जात्यावरची ओवी -एक अनुभव
27 फेब्रुवारीला “मराठी भाषा दिन” साजरा करण्यात आला. अनेक कविता, विनोद, साहित्य, लेख, पुनर्जिवित झाले. “शब्द एक अर्थ अनेक”, “ळ” व “ज्ञ” असलेली एकमेव भाषा म्हणून, अलंकार, उपमा, उत्प्रेक्षा, सुभाषिते यांनी नटलेली, (एखादी घरंदाज स्त्री जेव्हा नटून थटून येते तेव्हा जसे तिच्याकडे आदरयुक्त अभिमानाने आपण बघतच राहतो) तसे बघत/ ऐकत/ वाचतच राहावे असे वाटणारी ही माझी मराठी भाषा मला खूप जवळची वाटते ती याच कारणांमुळे!
मराठी साहित्य आणि प्रकार हा एक प्रबंधाचा विषय होऊ शकतो एवढा हा विषय विस्तृत आहे. त्यातीलच “जात्यावरच्या ओव्या” हा एक पद्द प्रकार. नुकताच 24 फेब्रुवारीला एन.सी.पी.ए., नरीमन पॉंइंट येथे “ओवी अनुभवतांना” हा धनश्री लेले, व्याख्याती, विदुषीनिर्मित आणि महाराष्ट्र शासन आयोजित एका सुंदर कार्यक्रमाला ब-याच दिवसांनी जाण्याचा योग आला. ओवीची अनुभूती, प्रत्यक्ष समालोचन आणि भावार्थ समजावून सांगण्याचा ताईंचा प्रयत्न. मग काय आमच्यासारखे श्रोते त्या अनुभवात अखंड न्हाऊन निघाले नसतील तरच नवल!
संसाराच्या
पसा-यातुन स्वत:चा किनारा शोधणारी, अस्तित्व, अस्मिता आणि आधार हे शब्दकोषात आहेत हे माहित नसणारी, ग्रामीण स्त्रीची
ही स्वगते. बोलीभाषेतील मुक्तछंदातील कविता म्हणजे “ओवी” होय. आयुष्यावर भाष्य करुन,
वेदनेला हळूच कुरवाळणारी, दु:खाचा/कामाचा डोंगर असला तरी त्यात हरवून न जाता जात्यावर दळताना व्यक्त होणारी, पुढची वाट शोधणारी, निसर्ग-गान गुणगुणणारी, उंब-याच्या आत बसून बाहेरचे जग न्याहाळणारी,
भावनिक घालमेल न दाखविता, जात्यावर दळता दळता सुचणारी / गुणगुणून स्वत:ला कायम सिद्ध
असे हिचे दर्शन एकदम स्तिमित करायला लावते. ओवीत देवाची भक्ती ओतप्रोत भरलेली असते. काही ओवीत
सासू-सुना, आई, भाऊ-बहीण यांच्या टोकदार / प्रेमळ नात्याने भरलेल्या असतात. अशा एकुण लाखभर ओव्या (अनामिक स्त्रीयांनी ) तयार
केलेल्या असून आजच्या काळातील स्त्रिया आणि
मुली मात्र अनभिज्ञ आहोत याचे वाईट वाटले. त्याचबरोबर धनश्री लेले ताईंसारखे त्या प्रकाशात
आणण्यासाठी धडपड करीत आहेत हे बघुन कौतुक/अभिमानही वाटला.
साहित्यातील ओवी हा अजरामर ठेवा आपण आता काहीसा
दुर्लक्षिला असला तरी त्यातुन मिळणारे समाधान मोठे आहे,त्यातील गर्भीतार्थ लक्षात घेण्यासारखा
आहे. आम्ही फक्त श्री.संत ज्ञानेश्वर, जनाबाई आणि बहिणाबाईपर्यंतच पोहोचण्याचा प्रयत्न
करीतो. काही गाणी स्वरुपात, अरे संसार..., खोप्यावरील खोपा .. हे पारंपारिक धन अपरिमित आहे ते धनश्री लेलेताईंनी
आणि त्यांच्या साथिदारांनी विस्तृत केलेल्या अनुभूतीने अवर्णनिय आनंद प्राप्त करुन
दिला. आज या कार्यक्रमात उपस्थित असलेले 400-500 जण जागृत झाले, उद्द्या 1000 होतील, परवा
5000 होतील या अपेक्षेने आपण सर्वांनी प्रयत्न करावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
सोबत काही ओव्या देत आहे, त्या आपण देखील अनुभव्यात
!
1) आरण्या गं वनामधी, कोण रडतं आईका, कोण रडतं आइका। बोरी बाभळी बाइका, बोरी बाभळी बायका। (अरुण्यरुदन म्हणता येईल
का?)
2) आकाशीचा चांद बाई माझ्या अंगणात गं...(स्वप्नाळु दशा)
3) सई बाई ग बाई,…(सखीशी
हितगूज)
4) पहाटेच्या दळणाचा, येतो आळशीला राग
बाई माझ्या तू उषाबाई, उठ भाग्याच्या गं, दळू लाग ( मिश्किल भाव )

Comments
Post a Comment