रांगोळी- एक कला
“रंगोली” हा एक हिंदी चित्रपट गाण्यावर आधारीत कार्यक्रम रविवारी सकाळी 8.00 वाजता दुरदर्शनवर असतो. सन 1985 पासून जेव्हा टि.व्ही. आमच्या घरी आला तेव्हा किती कौतुक होते प्रत्येक कार्यक्रमाचे! छायागीत, रामायण, महाभारत, हमलोग, फुल खिले है गुलशन गुलशन, गजरा, प्रतिमा आणि प्रतिभा, नाटक, चित्रपट ( मराठी, हिंदी, बहुभाषिक, पारितोषिक विजेते ) असे अनेक कार्यक्रम वेळात वेळ काढून घरातले सगळेचजण बघायचे. त्यात विशेषत: “रंगोली” खूप आवडायचा. हा कार्यक्रम मुंबई दुरदर्शनतर्फे दिल्ली दुरदर्शनवरुन राष्ट्रीय पातळीवर सर्वत्र प्रसारीत होतो. हेमामालीनीपासून ते आताच्या ऋषिता भटपर्यंतच्या सर्व अभिनेत्रींनी रंगोलीत निवेदन करीत असतात. रंगोली कार्यक्रम हा चित्रपट विश्वातील माहीती, जुनी गाणी, मनोरंजन, अनेक किस्से, घडामोडी, प्रासंगीक, विशेष म्हणजे श्रोत्यांचे पत्रवाचन, प्रश्नावली व श्रोत्यांची हिंदी चित्रपट गाण्याची आवड पुरी करणे अशा अनेक विवीधतेने समृद्ध असा हा कार्यक्रम आहे. आता ती मजा थोडी कमी वाटते एवढेच. (वयपरत्वे असावा). यात हिंदी चित्रपट संगितातील विविध बाबींचे मिश्रण म्हणजे रंगोली होय.
दुसरी
“रांगोळी” घरासमोर सारवलेल्या अंगणात घालायची ती. अजुनही काही घरे ही परंपरा जपतात. काहीजण उत्सव,
सणसमारंभ किंवा नैमित्तीक कार्यक्रमात रांगोली काढत असतात. रांगोळी ही प्रसन्नता आणि
कलाकौशल्य, गृहिणीची, संस्काराची ओळख दर्शविते. एकदा लहानपणी मी रांगोळी काढली होती,
नंतर कोणाच्या हस्ते चुकून त्याच्यावर पाणी
पडले आणि माझा मुड गेला. तेव्हा आईने समजावले होते कि एकतर दुसरी काढ किंवा दुरुस्त
कर पण नाराज नको होऊस. आपण आपले काम करायचे तन्मयतेने ते पुसले/खराब झाले तर दोष आपला
नाही. रांगोळी ही मुलींची कला आहे असा गैरसमज आताच्या मुलांनी दूर केलेला आहे. रांगोळी ही एक व्यावसायिकरित्या कमविण्याचे साधन देखील ठरत
आहे. मोठे नेते, पशुपक्षी, निसर्ग यांचेनुसार चित्ररूप रांगोळीसुद्धा आता कढली जाते.
समाज, कला आणि अर्थार्जन असा समन्वय साधता येणारी ही एक मनाला समाधान देणारी घरगुती
कला एकटी किंवा सामुहीकरित्यासुद्धा काढली जाते.
रांगोळीचे
अनेक प्रकार असतात. पारंपारीक किंवा आधुनिक, तशीच अनेक वस्तु वापरुन (चुना, बोरूची
पावडर, तांदुळ पीठ, फुले किंवा फुलांच्या पाकळ्या, देठ, रंगीत वाळू, धान्य, मीठ वगैरे
) अगदी पाण्यावरसुद्धा रांगोळी काढणारे असतात. ज्यांना खाली बसता येत नाही ते टेबलावर
बसून पाटावर किंवा काचेच्या तुकड्यांवर, प्लॅस्टिक शीटवर रांगोळी काढतात. देवळासमोर,
कार्यालयातसुद्धा रांगोळी प्रसंगानुरुप काढतात. दक्षिण भारत, उत्तर भारत, महाराष्ट्रात
ठिंबक्याची रांगोळी व अनेक प्रकारे विविधता दर्शविणारी ही कला अती प्राचीन असून आकर्षक,
रंगसंगती, वेगवेगळ्या रेषेत, भुमितीची संकल्पना यामध्ये योजली जाते. देवी-देवता, मनुष्यांच्या
प्रतिकृती, भावछटा, प्रसंग आणि संदेश अशा अनेक अंगाने रांगोळी साकारली जाते. आता टंकलेखनाद्वारे
आणि संगणकावर रांगोळी काढली जाते. त्यात त्या माणसाचे अंतरंग स्पष्ट करते तर तिच्या/त्याच्या
बोटातील कला किंवा कल्पकता दिसून येते. छोट्यात छोटी ते मोठयात मोठी रांगोळी काढुन
विक्रम प्रस्थापित करणारेसुद्धा रांगोळीकार असतात.
मनुष्य
तरी काय वेगळे दर्शवितो ? सर्वगुण संपन्न असे व्यक्तिमत्व जोपासणे हेसुद्धा रांगोळी
रेखाटण्यासारखेच आहे. आयुष्याची रांगोळीसुद्धा अशीच आखीव-रेखीव, सुबक सुंदर असावी असे
प्रत्येकाला वाटते. अगदीच शक्य नसल्यास निदान !!ओम नम: शिवाय! किंवा प्रसंगानुरुप अनेक
संदेशसुद्धा याद्वारे देता येतो. रांगोळीच्या स्पर्धासुद्धा भरविल्या जातात. रांगोळीभोवती
दिव्यांची आरास केली की अजून छान भासते. छंद म्हणून आणि मनाला शांतता, प्रसन्न करणारी
ही कला नक्कीच सगळ्यांनी जोपावयास हवी. मला खुप छान रांगोळी काढायला येत नाही. पण सण-समारंभानिमित्त
थोडे हात चालविण्याचा प्रयत्न करते एवढेच. हल्ली रांगोळी कशी काढावी याचे वर्गसुद्धा
भरवून याचे प्रशिक्षण घेता येते. पुर्वी ज्यांना रांगोळी छान काढता येते त्या मुली
हुशार समजल्या जायच्या. सामाजिक माध्यमावर अनेकजण “जीत” रांगोळी किंवा संगीता म्हणुन
एक भगिनी यावर अनेक व्हिडीओ टाकत असतात. बघायला मजा वाटते आणि कौतुकही वाटते.

Comments
Post a Comment