मुर्ख डब्बा (Idiot-box)
सन 1985 मध्ये नवीन टि.व्ही. घरात आला तेव्हा खुप आनंद झाला होता. BPL कंपनीचा रंगीत टिव्ही खुप प्रसिध्द होता म्हणून. अनेक कार्यक्रम गजरा, प्रतिभा आणि प्रतिमा, चित्रहार. रंगोळी, वागले कि दुनिया, हमलोग अशा अनेक मालिका आणि शनिवार-रविवार मराठी, हिंदी चित्रपट अशी भव्य मेजवानी वाटायची. याशिवाय प्रादेशिक चित्रपट, कधी सणानिमित्त गप्पांची मैफल असा अतिरिक्त बोनसपण मिळायचा. एकूण काय सुखाच्या मर्यादित व्याख्येत भर घालणारी होती.
सन 2000 नंतर मात्र या सुखाला दृष्ट लागली. आता अनेक 1760 वाहिन्या, मालिकांचा दर्जा, शुद्ध भाषेची अनास्था,कार्यक्रमांची वानवा असे अनेक कारणांनी लोक चक्क “मुर्ख डब्बा”(idiot box) म्हणून हिणवू लागले. प्रचंड जाहिराती, सरकारी अनास्था, केबल-चालकांची मनमानीमुळे एका चांगल्या सरकारी दृकश्राव्य माध्यमाची वाट आपणच लावली याचे कधी कधी वाईट वाटते. घरबसल्या गृहिणींचे, वृद्धांचे किंवा आपत्ककालीन अवस्थेत (कोविड) कालावधीत मनोरंजनाचे उत्तम साधन म्हणून नेहमी गरजेचे असणारे हे माध्यम योग्य प्रकारे हाताळल्यास खुप छान ऊपयोग होऊ शकतो.
प्रवास, अध्यात्म, शिक्षण आणि मनोरंजन हा मुख्य हेत लक्षात घेता अनेक सुधारणा करता येऊ शकतील. आता तर हातात, संगणक आणि आंतरजालामुळे सर्व काही एकदम हाताच्या बोटावर उपलब्ध होत आहे. त्याचे व्यसन आणि नको त्या वयात नको त्या गोष्टी बघायला मिळत असल्यामुळे येणारी पिढीची वाट लागणे कठीण नाही. वेळीच याकडे गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. एकेकाळी हॉलमध्ये मानाचे स्थान पटकाविणारा टि.व्ही. आता मात्र दुर्लक्षित होत आहे ते केवळ या मोबाईलच्या अतिक्रमणामुळे आणि त्याच्या वाढत्या अनेक सुख-सोयींमुळे.
एकदा एका दवाखान्यात गेले तेव्हा सगळ्यांच्या माना खाली मोबाईलमध्ये. प्रवासातसुद्धा तिकिटाचे कधी कधी किंवा चढणे, उतरण्याचे भान नसते. कोणत्याही साधनाचा मर्यादित वापर हितकारक असतो. “मनुष्य श्रेष्ठ कि तंत्रज्ञान “ हे आता आपणच ठरवावे लागेल. अति-वापर किंवा गैरवापर होणे आपणच थांबवू शकतो. त्यासाठी योग्य ती खबरदारी पालकांनी आणि मुलांनीही घेतली पाहिजे. अन्यथा “ग़ूड नाईट, टेक केअर”या चित्रपटात दाखविल्यानुसार मानसिक त्रास आणि जीवावरसुद्धा बेतु शकते. हीच गोष्ट टि.व्हि.वरील कार्यक्रमाबाबत असावी. पुर्ण कुटुंब जेव्हा एकत्र बसून बघण्यासारखे कार्यक्रम, हसत-खेळत बोध देणारे मालिका, जाहिराती (मर्यादित), भडकपणा टाळून (त्यावरही सेंन्सोर) असल्यास कदाचित हे शक्य होईल.
सुट्टीच्या दिवशी तरी निदान दर्जेदार कार्यक्रम, चित्रपट किंवा चालू घडामोडीबाबत किंवा शैक्षणिक हेतुने दिवस आनंदात जावा जेणेकरुन घरातला हा डब्बा हवाहवासा सगळ्यांना वाटावा. स्मार्ट टिव्ही ने टिव्हीचे बाह्य अंग बदलले तसेच अंतरंगातही बदल व्हावा ही अपेक्षा. तसेच दुसरे माध्यम कोणतेही आकर्षित करु नये याचीही काळजी घ्यावी. एखाद्या गोष्टीची उपयुक्तता वाढविणे, टिकविणे आणि योग्य त्या जबाबदारीने वाग़णे हे आता आपणच ठरविले पाहिजे, तुम्हाला काय वाटते?

खरंच आहे...
ReplyDeleteअती तिथे माती अशी मराठीत म्हण आहे तशी गत आहे बघ.. घरातील लहानग्यांना त्या पासून परावृत्त करणे हे वरचे वर अवघड होत आहे
Ho na! T. V. nidan १२ vajta band tari hot hota,ata mobile hatatach mag kay!
DeleteDhanyawad Teju!
Vachun nehami comments karye,bare vatata!🙏