असाही एक पॉटलक (अंगत-पंगत)
शाळेत असताना एखाद्याने डबा आणला नसेल तर आमच्या बाई सगळ्यांना त्यांच्या डब्यातला एक घास डबा न आणलेल्याला द्यायल्या सांगायच्या. तो प्रत्येकाचा एक एक घास बनून एवढा मोठा होत असे की त्याचे पोट भरुन इतर अनेकांचे पोट आरामात भरत असे. त्या मिश्र खाण्याची मजा यायची. वेगवेगळ्या चवी पदार्थ, प्रकार खावयास मिळायचे तिच गोष्ट बिल्डींग मधला एखादा मुलगा किंवा मुलगी काही कारणाने एकटी रहात असेल तर तिला / त्याला खाऊ देण्यासाठी वेगवेगळे प्रकार सगळ्या घरातून पोहचायचे. या सगळ्यांचे प्रेम बघून ती किंवा तो भारावून जात असे आणि वेगवेगळ्या चवी / पध्दत / प्रकार खाऊन समृध्दपण होत असे. त्याचाच परिणाम म्हणून तो किंवा ती अन्य वेळी इतरांना मदत करायला तत्पर असे.आता असे शक्यतो कोणी करायला जात नाही कारण खाजगीकरण हा मुद्दा अभिप्रेत असतो.
पॉटलकचा अर्थ
असा दर्शवतो की विशेष तयारी न करता जे शिजवले जाईल ते अन्न परंतू मला वाटते ते असे
नाही. यामध्ये प्रत्येकजण आपआपल्या आवडीनुसार सोईनुसार ठरवून एका विशिष्ट हेतूने
एकत्र जमतात. त्यामागे हेतू असा कोणाला एखाद्याला अतीश्रम होऊ नये. कामाची विभागणी
होऊन वेगवेगळ्या चवींची विविधता अनुभवावी आणि एकत्र खाण्याचा आणि बनविण्याचा आनंद
एकमेकांनी एक्मेकांसोबत मजा अनुभवावी. जेणेकरून परस्पर सामंजस्य वाढावे. असे अनेक पॉटलक
शाळेत,कोलेजमध्ये,कार्यालयात किंवा इतर ठिकाणी आयोजित केले जातात व त्याचा आस्वाद दिला
व घेतला जातो. यासाठी कधी कधी स्पर्धासुद्धा काही ठिकाणी आयोजित केल्या जातात,वेगवेगळया
थीम्स(themes) दिल्या जातात.
गेली 15-20 वर्षे आमच्याकडे भाऊ-बहिणीची
एकत्र भाऊबीज साजरी होते. त्यात बहीण-भावजया अगदी भाऊसुध्दा सामिल (प्रायोजक) होत असतात.
त्यानिमित्याने सगळेजण एकत्र जमतात, वेगवेगळे प्रकार बनवून किंवा तयार घेऊन येतात.
सगळ्या प्रकारांचे कौतूक होते. वेळ,श्रम वाचतात आणि परस्पर आपुलकी वाढीस लागते.
दुसरी गोष्ट मिश्र भाज्यांची, ज्याला कोकणीत “खदखदे” म्हणतात. आताची संक्रांतीच्या
भोगीची भाजी, ऋषिपंचमीची मिक्स भाजी, कुर्मा, पावभाजी व अगदी उंदिओसुध्दा अनेक
भाज्यांची चव एकत्र अनुभवता येते. अनेक विटामिन्स, आंबट-गोड, तिखट चवींचा एकजीव
केल्यानंतर जे मिश्रण तयार होते त्याची चव वेगळीच असते,त्याला तोड नाही. तसेच गावी
पातळ भाजीमध्ये कोलंबी,बोंबील,छोटे मासे ( सुके किंवा ताजे ) घालुन जी मिश्र-भाजी
करतात (घाळणे) तीसुद्धा खूप जणांना आवडते.
दही-काला हे एक छान याचे उदाहरण आहे. जे
संस्कृतीक प्रतिक आणि उत्सव म्हणून साजरा केला जातो तो “पोंगल” सुध्दा आपल्याला हेच
शिकवतो. फरक एवढाच असतो की पोंगलमध्ये भाताचे विविध प्रकार असतात. “एक व्हा आणि एकत्र येऊन एकीचा रंग दाखवा” असेच
हे जणू शिकवत असतात. कुणा शत्रूलासुध्दा डोळे वटारता येणार नाहीत किंवा एकी तोडता
येणार नाही हे याचे फलीत असावे.एकतेचा हा संदेश भाजी,फ़्रुट-सॅलड आणि ईकेबाना यातुन
अनेक प्रकारे देण्याची ही कल्पना ज्याला सुचली असेल त्याला/तिला मानले पाहिजे. आठवड्याच्या
शेवटी आई कधी कधी अशी मिश्र भाजी बनवायची तेव्हा ती खुप आवडायची. एक वेगळी चव आणि
बचत दोन्ही साध्य व्हायचे. रोज थोडी थोडी भाजी किंवा अगदी एक-एक तुकडा बाजूला
ठेवला जायचा आणि त्याचा शेवट असा गोड व्हायचा. नावडत्या भाज्यापण पोटात जायच्या हा
एक खात्रीशीर मार्ग म्हणता येईल. ( यात कारली
कार्लीसुद्धा असायची ).
आपले शरीर, मन हेसुध्दा एक प्रकारचे पॉटलक आहे. वेगवेगळया भावना, विचार, कृती यांचे मिश्रण तयार होऊनच आपण त्याप्रमाणे वागत असतो. त्याचेच प्रतिबींब आपल्या चेह-यावर आणि व्यक्तीमत्वावर उमटत असते. हात दोन दिलेत पण कामे किती प्रकारचे करतो. पाय दोनच असतात पण कितीही, कसेही, केव्हाही आणि कधीही चालू शकतो. असेच इतर अवयवांच्याबाबतीत म्हणता येईल. “मर्यादित साधने अमर्यादित साध्य” बरोबर अर्थशास्त्राच्या अनुषंगाने पैसा कमी आणि त्याचा विनियोग जास्त, अमर्यादित गरजा पण पुरी करण्याची क्षमता मर्यादित. देवाला बहूधा अर्थशास्त्र कळत असावे म्हणूनच तो आपल्याकडून संसाराचा हा सगळा खटाटोप करून घेत असावा. तुम्हाला काय वाटते? माणसांची अंगतपंगत होत नाही, विचारांची सरमिसळ होत नाही, एकमेकात गुंतून “रंग माझा एक” अशा व्यक्तीपण असतात ना! एका विशिष्ट ध्येयाने एकत्र येताना तिथे रंग, पोषाख, जात आणि धर्म काहीही न बघता एकी निभावतात ना! बघा विचार करा.
Potluck Cha nimitane baryach Americans na bhartiye jevanacha aswaad deta aala!!!
ReplyDeleteYes thank you for sharing your experience 👍🙏
DeletePotluck lekh aavadla..Veg...Non-veg bhajyanchi taste kashi visarnar? ..Ekatra yene aani ekicha rang dakhavne he matra kami hote aahe.
ReplyDeleteKhoop chan comment.
DeleteDhanyawad,pan nav nahi lihile!🙏👍
पॉटलक . अप्रतिम
ReplyDeletedhanyaad Saheb! please write your name in every article.
Delete