युगांन्त
दि. 23-01-2022 ते 06-02-2022 या कालावधीत ऐक ऐक युगाचा अंत झाला असे वाटायला लावणा-या घटना या दिवसात घडून गेल्या. (1) किर्ती शिलेदार ) (जेष्ठ रंगकर्मी आणि नाट्यगीत गायिका),(2) रमेश देव (चित्रपट,नाटक आणि दुरदर्शनवरील प्रख्यात अभिनेता,आणि (3) भारत रत्न लता मंगेशकर जगप्रसिध्द पार्श्वगायिका.
ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यगीत गायिका विदुषी किर्ती शिलेदार (1952 ते 23 जानेवारी, 2022)
संगीत नाटकाला ध्यास व श्वास मानून गेली ६० वर्षे अव्याहतपणे रंगभूमीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी, गायिका विदुषी किर्ती शिलेदार यांचं आकस्मिक निधन झालं. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं. मागील ६० वर्षांत आपल्या चतुरस्र अभिनयाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवला होता. जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिले. देशविदेशातून त्यांनी 1900हून अधिक संगीत मैफिलीही गाजवल्या. सन २०१८ साली पार पडलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. गेल्या दोन दशकांतील महाराष्ट्राच्या ठळक सांस्कृतिक परंपरेतील एक म्हणजे मराठी संगीत रंगभूमी. या लखलखत्या परंपरेतील एक महत्त्वाचा दुवा कीर्ती शिलेदार यांच्या निधनामुळे निखळला आहे.
आई वडीलांनी सांगितलेल्या संगीत
नाटकांच्या आठवणीतून नाट्यगीतांची गोडी
लागली. स्वयंपाकाची गोडी लागली नाही. त्याला अनुमोदन आत्याकडून मिळायचे. ब-याच
नाटकांची ओळख लहानपणी झाली होती. नंतर मात्र हळूहळू संगीत नाटकाची गोडी कमी झाली
आणि आम्ही या आनंदाला मुकलो. संगीत सौभद्र, शाकूंतल, संगीत स्वयंवर, एकच प्याला,
संगीत शारदा अशा अनेक नाटकातील भुमिका कीर्ती शिलेदार यांनी समर्थपणे केल्या. “(1) ख-या तो प्रेमा ..., https://www.youtube.com/watch?v=iAnoejFmjCI
(2) कशी केलीस तु माझी दैंना ... (3) प्रभू आजी
गमला .. (4) हरीची एकताच मुरली .. (5)
तुझ्या वाचून मी दीन होणार नाही. .. (6)
नाही मी बोलत नाथा .. https://www.youtube.com/watch?v=7TWdgn19RKI&t=58s अशा अनेक
नाट्यसंगीताने बालगंधर्वापासून ते किर्ती शिलेदार पर्यंतचा नाट्य संगीत व संगीत
नाटकाचा अंत झाला असे वाटते.
अष्टपैलू अभिनेते रमेश देव (30 जानेवारी, 1929 ते 2 फेब्रुवारी, 2022):-
अभिनेते रमेश देव हे एक अष्टपैलू अभिनेते
होते. त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका अनेक भाषेत चित्रपट, नाटक आणि दुरदर्शन येथे
साकारत जनमानसावर आपली एक विशिष्ट छाप पाडली आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील एक देखणा अभिनेता
अशी त्यांची ओळख होती. अभिनेता असो किंवा खलनायक या दोन्ही प्रकारच्या भूमिकांना
त्यांनी तितकाच न्याय दिला आहे. त्यांनी सीमा देव या नामांकित अभिनेत्रीशी
लग्न केले. https://www.youtube.com/watch?v=NTnmpvviTbI अभिनय, निर्माता आणि दिग्दर्शक
अशा
अनेक क्षेत्रात त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. आदर्श संसार आणि एकत्र
कुटूंबाचे उत्तम उदाहरण त्यांनी चित्रपट सृष्टीसमोर ठेवले. राज्य आणि राष्ट्रीय
स्तरावरचे अनेक पारितोषिके त्यांना मिळाली.
दुरदर्शन वरील मालिकेत केलेले काम उल्लेखनिय ठरले. त्यांचा हा उत्साह,
कामाची तळमळ एखाद्या तरुणालासुद्धा लाजवेल अशी होती. एक कलाकार म्हणून शेवटपर्यंत
रंगभूमीवर काम करण्याची ईच्छा,गायनाची आणि पियानो वादनाची रिहर्सल करताना दिसून
येते. आज ते या जगात नाहीत पण त्यांच्या आठवणी अभिनयाच्या रूपातून आपल्यात नेहमीच
जिवंत राहणार आहेत.
रमेश देव यांच्या चित्रपटातील “सुर तेच छेडीता ..” हे अजरामर गाणे अनुभवण्यासाठी गाण्याची लींक सोबत जोडत आहे. https://www.youtube.com/watch?v=__8eyXyXkOo
भारतरत्न लता मंगेशकर
जगप्रसिध्द गायिका (28 सप्टेंबर, 1929 ते 6 फेब्रुवारी, 2022)
लता मंगेशकरांचा जन्म मध्यप्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया
नंतर हेमा हे नाव होते. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच प्रसिध्द नाट्यकलावंत होते.
लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे
आहेत. लता मंगेशकर म्हणून या एक प्रसिध्द भारतीय गायिका
आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक
म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या
कारकीर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि
क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या. लता मंगेशकरांनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि
काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्यांना त्यांच्या
संपूर्ण कारकीर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. सन १९८७ मध्ये त्यांना भारत
सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला.
सन 1999 मध्ये, मंगेशकर यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नामांकन देण्यात आले. लता मंगेशकर
मेडिकल फाउंडेशन (ऑक्टोबर 1989 मध्ये मंगेशकर कुटुंबाने स्थापन केलेले) द्वारे व्यवस्थापित
केलेले, पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना केली आहे.
देशासाठी त्यांच्या
योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. सन
२००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ
ऑनर"ने सन्मानित केले. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म
जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच
इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या
पहिल्या भारतीय होत्या.
लता मंगेशकरांनी “नाचू या गडे,
खेळू सारी मनी हौस भारी” हे “किती हंसाल (इ.स. १९४२)” ह्या मराठी
चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. लता मंगेशकरांनी
नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी
भूमिका केली. लोकप्रिय चित्रपट महल(इ.स. १९४९)चे “आयेगा आनेवाला” https://www.youtube.com/watch?v=e24S6d4e3QA
हे गाणे लताच्या कारकीर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. १९५० च्या दशकात लता मंगेशकरांनी नामांकित
संगीतकरांची गाणी आणि शास्त्रोक्त संगीतावर आधारितसुद्धा गाणी गायिली. लता
मंगेशकरांनी जगजीत सिंग यांच्यासोबत
गझलांसह काही गैर-फिल्मी गाणी रेकॉर्ड केली. चित्रपटातील "यारा सिली
सिली" या गाण्याच्या सादरीकरणासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट महिला
पार्श्वगायिकेचा तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
सात दशके जिने सगळ्यांना आपल्या मधूर आवाजाने डोलायला
लावले,दुखा:तून बाहेर काढले, जीवनातल्या प्रत्येक घटनेचे समर्थन किंवा स्विकारावयास
भाग पाडले. प्रेम,दु:ख, द्वंद, कारुण्य, अध्यात्म, खट्याळपणा, समाधान, सुख आणि विरह
या सर्व भावना एकाच आवाजात कशा काय व्यक्त होवू शकतात हे सगळ्यांना पडलेले कोडे
अजुन सुटलेले नाही. त्याचे उत्तर फक्त स्वर्गातले गंधर्व देऊ शकतील किंवा कदाचित
असे असावे सर्व मिश्रण बनवून एकच अप्रतिम, स्वर्गीय, “न भूतो न भविष्यती” असा गळा
देवाने तयार केला असावा.
शुन्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे
काय? स्वर-साधना आणि तपस्या काय असते याचे प्रत्यक्ष मुर्तीमंत आदर्श होते. उर्जा
आणि नवचैतन्य, संस्कृती, राष्ट्रप्रेम, शालीनता आणि साधी रहाणी या मूळे त्या कायम
देवीसारख्या भासत. या स्वरांमूळे देशात, परदेशात वातावरण सभ्य, सुसंस्कृत आणि कलह
विरहीत रहाण्यास मदत झाली. गाणी निवडतानांची
त्यांची दक्षता, पार्श्वगायन कुणासाठी करणार याचे भान ठेऊन आणि ते चांगलेच व्हावे
यासाठी कितीही मेहनत घ्यायची तयारी यामूळे त्या लवकरच सर्वांच्या मनात घर करून
राहील्या. इतर क्षेत्रातही क्रिकेट,
फोटोग्राफी, नकला करणे आणि वाचन यातही त्या पारंगत होत्या. विशेषत: फेसबूकवरून
सहकलाकार, गुरू, पाठीराखे यांना त्यांनी केलेले अभिवादन, दिलेले प्रोत्साहन हे
वाखाणण्यायोग्य होते. “अशी लता पुन्हा
होणे नाही” असेच म्हणावे लागेल. त्यांच्या भक्तीने मोग-याची वेल स्वर्गापर्यंत उंच
जाऊन तिथेच ती फुले अर्पण केली करणा-या हे तेजस्वी स्वरा,“तुला आमचा हा “अखेरचा हा
दंडवत.” https://www.youtube.com/watch?v=pDAcbiLjldo
खूप छान माहितीपूर्ण लेख
ReplyDeleteखूपच सुंदर अणि माहितीपूर्ण लिखाण आहे
DeleteDhanyawad Geetatai
Deleteही तिन अनमोल रत्ने काळाच्या पडद्कायाआड जरी गेली असली तरी ते सदोदित आपल्या सोबत स्वररुपाने रहाणार आहेत..खुप छान शब्दात शब्दबद्ध केलेस पुनम..
ReplyDeleteDhanyawad Sheela
DeleteMiss you very much Lata Didi. But you will always remain in our hearts through your songs.
ReplyDelete(Anand R. Bhangle)
Nakkich Bhavojee 🙏
DeleteDhanyawad z👍
To,Nanda khedkar Madam, thank you for your comment 🙏
ReplyDeleteVery well written. Keep it up!
ReplyDeleteDhanyawad Madhuri tai🙏
ReplyDeleteतिघांचं यथार्थ वर्णन केलं आहेस... अभिनंदन...
ReplyDeleteDhanyawad bhau🙏
ReplyDelete