वादन एक कला
64
कलांपैकी एक कला “वादन” आहे. लहानपणी
गाण्याच्या मैफिलीला जेव्हा वडील घेऊन जायचे, तेव्हा संगीतातले काहीच कळत नव्हते.
जेव्हा वादयांची जुगलबंदी सुरु व्हायची तेव्हा मात्र ऐकतच रहावे असे वाटायचे.
त्यांची त्या वाद्यावरची हुकमत, समरसून जाणे आणि स्वत:बरोबरच दुस-यानाही आनंद देणे एक वेगळाच माहोल
तयार व्हावयाचा, मजा यायची नंतरही आणि अजुनही शास्त्रीय संगीतापेक्षा वाद्य जास्त
ऐकायला मला आवडते. कोणतेही गाणे
वाद्याच्या साथीशिवाय अपुरे वाटते ते यामुळेच. तबला, पेटी, सतार, वीणा हे तर नेहमी
असतातच. विशेष ऊल्लेख व्हायोलीन, मेंदोलिन,
बासुरी, जलतरंग, संतुर, बुलबुलतरंग आणि गिटार असे अनेक नवीन वाद्यांचा ऊपयोग
वेगवेगळ्या संगीतकारांनी वेगवेगळ्या गाण्यात सुंदररित्या करुन तर घेतला आहेच शिवाय
पार्श्वसंगीत म्हणूनही खूप छान उपयोग होतो.
रेडिओ, टि.व्हि., फेसबुक
आणि व्हॉटसअपवर सुद्धा वादनाचे विडिओ जास्त फिरत असतात. मला गाता गळा दिला नाही
म्हणून कधी कधी खूप वाईट वाटते पण ती हौस माझी कॅसिओ वादनाने भागवली आहे. त्याचीपण
एक गंमत आहे, साधारण 2005 मध्ये एकदा बिग-बझारामध्ये गेलो असतांना रु.2500/-चे लकी
कुपन मिळाले, त्यात काहीतरी घ्यायचे होते, नेमका कॅसिओ तेवढ्याच किंमतीत होता. लगेच
घेऊन टाकला. त्याआधी लहानपणी 10वी यत्ता
उत्तीर्ण झाल्यावर आत्याने 200/- दिले होते, सतार घे म्हणून (1981). तेव्हा एवढे
कुठे कळत होते. हा हौस म्हणुन घेतलेला कॅसिओ नंतर एक-दोनदा समारंभात, कॉलनीत
स्वातंत्र्यदीन, प्रजासत्ताक दिन या दिवशी सर्वाच्या समक्ष आठवणीने वाजवायची
त्याचे सगळ्यांना खूप कौतूक वाटायचे. आई-वडिल आले की, मुद्दाम कॅसिओ वाजवायला
सांगायचे. पुढे हे बघूनन कॉलनीतील एक मुलगी शिकायला येत होती. अजुनही तिचे आई-वडिल
भेटले की आठवण काढतात. खरंच, ही कला स्वत:बरोबरच दुस-यांनाही आनंद देते.
त्यावेळी “Google” चे एवढे प्रस्थ वाढले नव्हते. आता नोटेशन, नॅरॅशन, करोएके असे अनेक प्रकारे शिकण्यास मदत होते. ऑफिस संपल्यावर आठवड्यातून 2 दा असलेला कॅसीओ वाजनाचा वर्ग पुर्ण आठवडाभर मनात रुंजी घालायचा. हळूहळू मुलींच्या जबाबदा-या वाढल्यामूळे वादनाकडे दुर्लक्ष झाले. आता एवढ्या वर्षानंतर वादन सुरू करून यातून आनंद व उर्जा मिळते तसेच वेळेचे सदुपयोग आणि निवृत्तीनंतर मन रमविणे शक्य होईल. गाण्याला उठाव देणे, मधल्या जागा किंवा पार्श्वसंगितासाठी कॅसिओचा चांगला उपयोग होतो. समारंभ, उत्सव, ऑर्केष्ट्रा यामध्ये कॅसेओ वादनाला चांगली मागणी असते. मेहनत आणि तळमळ हवी. “गाण्यापेक्षा वाजविणे कठिण असते”असे नेहमी सर म्हणायचे. कोणतेही वाद्य हाताळणे तसे सराव, आवड, निरिक्षण आणि अभ्यास सर्व काही सोपे बनविते.
मन नाराज असेल, थकले असेल किंवा कामाच्या व्यापातसुध्दा कोणतेही वाद्य ऐकले की ताण निवळतो, उभारी येते आणि मन प्रसन्न होते. काही रोगांवरसुध्दा “म्युझिक थेरपीचा” उपयोग होतो असे म्हणतात. मला तर वाटते दवाखाने, मंदीर, शाळा, व्यावसायिक आस्थापना येथे मर्यादित स्वरुपात या वादनाचा वापर कामाचे वातावरण तयार करण्यासाठी आणि मन प्रसन्न करण्यासाठी करण्यास हरकत नसावी. त्या त्या वेळेनुसार जर वादनाची रागदारी लावली तर कदाचित तर माणसाच्या वृत्तीवर थोडाफार तरी सकारात्मक परिणाम होऊ शकतो. निसर्गात फिरताना कधी कधी चालताना मंद संगीत लावल्यास एकमेकांशी लगेच कनेक्ट होऊ शकतो. माऊथ-ऑर्गन आणि बासरी सारखे छोटेसे वाद्यतर कोठेही कधीही सोबत नेऊ शकतो. या वादना मी थोडासा परिचय करुन दिलेला आहे. आवड व शक्य असल्यास लहानपणीच मुलांना एकतरी वाद्य शिकवा. भलेही छंद म्हणा, ॲक्टीव्हिटी म्हणा किंवा फुलटाईम / पार्टवेळ कमवायचे साधन होऊ शकेल.

Comments
Post a Comment