प्रेम म्हणजे नक्की काय असते?
प्रेम म्हणजे: आईच्या पोटातून आईच्या कुशीपर्यंतचा प्रवास,
निःस्वार्थ असा सहवास ! मैत्री जीवापाड जपणे !
आपली व्यक्ती आजारी पडल्यावर मिळालेला धीर,
चुकीच्या मार्गावर जाऊ नये
म्हणून न दिलेली ढील !
समर्पण, त्याग आणि नकळत एकमेकांशी जोडलेली अनमोल नाळ !
-स्नेहा शिरोडकर
माझ्या मैत्रिणीच्या मुलीने”प्रेम
म्हणजे नक्की काय असते” याचे कवितेतून दिलेले उत्तर सर्वाथाने योग्य आहे असे
वाटते. आताचे 14 फेब्रुवारीचे महत्व मात्र उगीच नको त्या दिशेने जात आहे. व्यवहारी जगात बाजार ओथंबून वहातो. लोकांच्या
भावनांना दिलेले एक आव्हान असे म्हणता येईल. व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस
म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या
आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. पैसा आहे
तर तो खर्च करायला काही तरी निमीत्त हवे असते या मानसिकतेला दिलेला दुजोरा असे
म्हणता येईल. सौदर्यवती मधूबालाचा जन्म दिन 14 फेब्रुवारी, 1933 आहे. याच दिवशी वर्ष
2019 मध्ये पुलवमाचा हल्ला होवून आपले 40 जवान शहीद झाले यांमूळे आता बरेच जण 14 फेब्रुवारी हा दिवस
“शहीद दिवस” म्हणून साजरा करतात आणि भ्रमणध्वनीवर डिपी / स्टेटस ठेवतात.
आपल्या आणि पाश्चिमात्य संस्कृतीतला
फरक जाणून घेतला तरी बराच फरक पडेल. आपण प्रेमाचे प्रदर्शन नाही करत तर ती जाणीव
ठेवतो. आकर्षित करणे, पैसा, समृध्दी आणि
प्रदर्शन या पेक्षा आपण भावनेला जास्त महत्व देतो. व्यवहार महत्वाचा की, मनापासून
दाद देणे महत्वाचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असू शकतो पण हे देणे घेणे करावेच किंवा
त्याची अपेक्षा ठेऊन “14 फेब्रुवारी” हा दिवस साजरा करणे हे मला चुकीचे वाटते.
कित्येक घरात यामूळे वाद विवाद, संघर्ष होऊ शकतो. दोन पिढीमध्ये, मनामध्ये अंतर
निर्माण होऊ शकते. भेटवस्तू देणे किवा घेणे कितपत मनाला पटते हा एक संशोधनाचा विषय
ठरू शकतो. त्यासाठी एका दिवसाचे निमित्त शोधायचे हा एक वेडेपणा वाटतो. काहीजण म्हणतील उद्याचे कोणी बघितले आज मजा
करुन घ्या, आजचा दिवस महत्वाचा.
खरेच हे आवश्यक आहे का? त्या ऐवजी
आपण आपले लक्ष शिक्षण, नौकरी, विकास, महत्वाकांक्षा, सहकार्य आणि प्रगती याकडे दिले
तर जास्त योग्य होणार नाही का? वर्षानुवर्ष प्रेम करणारे आपल्या अवती-भवती असतात
त्यांचा कुठे सत्कार करतो, आभार मानतो, किंवा
त्यांच्या बद्दल कृतज्ञता बाळगतो? जर ही जाणीव आपण बाळगत नाही तर एक दिवस तरी
“प्रेमाचा दिवस” म्हणून का साजरा करायचा? एक वेगळा प्रयत्न करून बघुया का यासाठी?
जे लोक आपल्या प्रेमींसोबत आहेत, ते हा दिवस दणक्यात साजरा करतात मात्र जे एकटे आहेत त्यांच्यासाठी हा दिवस दु:खाचा असतो. गुलाब किंवा इतर प्रेमाच्या वस्तू (फुगे, टेडीबीअर, शुभेच्छापत्र, केक) या ऐवजी एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करुया का? आपला छंद असेल तर तो जपूया का? जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस 'प्रेम दिवस' म्हणून साजरा होतो मात्र आतापर्यंत या दिवशी कधीच कुणी 'माझं स्वतःवर खूप प्रेम आहे' असं म्हटलेलं नाही ते तरी आपण रोज म्हणूया का?
गरजू व्यक्ती किंवा ज्यांच कुणी नाही अशांना मदत करून हा दिवस साजरा करण जास्त चांगल.
ReplyDeleteKhoop chan!
DeleteDhanyawad 🙏