स्त्री म्हणजे...
Woman म्हणजे Wonderful wife, Outstanding friend, Marvelous daughter, Adorable sister & Nurturing mother होय. निसर्गाला पडलेलया एका सुंदर स्वप्नाची प्रतीपुर्ती आहे. विधात्याने सृष्टीचक्र पुढे चालू ठेवण्यासाठी, जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी स्त्रीची निर्मीती केली. "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः" जेथे स्त्रीची पुजा होते, तेथे देवतांचा निवास असतो. एक स्त्री कुटूंबाच्या जबाबदारीचे भान असलेली आणि तेवढीच कुटूंबासाठी कोणत्याही प्रसंगाला सामोरी जाणारी बघितली की सृष्टीच्या निर्मात्याला नक्कीच कौतूक वाटत असावे. त्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाचेही चीज करावयास हवे. भावना, प्रेम, माया, कर्तव्य, वात्सल्य, शृंगार आणि सौंदर्य याचे अनोखे मिश्रण असलेली स्त्री म्हणजे एक कोडेच आहे. नाजूक पण प्रसंगी कणखर, प्रेमळ पण करारी, कर्तव्य-कठोर, सडेतोड, भावनाप्रधान, धाडसी तर प्रसंगी स्वत: कमीपणा घेऊन सर्वांना पुढे घेऊन जाणारी अशी तिची प्रतिमा. आता तर स्वत:ला “सुपरवुमन” समजून सगळ्या आघाड्या यशस्वीपणे सांभाळणारी ही स्त्री सृष्टीचा एक अविभाज्य घटक आहे. पर:स्पर पुरक भुमिका निभावणारी, व्यवस्थापकिय संचालक, खेळ, राजकारण, समाजकारण करुन आकाशालाही गवसणी घालणारी स्त्री समजणे खरेच अवघड आहे.
समाजरचनेचा भाग म्हणून घराचा उंबरठा सांभाळून संस्कार देणारी, पालन-पोषणाची सर्व जबाबदारी समर्थपणे हाताळणारी, प्रसंगी देशाचाही उंबरठा स्वाभिमानाने ओलांडून क्षितीजापार आपले कर्तव्य पार पाडणारी स्त्री खरेच अभिमानास्पद ठरत नाही का? स्त्री हा विनोदाचा विषय, टिंगल करण्यास, बळाचा वापर करुन तिचे लचके तोडणारा पुरुष भलेही स्वत:ला हुशार समजत असेल परंतु तिला स्वत:चे भान आहे. एक स्त्री किती जणांना भारी पडू शकते हे आपल्या धर्मग्रंथातून, (रामायण, महाभारत) इतिहासातून सिद्ध करुन दाखविलेलेच आहे. शिवाजीसारखा पुत्र, स्वराज्याचे स्वप्न दाखविणारी, देशासाठी आपल्या पुत्रांचे बलिदान देण्यास तयार असणारी ती कधी माता, बहिण, पत्नी तर कधी मैत्रिण असते. किंबहुना असे म्हणावे लागेल की, ब-याचवेळा अनाम राहून खुप काही जगासमोर (आदर्श) ठेवणारी, एकाच वेळी अनेक भुमिका, आणि प्रत्येक भुमिकेला न्याय देणारी, विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर यशस्वीपणे हाताळणारी स्त्री कुठेही कमी पडत नाही. शारिरीक, मानसिक व आर्थिक दुर्बलता यावर ती आता मात करु पाहत आहे. स्वत:बरोबरच इतरांचाही विचार करणारी, प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून देश, समाजा समोर एक आदर्श तयार करीत आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, एनी बेझंट, इंदिरा गांधी, किरण बेदी, पी.टी उषा, मेरी कोम, कल्पना चावला ते सुनीता विल्यम्स पर्यंतचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे तर लता मंगेशकर ते मदर टेरेसापर्यंतचा प्रवास तिचे बहुआयामी कर्तत्व सिद्ध करत आहे.
नुसते देशाला स्वराज्य/ स्वातंत्र्य मिळून होत नाही तर त्याचे सुराज्यात रुपांतर करण्याचे आव्हान आता तिच्यासमोर आहे. स्वातंत्र्याचा वापर चौकटीत राहून उपभोगणे अन्यथा त्याचे स्वैराचारात रुपांतर होण्याची शक्यता असते याचे तिला भान आहे. पुरुषाची साथ मिळाली तर ठीक नाहीतर ती स्वत: एकटीच सगळे काही समर्थपणे सांभाळू शकते याचा तिला अभिमान आहे. आवश्यक तिथे कमीपणा घ्यायला तिला काहीच वाटत नाही पण जेव्हा याचा गैरवापर होत असेल तर ती प्राणपणाने विरोधही करते. कायदा व सुव्यवस्था, समाजही आता तिच्या बाजूने उभा राहत आहे त्यामुळे तिला धैर्य प्राप्त झाले असून ती दिवसेंदिवस सामर्थ्यवान होत आहे. शासनातील अनेक योजना, नियम हे आता शिक्षण, आरोग्य समस्या सोडविण्यास मदत करीत आहे. गावात, खेड्यात किंवा जेथे काही कमी आहे तिथे हे सर्व पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्त्रीची अक्कल फक्त “चुल आणि मूल” एवढीच आहे असे समजणा-या समाजाला ती आता सक्षम होऊन पुरूषांच्या बरोबरीने काही वेळा अधिक दाखवित आहे. पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा देणारी एक “ समर्थ /यशस्वी जोडी” असे म्हणावयास भाग पाडीत आहे. नकाराधिकाराचा (नकार देणे) वापर करुन आपले मत प्रामाणिकपणे मांडत आहे. प्रमाण थोडे कमी आहे पण हळूहळू वाढत आहे हेही नसे थोडके. अजून प्रयत्न करावयास हवेत, तशी जाणीव निर्माण व्हावयास हवी.
सुखी संसार, देशाचा आणि पर्यायाने समाज विकसीत होणे हे स्त्रियांच्याच हातात असते. त्यासाठी स्त्री एकाच वेळी विश्वाच्या कल्याणासाठी कुटूंबाच्या विकासासोबत देशाचा आणि आता विश्वाचे कल्याण करीत आहे. समाजातील सगळ्यांशी हुशारीने / वात्सल्याने / प्रेमाने / कर्तृत्वाने / लढावू बाण्याने कर्तुत्व सिध्द होत आहे. या प्रसंगात तिला समजून तीचे हक्क जाणून समान वागणूक देऊन सगळ्यांनी तिला साथ देणे हेही तेवढेच महत्वाचे! चला तर मग लागूया कामाला सगळेजण !

Well written!
ReplyDeleteThank you Madhuri Tai 🙏
ReplyDeleteफारच सुंदर विवेचन केले आहे, अभिनंदन
ReplyDeleteDhanyawad bhau 🙏
ReplyDeleteMadhavi changale lihile aahe
ReplyDeletethank you.nav nahi lihile.
ReplyDeleteNav लिहिले aste tar!🙏👍 Dhanyawad!😊
ReplyDelete