खलनायक/नायिका

 

खलनायक/नायिका:

1. प्राण किशन सिकंद (12 फेब्रुवारी 1920 ते 12 जुलै 2013)

            खलनायक हा नायकापेक्षा जास्त सुंदर/देखणा असावा हे आश्चर्य आपल्या बॉलिवूडमध्ये होउन गेलेय हे सांगितले तर आताच्या पिढीला खरे वाटणार नाही. आमच्या आधीची पिढी आणि आम्ही हे अनुभवलय पड्द्यावर!  हो, त्यांचे नाव प्राण किशन सिकंद, पंजाबीपुत्र आणि लाहोरवासी, फाळणीमूळे भारतात आलेला आणि पुन्हा परत कधी न गेलेला.  नुकतेच त्यांच्या जीवनावर आधारित त्यांचे चरित्र वाचण्यात आले ... आणि प्राण.  शालीन आणि सज्जन असणारा हा माणुस केवळ काळाची गरज म्हणून झालेला खलनायक, अभिनेता (उत्तम, विनोदी आणि चरित्र भुमिका करणारा) प्रत्यक्ष जीवनात मात्र एकदम दयाळू, आतिथ्यशील, प्रामाणिक आणि लोकप्रिय माणुस होता.

           जीवनपासुन आताच्या शक्तीकपुरपर्यंत सगळ्यांमध्ये वेगळा स्वत:चा ठसा ऊमटवणारा असा हा अभिनेता खुप वक्तशीर, दुस-यांना मान देणारा आणि स्वत:चे काम उत्कठ्तेने करणारा कधीही वैयक्तिक जीवनात कधीच वाईट न बागणारा, स्वत:चे डोळे, प्रत्येकवेळी वेगळी लकब, पोशाख आणि व्यक्तिरेखा विवीधतेने नटवून एक प्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजनच करीत होता. त्यांच्यापासून खलनायकसुद्धा फिल्मफेयर पारितोषीक मिळवणे, जीवनगौरव पुरस्कार मिळवण्यास लायक ठरविण्यात आले.  सुंदर असूनही नायक होता आले नाही याची खंत त्यांना व प्रेक्षकांनाही होतीच पण काहीजण ठराविक कामासाठीच जन्म घेतात कि काय असे कधी कधी वाटते ते यासाठीच.

 1. प्राण किशन सिकंद (12 फेब्रुवारी 1920 ते 12 जुलै 2013)

            खलनायक हा नायकापेक्षा जास्त सुंदर/देखणा असावा हे आश्चर्य आपल्या बॉलिवूडमध्ये होउन गेलेय हे सांगितले तर आताच्या पिढीला खरे वाटणार नाही. आमच्या आधीची पिढी आणि आम्ही हे अनुभवलय पड्द्यावर!  हो, त्यांचे नाव प्राण किशन सिकंद, पंजाबीपुत्र आणि लाहोरवासी, फाळणीमूळे भारतात आलेला आणि पुन्हा परत कधी न गेलेला.  नुकतेच त्यांच्या जीवनावर आधारित त्यांचे चरित्र वाचण्यात आले “ ... आणि प्राण”.  शालीन आणि सज्जन असणारा हा माणुस केवळ काळाची गरज म्हणून झालेला खलनायक, अभिनेता (उत्तम, विनोदी आणि चरित्र भुमिका करणारा) प्रत्यक्ष जीवनात मात्र एकदम दयाळू, आतिथ्यशील, प्रामाणिक आणि लोकप्रिय माणूस होता.

           जीवनपासून आताच्या शक्तीकपुरपर्यंत सगळ्यांमध्ये वेगळा स्वत:चा ठसा ऊमटवणारा असा हा अभिनेता खुप वक्तशीर, दुस-यांना मान देणारा आणि स्वत:चे काम उत्कठ्तेने करणारा कधीही वैयक्तिक जीवनात कधीच वाईट न बागणारा, स्वत:चे डोळे, प्रत्येकवेळी वेगळी लकब, पोशाख आणि व्यक्तिरेखा विवीधतेने नटवून एक प्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजनच करीत होता. त्यांच्यापासून खलनायकसुद्धा फिल्मफेयर पारितोषीक मिळवणे, जीवनगौरव पुरस्कार मिळवण्यास लायक ठरविण्यात आले.  सुंदर असूनही नायक होता आले नाही याची खंत त्यांना व प्रेक्षकांनाही होतीच पण काहीजण ठराविक कामासाठीच जन्म घेतात की काय असे कधी कधी वाटते ते यासाठीच.

2.  ललिता पवार  (18 एप्रिल 1916 ते  24 फेब्रुवारी 1998)      

       खलनायिका ललिता पवार, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ अभिनेत्री.  सावत्र आई, खाष्ट सासु, महाराणी अशा अनेक भुमिका  कडक आणि वाकडा मिचमिच्या डोळ्यातून सगळा वाईटपणा दाखविणा-या या गुणी अभिनेत्रीची  “आनंद” मधली नर्स मात्र डोळ्यात पाणी आणणारी वेगळी भुमिका, छोटीपण लक्षवेधी ठरली होती. रामायणातली मंथरा तर विशेष महत्वाची ठरली.  डावा डोळा शुटिंगच्या दरम्यान गमावलेली हि अभिनेत्री नंतर चक्क 700 चित्रापटातून काम करुन फिल्मफेअर आणि इतर अनेक पारितोषिक विजेती ठरली.  त्यानंतर  शशिकला, हेलन, नादिरा, बिंदु, अरुणा इराणी अशा अनेक खलनायिका चित्रपटात आल्या आणि गेल्या  परंतु ललिता पवार यांच्यासारखी दुसरी कोणी होणार नाही हे ही तेवढे खरे!

          प्रत्यक्ष आयुष्यात आपल्याही जीवनात असे अनेक खलनायक,खलनायिका कोणत्या ना कोणत्या रुपात येतात.  अनेकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उध्वस्त होते, तर कधी त्यांचा नायनाट आपोआप होतो.  चित्रपटात सुखद अंत: दाखवतात तसा  प्रत्यक्षात मात्र नेहमी होईलच असे नाही. रामायण, महाभारतातसुद्धा अनेक खलनायक, खलनायिका दिसतात त्या सगळ्यांचा अंत वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे आणि त्याची कारणेही दिलेली आहेत.

        अत्याचार, (मानसिक, शारिरीक किंवा आर्थिक) फसवणुक,  विश्वासघात आणि स्पर्धा, लालसा  असे अनेक कारणे वाईट वागायला काहीजणांना भाग पडतात. नायक किंवा नायिका या चित्रपटात सगळ्याना पुरुन उरतात तशा माणसांना वैयक्तिक जीवनातही शत्रूंचा सामना करावा लागतो.  यामध्ये काहीजण काहीवेळा यशस्वी होतात तर काहीवेळा अयशस्वी.  चांगल्या कामाला चांगली साथ मिळत जाते आणि अशा अनेक संकटांवर मात करीत अनेक कामे पार पडत असतात. खरे ते खरे होणार याचा  विश्वास मात्र प्रत्येकास हवा.  दुस-यांसाठी खड्डा खणल्यावर एक दिवस आपणच त्यात पडू शकतो हे माहित असुनही माणसे असे का वागतात हा एक मोठा प्रश्न आहे.  दुष्टपणा एक वृत्ती असून वेळीच याला विरोध न करता, काहीजण खतपाणी घालतात आणि मग त्याचा इतरांना त्रास होतो.  दुसरे विरोध झाल्यावरच त्या कामाचे महत्व आणखीन जास्त जाणवते आणि आपली अंतर्गत प्रतिकार शक्ती वृद्धिंगत होते हेही नसे थोडके एवढे आपण म्हणू शकतो.  










Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव