कथा वसंत पंचमीची

                                                 या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ॥

या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता ।

    सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्या पहा ॥

         ही प्रार्थना आम्ही शाळेत असताना रोज म्हणायचे, सुंदर शुभ्र मुर्ती बघून प्रसन्न वाटायचे. नवरात्रात तिची पुजा व प्रसाद वाटप व्हायचे. विद्यार्थीदशा संपली आपण सरस्वतीला विसरतो. कधीतरी शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार किंवा सत्कार असेल तर तिची आठवण होते. आताच्या तेलंगण राज्यात, बासर तालूक्यात, महाराष्ट्राच्या  सीमेवरील नांदेड  जिल्ह्यामधील धर्माबाद जवळ आहे.  लहान असताना वडील मुद्दाम सरस्वती मंदीर दाखवयाला घेऊन गेले होते.

        आज  दि. 5 फेब्रुवारी,2022  माघ पंचमी वसंत पंचमी अर्थात ज्ञान पंचमी. ज्या देवीने सृष्टीतील जीवांना वाणी बुद्धी, कला-साहित्य संगीत प्रदान केलेय त्या सरस्वती मातेचा आज जन्मदिवस. आजच वसंतोत्सवाचा प्रारंभही मानला जातो.

           सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली होती. ज्यात कुठलीही वाणी नव्हती. हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते. तेव्हा ब्रह्मांनी प्रभू विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले. धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली.  जिच्या एका हातात वीणा, मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होती. ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा वीणाच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीव-जंतूंना वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली. वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवच्या रूपात देखील साजरी केली जाते. या देवीला बागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी और वाग्देवी यासह अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पुजलं जातं.  तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली.

             बुध्दीची देवता म्हणून गणपती, पैशाची देवता म्हणून लक्ष्मी आणि विद्येची देवता म्हणून सरस्वती म्हणून यांचा एकत्र फोटो पहावयास मिळतो परंतू विद्येचे उपासक फार कमी असतात. “विद्या” गरींबांवर प्रसन्न असते तर श्रीमंतांना “लक्ष्मी” प्रसन्न असते असे म्हणतात. या दोघांच्या प्रसन्नतेची बुध्दी वापरून त्याचा योग्य ठिकाणी उपयोग करणे हे प्रत्येकाचे वैयक्तिक तसेच सामाजिक यश असते.

           ब-याच गोष्टींमूळे लक्ष्मी प्राप्त करणे तसे सोपे झाले आहे परंतू विद्या आणि बुध्दी मात्र कष्टाने कमवावी लागते किंवा नैसर्गिक देणगी असू शकते. कधीकधी पिढीजात वारसा असतो. मेहनत व संस्काराने विद्येचा वापर चांगल्या कामासाठी करणे हे एक आव्हान असते. त्यासाठी योग्य दिशा आणि परिस्थिती प्राप्त करणे किंवा असणे हे मोठे भाग्याचे ठरते. तशी इच्छासुध्दा असावी लागते.

              तरूणांच्या मनांत असा एक गैरसमज असतो की आपल्या हुशारीला इथे वाव मिळत नाही तेव्हा परदेश गाठला पाहिजे.  विशेषत: भारतासारख्या विकसनशिल राष्ट्राला ही समस्या जास्त भेडसावते. जर इथे संधी निर्माण झाल्या तर परदेशी जाण्याचे आकर्षण कमी होईल. सगळ्यांना परदेशी जाणे शक्य नाही.  परदेशात आणखीन वेगळ्या समस्या असतात.

          विद्या विनेयन शोभते. एक वेळ जीवनात धनाची चोरी किंवा प्रसंगानुरूप कमी होऊ शकते पण विद्येचे तसे नाही. विद्या एक  ज्ञान आहे त्याने मन स्थीर आणि विवेकी होते. सकारात्मक बुद्धी लाभली तरच जीवनात सुख, समृद्धी  आणि दिर्घकाळ ऐश्वर्य प्राप्त होते. श्री सरस्वती देवीच सृजनशक्ती बहाल करते. निसर्गातील सर्वच जीवजंतूंचे जीवन संगीताशिवाय अपूर्णच. सरस्वती देवीच्या विणेतूनच संगीत प्रकटलेय. देवीनेच मानवी जीवनात कला,  साहित्य, संगीत फुलवलेय.  आज ज्यांच्यावर सरस्वती मातेची कृपा आहे त्यांचे नाव जगात अजरामर झालेय मग क्षेत्र कोणतेही असो. आपणावरही सरस्वती देवीची सतत कृपा राहो, ही ईश्वर चरणी प्रार्थना.



 

Comments

  1. छान लेख. सरस्वतीची मंदिर फार दुर्मीळ आहेत. बासरच तर फार प्रसिद्ध आहे.

    ReplyDelete
  2. Sundar Lekh. Shalechya Divsanchi Aathwan Jhali. Sarswati Devishi Ekach Prarthana Asel Ki Saglyana Sadbuddhi Milavi Ani Dnyanache Prakash Pratyek Vyaktiparyent Pohochave!

    ReplyDelete
    Replies
    1. Khup chan response, dhanyawad 🙏👍

      Delete
  3. Khoopach Sundar Mel aahe Ganpati Saraswati ani laxmi. Tinhi devtanchi krupadrishti aaply sarvanchya mhanjech vachnaryanchya kutumbiyavar raho ashi Ishwarcharni Prarthana

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyawad 🙏 comments & blessings also nice!👍

      Delete
  4. खूप छान माहितीपूर्ण लेख.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव