लाईफ ऑफ पाय
“निरोप तुज देता” हे गाणे सैंनिकांसाठी असल्यामूळे ऐकल्यावर डोळ्यात पाणी येते. असेही, निरोप देणे किंवा घेणे तसे अवघडच जाते. नुकताच “लाईफ ऑफ पाय” हा हिंदी भाषेत डब केलेला इंग्रजी चित्रपट पुन्हा बघितला. मानव आणि प्राणी यांचा अथांग सागरात जगण्यासाठी एका लहान बोटीत केलेला संघर्ष याचे सुंदर चित्रीकरण आहे. एकूणच मांडणी, फोटोग्राफी आणि विषय मस्त होता. एक वेळ अशी येते, प्राणी मागे वळून न बघता शांतपणे दूर निघून जातो. आपल्या नायकाला मात्र खूप वाईट वाटते की वाघाने एकदाही मागे वळून पाहिले नाही म्हणून, इथेच ख-या अर्थाने चित्रपट संपतो. काही वेळा ही अलिप्तता आवश्यक असते असे मला वाटते.
माणूस मात्र निरोप घ्यायला सहजा
सहजी तयार होत नसतो. कधी कधी तर बाकीचे काही जण अप्रत्यक्षरित्या सुचवित असतात
तरीही मोह,माया आणि पैसा माणसाला गुंतवून ठेवते. काही ठराविक जण ठराविक वयानंतर
निवृत्त होवून निरोप घेतात. अपेक्षित साध्य साधल्यावर निवृत्ती / निरोप घेणे आणि
दुस-याला जागा करून देणे हेच योग्य असते. यशाच्या शिखरावर असताना नम्रपणे पायउतार
होणे हे खरेच कौतूकास्पद ठरते.
सैंन्यात जाणा-या मुला-मुलींना, सासरी जाताना
देण्यात येणारा निरोप एकदम भावस्पर्शी असतो. निरोप दिल्याशिवाय दुसरी सुरूवात कशी
होणार? सरत्या वर्षाला, महिन्याला, दिवसाला, तासाला आणि अगदी क्षणालासुध्द्दा
निरोप दिला जातो. दु:खाच्या क्षणाला निरोप देऊनच दु:ख संपवता येते. गाव किंवा शहर
सोडताना, नोकरीतील सेवानिवृत्तीनंतरचा निरोप कधी कधी जिव्हारी लागतो तर कधी हायसा
वाटतो. शेवटी आपण त्याकडे कसे बघतो हे आपल्यावर अवलंबून असते त्यासाठी अलिप्तपणा
किंवा तटस्थपणा लागतो शिवाय कोठे थांबावयाचे याचे भान असावे लागते. पुन्हा
भेटण्यासाठी निरोप घेणे अपरिहार्य असते.
प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमींना, युध्दावर
जाणा-या पतीला किंवा मुलाला / मुलीला, परदेशी जाणा-या मुला-मुलींना जड अं:तकरणाने
निरोप द्यावा लागतो. हा नश्वर देह सोडून जाताना तर कोणाचाच निरोप घेण्याचा वेळ उरत
नाही. एक अस्तित्व सोडून दुस-या देहात परिवर्तन होऊन नवीन आयुष्याची सुरवात होणे
या निरोपानंतरच शक्य असते. निरोपाची दुसरी बाजू
नविन सुरवातीची असते. नविन आव्हाने, घटना, अनेक प्रसंग जे आधी घडून गेले,
त्यांना वेळच्यावेळी निरोप देणेही महत्वाचे ठरते. खरंच काळ किती गतीमान आहे ना? “थांब
म्हटले तरी थांबत नाही आणि काही वेळा जा म्हटले तरी जात नाही”. हा निरोप केवळ माणसांच नसतो तर तात्पुरत्या
ओळखीचा, स्थापनेचा (गणपती, गौरी, दुर्गा इ.) अगदी पाळीव प्राण्यांचा सुध्दा असतो.
झाडे, पशुपक्षी, प्राणी यांना जरी बोलता येत नसले तरी, मुक रितीने ते निरोपाचे
क्षण दर्शवत असतात. (अवेळी पानगळ, फुले/फळे न येणे, विशिष्ट आर्त आवाज)
तिसरा निरोप परिपुर्णतेचा असतो. एखाद्या
कार्याचा किंवा कलाकृतीचा, एखादा कलाकार आपल्या निर्मीतीवर जेव्हा शेवटचा हात
फिरवतो, गवई मैफिलीत भैरवी गातो तेव्हा किंवा आभार प्रदर्शन करतात तेव्हा तो समारंभ
संपल्याचे/ निरोप घेणे दर्शवित असतो.
शेवटची घरघर, दिव्यातले समईतले तेल संपल्याचे दर्शवून एखाद्याचा अंत
दाखवतात हा एक कायमचा निरोप असतो. एवढे
लिहून मी पण आपला निरोप घेते.
खूप छान लेख आहे.
ReplyDeleteDhanyawad Geetatai 🙏
Deleteसुंदर आशय आहे
ReplyDeleteDhanyawad Bhau🙏
ReplyDelete