परदा है .. परदा न उठाओ. .. (हिजाब)
“परदा है .. परदा न उठाओ. .. हे सन 1977 मधील अमर अकबर ॲन्थोनी हिंदी चित्रपटातील रफी साहेबांचे गाजलेले गाणे होते. ही ऋषिकपूरची कव्वाली आता आठवण्याचे कारण, जो “हिजाब” वरून कर्नाटक आणि इतर ठिकाणी चाललेला गोंधळ. लोक उलट सुलट समाज माध्यमवावर, दूरदर्शनवर चर्चा करून, चूकीचा अर्थ काढून समाजमन गढूळ करतात. धर्मासंबंधातील बातमी व्हायरल व्हायला आणि त्याचे पडसाद उमटायला हल्ली वेळ लागत नाही. (निवडणूकपुर्व काळात मुद्दाम केले जाते असे वाटते.) यामुळे निरपराध लोकांना त्रास आणि सरकारी खाजगी मालमत्तेची हानी होते. समाजात तेढ निर्माण होऊन मन कलूषित होतात. खरंच, ही गोष्ट एवढी वाद घालण्यायोग्य आहे का?
भारताने जरी धर्म-निरपेक्षता स्विकारलेली
असली तरी शैक्षणिक ठिकाणी शाळेचा “गणवेश” या एकाच नियमाला सगळेजण बांधिल असतात. याला
विरोध करणे किंवा समर्थन करणे अपेक्षितच नाही. आपल्या जुन्या पध्दती कालबाह्य ठरवून
उच्चाटन केले आहेत. जसे की, नमस्कार करणे, पोशाख, रीतीभाती, पाश्चात्यांचे अंधानुकरण,
सुधारिक म्हणून जून्या मतांचा अनादर केला जातो. या सगळ्यांमूळे आपली मूळ संस्कती
लयाला जात आहे असे वाटते.
शैक्षणिक
पध्दती, कार्यसंस्कृती आणि सामाजिक वर्तणूक सगळे आमुलाग्र बदलले आहेत पण त्यातून
अपेक्षित असलेला फायदा झाला का? वेळ, बचत, समृध्दी हे दिर्घकाळीन फायद्याचे ठरतील
का? त्याचे काही तोटे आहेत का? याचा कोणी विचारच करत नाही. जसे की, अमर्याद किटक
नाशके, खते आणि कृत्रीम उपाययोजना करून आपण कृषि उत्पादने काही कालावधीपुरते मोठ्या
प्रमाणात उत्पादन मिळते पण कृषि उत्पादने आरोग्यदायी असतात का? त्यात किटकनाशकांचे
उर्वरीत अंश असतात. शुध्द हवा, पाणी अन्न
मिळते का? सुख आणि समृध्दी वाढली म्हणून आजारपणे कमी झाली की नवीन आजारपणे निर्माण
झाली? गरीबी, अज्ञान आणि समस्या कमी झाले
का? सक्षम पिढी तयार झाली का? कार्यक्षम व्यवस्थापन होते का?
“ हिजाब”हा डोक्याचा स्कार्फ आहे जो केस,
मान आणि कधीकधी स्त्रीचे खांदे आणि छाती झाकतो. बुरखा हा एक
आच्छादित कपडा आहे जो विविध डिझाइनमध्ये येतो, परंतु
सामान्यत: स्त्रीचा चेहरा आणि डोके पूर्णपणे झाकतो आणि बहुतेक किंवा तिच्या
उर्वरित शरीराला झाकतो. कधी एके काळी बुरखा / हिजाब घालण्याचा
उद्देश अरबस्तानात खूप ऊन, कमाल तापमान आणि वाळूच्या वादळापासून संरक्षण म्हणून
आणि स्त्रीयांची सुरक्षितता या दृष्टीने सक्तीचा करण्यात आला असावा. जर प्रतिकूल
परिस्थितीत त्याचा कोणी गैरफायदा घेत असेल आणि घटनेचा दाखला देऊन ते “योग्यच आहे”
याचे समर्थन करीत असेल तर ते चुकीचे आहे. संततीनियमन आणि द्विभार्या प्रतिबंधक
कायदा जर सगळ्यांना लागू असेल तर त्याचे पालन सगळ्यांनी करावयास हवे कारण कायद्यासमोर
सगळे समान असतात. अल्प संख्यांकाचे फायदे घेताना तोटेही विचारात घेतले पाहिजेत,नाहीतर
एक दिवस असा येईल,अल्पसंख्याक वाढत जाऊन ते बहूसंख्यांक होतील आणि इतरांवर अन्याय
करू शकतील. प्रत्येकाने आपआपल्या धर्माचा जरूर अभिमान बाळगावा पण सार्वजनिक ठिकाणी
अनावश्यकरीत्या इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये.
काही काळ लाड
केले जातात पण नेहमी अपेक्षा करणे चुकीचे आहे,त्यावरून गदारोळ करणे सर्वांनाच घातक
ठरू शकते. हे “हिजाब”बाबतच नाही, इतर अनेक गोष्टींना लागू करण्याची कायद्याने
सक्ती करावी असे वाटते. स्वत:हून आपण जिथे रहातो त्या देशाशी, धर्माशी, लोकांशी
इमान राखलेच पाहिजे. कराची, इराण, बहरीन येथे जाणारे हिंदू लोक बुरखा घालतात
म्हणून इथे सगळ्यांनी साडी घालावी असे काही सक्तीचे नाही. ज्यावरून वेगळेपण आणि इतर
अनेक चुका झाकल्या जातील असे वागू नये एवढी तरी किमान तसदी प्रत्येकाने घेतली पाहिजे
असे वाटते. तुमचे काय मत आहे?
बाय द वे,“हिंदूने संस्कार सोडले म्हणून आम्ही पण सोडायचे का?” असा एक व्हिडिओ समाजमाध्यमावर फिरतो आहे. त्याला उत्तर एवढेच की, कायद्याने समानता आहे म्हणूनच राष्ट्रपती सारखे महत्वाचे पदसुध्दा हुशारीवर अवलंबून आहे. हे फक्त भारतातच शक्य आहे इतरत्र नव्हे,याचाही विचार व्हावा ही अपेक्षा!
100%right!
ReplyDeleteDhanyawad Geetatai 🙏
Deleteएकदम बरोबर लिहिले आहे. आज मतांच्या जोगव्यासाठी अशा अंध चालिरीतीचा पाठपुरावा किंबहुना जबरदस्ती केली जाते. शाळा म्हटलं की गणवेश आलाच. तो घालणं अनिवार्य असावाच. त्यामध्ये लांगूलचालन नसावं, कारण शिस्तच राहणार नाही..
ReplyDeleteDhanyawad Bhau🙏
ReplyDeleteसर्व लोकांनी नियमांचे पालन करायला पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे!
ReplyDeleteसर्व धर्माचां आदर नक्कीच आहे पण अतिरेक होऊ नये!
ReplyDeleteधन्यवाद!