गावची जत्रा
नुकतीच जत्रेसाठी गावी जाऊन आल्यावर एक आठवडा तरी गावचा हॅंग ओव्हर कायम असतो. मग “ परत येरे माझ्या मागल्या” (दैंनंदिन आयुष्य सुरू) माझे पती 26 वर्षांनी आणि मी 6 वर्षांनी आंगडी (कारवार), कर्नाटक येथील “शिवनाथ” जत्रेसाठी गावी गेलो होतो. 2 वर्ष कोठेही जाता न आल्यामूळे जरा चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते. जत्रेला जातच आहोत तर कुलदेवता दर्शन (श्री. महालसा), फिरणे आणि जत्रेला हजर रहाणे असा त्रिसुत्री कार्यक्रम हा दहा दिवसांत पुर्ण करावयाचा होता. फिरायचे नियोजन करण्यात आमचे “हे” हुशार. त्यानुसार सगळा कार्यक्रम पार पडला आणि 10 व्या दिवशी मुंबईत जान आणि सामानासह सुखरुप परतलो.
गावची जत्रा म्हणजे एक पर्वणी असते.
दिवाळीनंतर 20-22 दिवसांनी येणा-या जत्रेचा उल्हास, आनंद, सजावट, किर्तन, फटाके
(वजन), पुजा-आरती आणि जेवण काही औरच असते.
दुस-या दिवशी तुलाभार, लिलाव, दही काला, शिवभूषण पुरस्कार, ग्रामस्थांची सभा घेऊन जत्रेची सांगता होते.
प्रत्येक जण प्रत्येक कार्यक्रमात हिरीरिने भाग घेत असतो. श्रध्दा आणि परंपरेनुसार
सगळे व्यवस्थित पार पडेपर्यंत समितील मान्यवरांचा जीव वरखाली होत असतो. लागोपाठ आजुबाजूच्या
सगळ्या देवांच्या जत्रा सुरू होतात. प्रत्येक
जत्रेचे स्वरूप वेगवेगळे असते. काही ठिकाणी देवाची पालखी वनात वाजत-गाजत जाऊन येतांना
रथात बसून येते. प्रत्येक घरासमोर तिचे स्वागत धुम-धडाक्यात होते. गोव्यामध्ये काही
ठिकाणी देवीची पालखी देवळाच्या मागील सरोवरात नौकानयन करुन आणतात. मनोरंजन म्हणून
नाटक-किर्तन, कन्नड किंवा कोकणीतून गायन-वादन, नृत्य, नाट्यछटा आणि सोंग ज्याला
आपण (दशावतार) आणि भांड नाचवणे, कृष्ण-राधा करणे (नवसाचा) अशा अनेक स्वरूपात साजरी
केली जाते.
यंदा आम्हाला 1) म्हाळसा (मार्दोळ, गोवा),
2) म्हाळसा (वेण्णा, गोवा), 3) महालक्ष्मी (गोवा) 4) महामाया (सदाशिवगड, कारवार),
5) शिवनाथ (आंगडी, कारवार) अशा वेगवेगळ्या जत्रा बघायला मिळाल्या. त्यामूळे मजा आली
आणि मानसिक समाधान लाभले. तेथील वेगवेगळ्या परंपरा, रितीरिवाज, महाप्रसाद, विशिष्ट
खाणे, फुले-फळांची आरास, रमणीय परिसर बघून कौतुक वाटले. विशेष म्हणजे सगळ्यांचा
स्वेच्छेने दिलेला सहभाग महत्वाचा वाटला. एक दिलाने एकमेकांची विचारपुस, कुशलमंगल
चिंतणे आणि यथासांग आदरतिथ्य करणे हा कोकणी माणसाचा स्वभाव पुन्हा पुन्हा अनुभवता
आला.
गावी छोटी जमीन आहे पण स्वत:चे घर
नसल्याची खंत असूनही ह्यांच्या मामाकडे, बहीणीकडे, इतर नातेवाईक त्यांनी केलेले
प्रेमाने केलेले स्वागत बघून मन भरून येते. देव त्यांचे भले करो आणि ही ओढ कायम
राहो. गाव आणि गावातली माणसे अशीच राहो हीच त्या ईश्वर चरणी प्रार्थना!
अशीच ओढ राहूदे आणि रुजुदे 👌👌🌹
ReplyDeleteYess, thank you.
DeleteNice narration and well drafted 👍
ReplyDeleteDhanyawad Bhau 👍🙏
Deleteशेवटी व्यक्त केलेली इच्छा गावापुरतीच मर्यादित न राहता शहरातही पूर्ण व्हावी....
ReplyDeleteDhanyawad 🙏 if possible,write your name
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteChan lihile ahes.Avadle. Angadi Jatra mi 1981 madhye pahili hoti (tevachya athavani ajun thalak pane dolyasamor ahet) pan tithun 5 km var asleli amchya wangad gavi mi 2015 purvi javal javal pratyek varshi jat ase . Adhi Belgavla, tithun Govyala kuldevta Mahalase chi Kartik Pornima chi jatra ani mag tithun 65 km var aslelya Majali (Wangad) yethil Dwitiyyela honari Jatra attend karun 3/4 divsani via Belgav parat Mumbai. Unfortunately 2015 nantar gavi jaycha yog ala nahi.
ReplyDeleteFrom Anand R. Bhangle.
Thank you Bhavojee.khoop chan athavan karun dili.
Deletetumhi suddha tithlya jaminimadhe aaple ghar bandha mhanje amhi tithe yevoo shaku ani vegveglya jatramadhe sahabhagi hovoo shakoo. Nakki ghar bandha.
ReplyDeleteYess Madam ❣️
DeleteYou are welcome 👍☺️