हिंदी भाषा आणि आपण

                                       भाषा शरीर का ऐसा अदृश्य अंग है!

                                       जिसमें इन्सान का सबकुछ दिखाई देता है ..

 

          जागतिक हिंदी भाषा दिवस दि.10 जानेवारी,2022 रोजी सर्वत्र साजरा करण्यात आला त्यानिमित्त हा लेखन प्रपंच. मराठावाडा, वाशी,लालबाग,महालक्ष्मी आणि वारंवार होणा-या शासकीय नौकरीमध्ये येणा-या माणसांशी, प्रवासात संवाद साधण्यासाठी पटकन हिंदी तोंडात येते. लहानपणापासूनची सवय मुंबईत आल्यावर जास्तच बळावत गेली, त्याची अनेक कारणे आहेत. जसे की, हिंदी चित्रपट,  गुलशन नंदा, मुन्शी प्रेमचंद हे साहित्यिक, कवी गुलजार, संत तुलशीदास, संत कबीर यांचे दोहे व काव्य आणि वेगवेगळे गझल गायक गुलाम अली आणि जगजीत सिंग, मेहंदी हसन, अनुप जलोटा, तलत अझीझ आणि पंकज उदास इत्यादी ऐकत आमची पिढी मोठी झाली. चंपकपासून चांदोबापर्यंतची वाचण्याची आवड हिंदीतसुध्दा रुजली.  स्वातंत्रपुर्व काळात मोठे पुढारी आणि मान्यवर हिंदी भाषेचा वापर करीत होते त्यामूळे हिंदी भाषा सर्वदूर पसरली व तिला महत्व प्राप्त झाले.

          मराठी माय असेल तर हिंदीला मावशी आणि इंग्रजीला सावत्र मावशी म्हणता येईल. अशी ही हिंदी मृदू, मार्दवयुक्त आणि ऐकायला कानाला गोड वाटते. त्यात उर्दू मिश्रीत असेल तर अजून बढीया! भाषेवर प्रेम करायला मला उर्दूसुध्द्दा आवडते. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचे  हिंदी समालोचन ऐकण्यासारखे असते.  रेडीओवरचे जूने जॉकी, अमीन सयानी आणि तबस्सूम,क्रिकेटमधील समालोचक बॉबी तल्यारखान,सुशिल दोषी आणि हर्षा भोगलेमुळे आणि हिंदी  बातम्या देणारी  प्रतिमा पुरी, सलमा सुल्तान, शमी नारंग, गितांजली अय्यर अशा अनेक लोकांनी हिंदीची गोडी लावली. मराठीतील रांगडेपणा या भाषेत अजिबात नाही, पावलापावलावर बदलते असेही नाही,फक्त हैद्राबाद, इंदोर, लखनौ, दिल्ली, पंजाबी, हरयाणी, उत्तर प्रदेश इथला बोलण्याचा टोन वेगळा असतो.  बंबय्या हिंदी फक्त मुंबईतच बोलली जाते आणि हिंदीची खिल्ली उडविली जाते. राष्ट्रीय भाषा म्हणून सगळीकडे आपण 3 भाषा लिखित स्वरुपात  वापरतो. त्यात हिंदीचा दुसरा क्रमांक लागतो. लोकप्रियतेमूळे हिंदी भाषेला राज भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. ज्यांना इंग्रजी किंवा मराठी जमत नाही त्यांच्यासाठी ही भाषा बोलायला सोपी जाते.  हिंदी लिपी देवनागरी असून बरीचशी संस्कृत,उर्दू,फारसी आणि अरबी शब्द आढळतात,लेखन मात्र मराठी सदृष्य आहे.  हिंदी भाषिक जरा जास्तच गोड बोलतात असे वाटते. मूळ ग्रंथसंपदा मराठीपेक्षा हिंदीमध्ये जास्त आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार भारतात 57% हिंदी बोली भाषिक आहेत. साहित्याचे भाषांतर हिंदीत जास्त होते. गाणी, चित्रपट, मालिका अपवाद फक्त सामाजिक माध्यमांचा असावा,तिथे इंग्रजीची मक्तेदारी चालते. लिपी देवनागरी असल्यामूळे टंकलिखीत करणे अवघड जाते पण सरावाने साध्य होते. कोणतीही मातृभाषा वापरली की,जवळीकता निर्माण होते.

              खरे सागायचे तर माय बोलीमध्ये चांगल्या प्रकारे व्यक्त होता येते,मग ते बोलून  समोरच्याला कळणे आणि कळविणे हा मुख्य हेतू,त्यासाठी सांकेतिक भाषासुध्दा चालते. ध्वनीचा,भावनेचा योग्य वापर आणि प्रसारण भाषेतून होत असते. काही शासकीय खात्यांमध्ये पदोन्नतीसाठी हिंदी व स्थानिक भाषा परिक्षा देणे सक्तीचे असते. उदा. UPSC आणि MPSC यांनी आयोजित केलेल्या परिक्षा. यामागची भावना तिचा प्रसार व प्रसिध्दी, मर्यादित प्रवेश  व भाषेचे महत्व जपण्यासाठी होतो.

                 इतर भाषिक राज्यात हिंदी दुय्यंम समजली जाते. भाषिक प्रांतवार रचनेमूळे बरेचशे भाग नाईलाजाने दुसरीकडे जोडले गेले. काही ठिकाणी भाषिक तंटा निर्माण होवून प्रश्न निर्माण झाले. 50-60 वर्ष झाले तरी असे वाद चालूच आहेत. एक भाषा काय-काय करू शकते हे यावरून तुमच्या लक्षात येईल.  भाषा हा वादाचा मुद्दा असू नये किंवा सक्ती करण्यात येऊ नये असे वाटते. कोणतीही भाषा शुध्द आणि व्याकरणयुक्त असावी, त्यात अन्य विशेषत: इंग्रजी शब्दांची भेसळ नको.  तुम्हाला काय वाटते?



Comments

  1. सुंदर लेख. कोणत्याही भाषेत बोलताना दुसर्‍या भाषेतील शब्दप्रयोग वापरले तर मूळ भाषेचा गोडवा (लहेजा) कमी होतो

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव