विहीण बाई विहीण बाई उठा आता उठा
विहीण बाई विहीण बाई उठा आता उठा
भातुकलीचा सा-या तुम्ही
केला चट्टा मट्टा !
हे आठवणीतील गाणी या सदरात ऐकल्यावर माझे मन बालपणात गेले. शाळेत असताना माझी एक मैत्रिण हे गाणे हावभाव करून म्हणायची म्हणून फार मजा वाटायची. तेव्हा अर्थ कळत नव्हता पण भातूकली खेळताना किंवा कधी शाळेत वेळ असतांना म्हटले जायचे.
आता प्रत्यक्ष
जीवनात आजूबाजूच्या विहीणबाई बघून कधी मजा कधी आश्चर्य तर कधी दु:ख वाटते. विशेषत: एवढ्या तेवढ्या
कारणांवरून रुसवे-फुगवे चालतात तेव्हा! खरं तर हे नाते देवघेवीचे (देवाण-घेवाण)
असूनही त्यात स्वार्थ का केला जातो ते कळत नाही. मुलगी दिली जाते, जावई येतो आणि
सुन येते, मुलगा जातो. असे हे म्हटले तर बार्टर सिस्टीमचा (विनिमय प्रणाली) एक भाग म्हणता येईल.
दोन कुटूंबे, मने व समाज जोडणारे हे नाते जीवनात सेतू बांधायचे काम करीत असते.
म्हटले तर क्रोस कनेक्शन आणि म्हटले तर जीवा-भावाचे नाते पण होऊ शकते कारण दोघींनी
आपआपल्या काळजाच्या तुकड्यांचे हस्तांतरण केलेले असते फक्त मुलीची जागा बदलते आणि
मुलगा मात्र तिथेच असतो अपवाद फक्त केरळचा.
हल्ली पुर्वीसारखे लग्नात मानापमानाचे नाटक होत नाही.
हसतखेळत नाचत लग्ने पार पडतात. एकत्र रहाण्याचा प्रश्न नसतो त्यामूळे जो काही
कालावधी असतो त्यात एकमेकांचे कौतूकच जास्त होते. उणिवा दाखविणे किंवा काढणे याचा
प्रश्न उदभवत नाही. माझ्या पिढीच्या लोकांना मात्र आई-सासू यांच्यामध्ये आपुलकीचे
नाते असावे असे वाटते. काही ठिकाणी काहीजण रहातातही तशा. एकत्र फिरायला जाणे, एकमेकांच्या
गावी जाणे, चित्रपट, नाटक इत्यादीला सोबत जाणे, परदेशी सहल आयोजित करणे, अशा अनेक
गोष्टी परस्परांच्या विचारविनीमयातून आखल्या जातात. खरंच हे नाते किती छान मैत्रीचे
असू शकते याची अनेक उदाहरणे सांगता येतील.
नाहीतर
पुर्वीच्या काळातील विहीणबाई शक्यतो लग्न समारंभाव्यतिरीक्त एकमेकांना भेटण्याचा
प्रश्न येत नसे. प्रसंगानुसार एकमेकांना भेटी देणे, सणानिमीत्त मानपान यातच त्या
गुंतून पडत. घराच्या बाहेर सहसा न पडल्यामूळे नवीन नाते विकसित करायला काही वाव
उरत नव्हता. पुर्वी जावई येणार म्हणून मोठी धावपळ असायची. त्यांना काय आवडते याची
तपशिलवार माहिती घेऊन त्यानुसार स्वागत केले जायचे. जावयाचा आणि वरमाईचा मान राखला
जायचा. नात्यात वरमाईचा वरचष्मा कायम असायचा आणि मानपान करून घेणे यात त्यांना
कमीपणा वाटायचा नाही. त्यामूळे नकळत नात्यामध्ये काही अंतर रहात असे. त्याबद्दलच वरील गाण्यातून अंतरीचा भाव अवखळपणे व्यक्त केलेला आहे.
हल्ली मुलीपण
आईची आणि सासूची जबाबदारी खंबीरपणे हाताळताना दिसतात. जावईसुध्दा स्वत:च्या घरात
सासूचे स्वागत तेवढ्याच उत्साहाने करीत असतो. शिवाय परदेशवारीपण काहीना काही कारणाने
होतच असते त्यामूळे हे नाते हळूहळू मूळ धरुन,सुदृढ होत जाते. मुलीच्या घरी रहाणे
हा काही जणांना कमीपणा वाटतो परंतू कालौघात या रुढी - परंपरा सोडून देणे हेच योग्य
ठरते. वेळेला जे नाते उपयोगाला पडते तेच महत्वाचे. असेही आपण दुस-यांबरोबर जुळवून
घेतच असतो मग जावई किंवा सून का नको. विशेषत: स्त्रियांनी या गोष्टीवर विशेष
प्रयत्न केला पाहिजे.
कोणतेही नाते टिकण्यासाठी लागणारा जिव्हाळा, प्रेम आणि माणुसकी उपयोगी पडते. आज भलेही विभक्त कुटूंबपध्दती स्विकारलेली असली तरी या नात्यामध्ये मात्र आपलेपणा टिकून ठेवल्यास भावी पिढी समोर आदर्श जपला जाईल. शेवटी दोन्ही घरे सांभाळून समाजात सामंजस्य निर्माण करणे व दोन पिढींमधले अंतर कमी करणे हे महत्वाचे ठरते. काय वाटते तुम्हाला?
“विहीण बाई विहीण बाई उठा आता उठा” या गाण्याची व्हिडीओ लिंक सोबत खाली जोडत आहे.https://www.youtube.com/watch?v=SLr02ZkWi-E
Khare aahe..pan nave naate jodtana donhi paksha ..mag varpaksha Kinva vadhupaksha aso.. lagnakarya vyavasthit paar padne ..Jamel tashi hausmauj karne ..aani Mulga Kinva Mulgi yana settle karun dene yakade pakshacha kal asto.Natyat aaplepana tikavne ha doghancha prayatna asto...pan pan..Don pidhimadhil antar kami vhayla paahije pan te hot naahi..
ReplyDeleteDhanyawad 🙏khare ahe name please
Deleteखरे तर हे नाते समजून उमजून घेतले तर फार गोड नाते आहे..वरमाईने थोडा मी पण बाजूला केला तर निश्चितपणे हे नाते मधूर होऊ शकते..पण आजही ग्रामीण भागात वर माईचा वरचष्माच असतो..व वधूमाय तैनातीला सदैव खडी असते...
ReplyDeleteमी स्वतः माझ्या विहीणबाईंशी मैत्रीचे नाते प्रस्थापित केलेय...
Khoop chan comment.
DeleteDhanyawad Sheela🙏
नात्यांचे जुने रूप आता पुष्कळच बदलले आहे
ReplyDeleteDhanyawad,aple nav kalale tar bare hoil.
Delete