नदी आणि मानव

               त्यानंतर 30 वर्षानी डिसेंबर-21 मध्ये नाशिकला जाणे झाले. नाशिकला गोदावरी नदीचे मंदीर बांधलेले आहे. तसेच काठावर अन्नदान केले जाते तशीच गोदावरी नदीची ओटी भरुन पुजा केली जाते. सगळ्या आठवणी मनात पुन्हा: दाटून आल्या. गंमत म्हणजे जेव्हा आम्ही 1988 मध्ये हरिद्वार आणि ऋषिकेशला गेलो होतो तेव्हा गंगा नदीत मी स्नान केले नाही. चार थेंब डोक्यावर शिंपडून घेतले. त्याचे एक कारण माझी पाण्याविषयीची भिती आणि नदीची अवस्था (गर्दी, घाण, आणि सगळे विधी उरकणे इ.)  मात्र त्या  गंगा नदीचे रौद्र स्वरूप ऋषिकेशला बघायला मिळते. तशी एक बिहार मधील कोसी नदी “बिहारचे अश्रू” म्हणून ओळखली जाते,जिच्या पुराने कायम मनुष्य जीवन उध्वस्त होते. खरं तर याचे शास्त्रीय कारण हिमालयातील बर्फ उन्हाळ्यात वितळल्यामूळे सगळ्या उत्तरे कडच्या नदींना पुर येतो. हेच पाणी सपाट प्रदेशात मोठ्या प्रमाणात आल्यावर नदीचे पात्र बदलते त्यामूळे अनर्थ होतो. त्याऐवजी हेच पाणी योग्य ठिकाणी अडविले तर अनर्थ टळू शकतो. उत्तरेकडील नदी दक्षिणेला नदी जोड प्रकल्प राबविला असता तर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली नसती. दुसरा प्रश्न  आंतर-राज्य पाणी तंटा / पाणी वाटप हा  एक गहन प्रश्न देशासमोर आहे आणि तिसरा प्रश्न धरणे बांधलीतर विस्थापितांचा प्रश्न !  नर्मदा बचाव आंदोलन यासाठी सर्वश्रूत आहे.

          आमच्या सदाशिवगड-कारवारची एक मजा आहे. गोवा मांडवी नदीच्या बाजूला आहे तर काळी नदी अरबी समूद्र जेथे मिळतो तिथे सदाशिवग़ड-कारवार गाव वसविले आहे. काळी नदीवर पुल बांधणे हे एक मोठे आव्हान होते,त्यासाठी पुल बांधायला बरीच  वर्ष लागली. बार्ज- बोटी पुर्व पश्चिम जाण्यासाठी याव्यतिरीक्त कोणतीही सोय नव्हती. आता त्याच नदीवर आणखी एक नविन पुल बांधून तयार झाला आहे. त्या पुलावरून काळी नदी आणि समूद्र संगमाचे मनोहर दृष्य बघायला मिळते. काळी नदीचे पाणी खोल आहे आणि काळया वाळूचे प्रतिबिंब पाण्यात दिसते म्हणून ती काळी नदी, हा फरक पुलावरून बघताना लक्षात येतो.

        नदी हे शांत वहाण्याचे प्रतिक आहे. तसेच घाण, कचरा पोटात घेऊन, शेवटी तिला समूद्राला भेटायचे असते. हा सोशिकपणा आणि समर्पण हा नदीचा गुण स्त्रीसाठीपण सर्वोत्तम मानला जातो. पुर्वीच्या काळी मनुष्य नदीच्या काठाने वस्तीला रहायचा. पाणी हे जीवन त्यामूळे पाण्याचा प्रश्न अनायसे सुटायचा. तसेच शेतीसाठी पाणी व नदीतील जलचर प्राणी खाण्यासाठी उपलब्ध होत असे. नदीच्या काठाकाठाने अनेक संस्कृतीचा उदय झाल्या त्यावर जीवन अवलंबून असल्यामूळे नदीला मातासमान मानतात.  तसेच पाण्यातील वहातुकीचे साधनामूळे दोन टोक किंवा किनारे जोडले जायचे. आपआपसातले दळणवळण सुलभ होत असे. परदेशातसुध्दा काही मोठ्या नद्यांवर मोठे-मोठे प्रकल्प राबविले जातात.

             मला नदीचे विशेष आकर्षण म्हणजे प्रत्येक प्रवासात एक तरी नदी बघायला मिळते जसे की, नांदेडहून मुंबईला येताना गोदावरी, मुंबई वरून बेळगावला जाताना घटप्रभा, मुंबई वरून पेणला जाताना भोगावती नदी, मुंबई कारवारच्या प्रवासात तर अनेक नद्या बघायला मिळतात. सन 1988 साली उत्तरेला गेलो तेव्हा अनेक नद्या व संगम बघायला मिळाले. जसे की अलाहाबाद जेथे गंगा, यमुना आणि सरस्वती.  लहानपणी प्रवासात नदी दिसताच आई पैसे देऊन नदीत घालायला द्यायची, त्याची एक वेगळीच मजा होती.  सर्व दोष पोटात घालून संसार चालवणे हे कदाचित स्त्रिया नदीकडून शिकल्या असाव्यात. नदीवर आंघोळ, कपडे धूणे आणि इतर स्त्रियांबरोबर सुख: दु:खाची देवाणघेवाण करून मन हलके करणे, हितगूज साधून एकमेंकाच्या कुटंबाची विचारपुस करणे इत्यादी सर्व नदीच्या साक्षीने होत असे. नदीची पुजा आणि महात्म्य पुराणातसुध्दा वर्णन केलेले आहे.

                 आपण माणसे मात्र हल्ली नदी प्रदुषित व आकुंचित करणे हेच महान कार्य समजतो.  सन 2005 ला मुंबईने मिठीचा हिसका बघितला होता. भारतात मोठ्या प्रमाणात नद्या असून शेती आणि पिण्याच्या प्रश्न काही सुटत नाही. त्यासाठी नदी जोड प्रकल्प यशस्वीरीत्या राबविणे, नदी स्वच्छ आणि प्रदुषण विरहित ठेवणे, नद्या जवळील अतिक्रमण थांबवणे इत्यादी अनेक योजना यशस्वीरीत्या राबविल्यास गोड पाणी सगळ्यांना समन्यायी वाटपाने उपलब्ध होऊ शकेल. तसेच निसर्गाची समृध्द परंपरा वरदान आपण जपल्याचे पुण्य मिळेल. तुम्हाला काय वाटते ते जरूर कळवा.    

 



Comments

  1. फार सुंदर अवलोकन. नदी जवळून पहाणे हे फारच आनंददायी . पण पर्यावरणावर मनुष्याने केलेले अत्याचार पाहिले तर मन विषण्ण होते. आपला पर्यावणावराचा अभ्यास फार छान आहे.

    ReplyDelete
  2. खूप छान अभ्यासपूर्ण लिखाण

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव