ध्यानधारणा
“सुंदर ते ध्यान विटेवरी उभे ..” नुकतीच कार्तिकी एकादशी होऊन गेली त्या निमीत्त अनेक विठ्ठलाची गाणी ऐकावयाला मिळाली. आषाढ महिन्यापासून ते कार्तिक महिन्यापर्यंत आपला चातुर्मास बहुतेक जण पाळतात. काही जण मांसाहार, कांदा, लसूण सुध्दा सोडतात. तर काही जण देवाचे काही तरी नवस, उपवास तिर्थयात्रा करून आयुष्यभराचे पुण्य कमवायचा प्रयत्न करीत असतात.
या सर्वामागे मूळ प्रेरणा शांती व समाधान
प्राप्त करणे हा असतो हीच मनोकामना मनात धरून ध्यान केले जाते. योगामध्ये अनेक प्रक्रियेद्वारे मनावर ताबा कसा
मिळवायचा ते शिकवले जाते. ब्रम्हविद्येत श्वासावर नियंत्रण मिळवून “शांती, समाधान,
आरोग्य “ कसे साध्य करावयाचे ते शिकवतात. आताच्या
धावपळीच्या युगात ध्यानधारणा करणे अत्यंत गरजेचे झालेले आहेत. कायम ताणतणाव, स्पर्धा
आणि यशासाठी केलेली धावपळ यामूळे माणूस कुठेतरी थकतो. अतिश्रमाने आणि अतिताणाने
एकवेळ अशी येते की सर्व काही अचानक थांबते. यासाठी ध्यानधारणा ही एक सोपी,
बिनखर्चीक आणि भावनिक, शाररिक व मनस्वास्थ्य मिळविण्यासाठीचा उपाय असून वेगवेगळ्या
प्रकारे आपण मनस्वास्थ्य मिळवू शकतो.
पुर्वीचे लोक तपस्श्चर्या करून वेगवेगळे
वर प्राप्त करून स्वताची साधना प्राप्त करीत असत. आता आपल्याकडे आधुनिक विज्ञान
आणि तंत्रज्ञानामूळे सगळे काही शक्य झालेले आहे. तरी माणूस सुखी का नाही, या
प्रश्नाचे उत्तर कालागणिक,व्यक्तीसापेक्ष वेगवेगळे असू शकते मात्र यावर उपाय
नक्कीच शोधला पाहिजे. नाहीतर एवढी
समृध्दी, स्थैर्य हवे असल्यास ध्यान किंवा शांतीमय जीवन
जगणे अपरिहार्य आहे. मन:शांती, एकाग्रता, शिस्त ,कार्यतत्परता आणि औत्सुक्य
वाढविणे हा ध्यानधारणेचा मुख्य हेतू असतो. अज्ञान, गैरसमजूती आणि अनारोग्य टाळणे
हे सहज साध्य होते. हा स्वता:च स्वताला अनुभवायचा क्षण असतो. अध्यात्मकरित्या
ईश्वराचे नामस्मरण, चिंतन, जप किंवा कोणत्याही पारंपारिक पध्दतीने ही प्रक्रिया
आपण सुरू करू शकतो त्याचे होणारे परिणाम नक्कीच फलदायी असतात. स्वताचे निरीक्षण आणि
चंचल मनाला आवरणे यामूळे ब-याचश्या गोष्टी आपोआपच स्वयंनियंत्रित होत जातात. शरीर,
आत्मा आणि स्वत:विषयची ओळख यामूळे माणूस स्वत: नम्र होतो आणि इतरांबरोबर सुध्दा नम्र
वागतो. आनंदी जीवन जगण्यासाठी सगळ्याबद्दलची कृतज्ञता महत्वाची ठरते. ईश्वर, परिस्थिती आणि सभोवतालची माणसे या बाबतची वागणूक
बदलल्यामूळे निसर्गदत्त देणगी विषयी जास्त जागरुकता निर्माण होते. गढूळ पाणी
स्वच्छ करण्यासाठी जशी तुरटी फिरवली जाते.
त्याप्रमाणे अस्वच्छ (षडरिपूने ग्रासलेले)
मन स्वच्छ करून एक सुंदर आरस्पानी व्यक्तिमत्व
तयार करण्याचे काम या ध्यानधारणेमूळे शक्य होते.
त्रयस्थ भूमिका बजावल्यामूळे होणारे दुख: किंवा सुख: या कडे सारख्या दृष्टीने
बघणे शक्य होते. जे भगवद गीतेत कृष्णाने सांगितलेले आहे. “ तु एक माध्यम आहेस,
कर्ता करविता तोच आहे.” ही भावना वाढीस लागून तत्परतेने कार्य सिध्दीस नेण्याची ओढ
तसेच चलबिचलता कमी झाल्यामूळे आपोआपच कार्यकौशल्य प्राप्त होऊन यशस्वी होण्याचे
मार्ग खुले होत जातात.
स्वामी विवेकानंदाचे कन्याकुमारी
येथील स्मारक याचे उदाहरण आहे. मंदीर,
मस्जिद असो वा चर्च वेगवेगळ्या प्रार्थनेतून एकप्रकारे ठराविक वेळेमध्ये ध्यानधारणा
करीत असतात. यामध्ये कोणतीही अडचण येत नसून प्रत्येकजण आपआपला मार्ग शोधीत असतो.
खूप छान लेख आहे
ReplyDeleteDhanyawad 🙏
DeleteNav lihile tar jast bare.
खूप छान लेख आहे.
ReplyDeleteDhanyawad 🙏
DeleteName please
Dhanyawad 🙏
ReplyDelete