभलेल्या नैसर्गिक सौंदर्यस्थळांचा पर्यटनांच्या दृष्टीने विकास होणे हीच काळाची गरज आहे. तुम्हाला काय वाटते?



Comments

  1. माहितीपूर्ण लेख. पर्यटकांसाठी केलेल्या सूचनांचे पर्यटकांनी पालन करणे आवश्यक आहे तसेच नैसर्गिक सौंदर्यस्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणे गरजेचे आहे ह्या विचारांशी मी सहमत आहे. लेख आवडला.

    ReplyDelete
  2. फारच सुंदर लिहिले आहे..

    ReplyDelete
  3. अशा पर्यटनस्थळांचा विकास करायचा झाल्यास तिथे तिकीट लावणे आवश्यकता आहे प्रत्येक पर्यटकाला तिकीट काढून ठराविक वेळेत शिस्तबध्द सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत . मग बघा कशी प्रगती होते. बरेच छान छान पर्यटन स्थळ आहेत इंटरनॅशनल लेवल ची सुद्धा तिथे तिकीट लावून पर्यटकांना आत सोडतात त्या पद्धतीने केल्यास भरपूर विकास होईल आणि बरेच लोक मग ये-जा करतील. प्रत्येक रविवारी सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन आनंद लुटायला युवा पिढी समुद्रकिनारी मजा करायला येऊ शकते. खूप छान लेख आहे खरच असे केल्यास शासनाकडे पैसे आल्यासत्याची डागडुजी वगैरे नियमितपणे केली जाईल

    ReplyDelete
  4. Dhanyawad 💓🙏
    Aaplya active participation baddalpan.👍

    ReplyDelete
  5. hum do humare ek; ya veli `ti` rahun geli !

    ReplyDelete
  6. पुनम भांगले
    ती हरवलेली आहे. शोधून दिल्यास रोख इनाम देण्यात येईल.
    आपण तीला पाहिले का.

    नुकत्याच आलेल्या वृत्ता नुसार ती अमेरिकेत दिसली आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव