प्रजासत्ताकाच्या निमित्त्याने

                   नुकताच 73वा  प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा झाला.  73 वर्षापूर्वी संविधान,  सार्वभौमत्व आणि लोकशाहीचा स्विकार करण्यात आला.  संविधानाची चौकट स्विकारुन मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग कसा करून घ्यावा याची ही एक कार्यपध्दती सर्वोनुमते स्विकारलेली होती.  प्रजासत्ताकाचे दुसरे महत्व म्हणजे स्वसंरक्षण, कायद्याने अधिकार आणि कर्तव्याची जाणीव तसेच अन्याय झाल्यास दाद मागण्याची सोय. सर्वसामान्य माणसे एवढा खोल अर्थ विचारात घेत नाही.  ज्यांना रोजची खाण्या-पिण्याची भ्रांत आहे त्यांना कोणते स्वातंत्र्य आणि कोणते प्रजासत्ताक ? ज्या दिवशी त्यांच्या मुलभूत गरजा संपूर्णपणे भागतील तो दिवस त्यांच्यासाठी मोठा.

               भारतीय राज्यघटनेने नागरिकांना सहा मूलभूत हक्क दिलेले आहेत.

·         समतेचा हक्क (कलम 14 ते 18)

·         स्वातंत्र्याचा हक्क (कलम 19 ते 22)

·         शोषणाविरुद्धचा हक्क (कलम 23 आणि 24)

·         धर्मस्वातंत्र्याचा हक्क (कलम 25 ते 28)

·         सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क ( कलम 29 ते 30)

·         घटनात्मक उपाययोजनेचा हक्क (कलम 32)

 

                घटनेत अपेक्षित असलेला सर्वांना समान न्याय घरात आपण वापरतो का? की फक्त स्त्रियांनी ही कामे करावी, पुरषांनी ती कामे करावीत असा भेदभाव करतो? वेळेनुसार आणि सोईनुसार कामाची विभागणी करणे एवढे कठीण आहे का? एक व्यक्ती काम करते आणि दुसरी आराम करते हे चित्र कधी बदलणार? आपआपला खारीचा वाटा उचललाच पाहिजे ही जाणीव प्रथम मनात, घरात, समाजात आणि राष्ट्रात निर्माण होणे ही खरी काळाची गरज आहे. नाहीतर आज 73 वर्षानंतरही आपण आपल्या मानसिकतेचे गुलाम होऊन स्वत:च स्वत:वर अन्याय करु, ज्यावर कुठेही आणि केव्हाही दाद मागणे शक्य नाही.

           आर्थिक सुबत्ता, जागतिकीकरण आणि वैज्ञानिक प्रगती कितीही गाठली तरी जीवन जगण्याचे मुलभूत तत्वज्ञान जर आपण अंगिकारले नाही तर या प्रगतीला काही अर्थ उरत नाही. एक दिवस सुट्टी मिळते म्हणून मजा करण्याचा दिवस एवढाच मर्यादित अर्थ या दिवसाचा निघू शकतो.  सीमा सुरक्षा जसे देशासाठी आवश्यक आहे तसेच प्रत्येक व्यक्तीचीही आवश्यक आहे. आपल्या मर्यादा आणि मिळालेल्या संधी यांची  योग्य सांगड घालून प्रत्येक व्यक्तीने सार्वभौमत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न जरी केला तरी ख-या अर्थाने प्रजासत्ताक मिळाल्याचा प्रत्येकाला अभिमान वाटेल.  स्वता:चे हक्कांचे संरक्षण व इतरांचेसुद्धा घटनेत अपेक्षित आहे ते यशाशक्ती आचरणात आणले गेले पाहिजे.मग करणार ना प्रयत्न?  

उत्सव तीन रंगांचा, आभाळी रोज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश घडविला

भारत देशाला मानाचा मुजरा!

 

!!  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव