रामायणातील स्त्रिया

       “Raam is soul, Sita is heart, Rawan is in mind that steals your heart from your soul. Laxman is consciousness always with you & activein on your behalf. Hanuman is intitution & courage that help retrieve your heart to re-animate your soul.”

       असा हा “राम” आपले आयुष्य व्यापून टाकतो. नुकतीच रामनवमी होऊन गेली, त्यानिमित्त आलेला हा संदेश नक्कीच अनुकरणीय आणि रामाचे आपल्या आयुष्यातील महत्व अधोरेखीत करतो. श्रीविष्णुचा सातवा अवतार आणि मर्यादा-पुरुषोत्तम म्हणून सगळ्या जगासमोर कोणत्याही काळात “आदर्श” मानला जातो. एकपत्नी, एकबाणी आणि एकवचनी असा हा आदर्श काही जणांच्या मनात नाराजगी निर्माण करतो ते केवळ “सीतेला घराबाहेर काढून अविश्वास दाखविला म्हणून.”  पितृप्रेम, मातृप्रेम, बंधूप्रेम, प्रजाहितदक्ष असा  असलेला श्रीराम त्यावेळी तो केवळ पती म्हणून नाही तर राजा म्हणून आदर्शच ठरतो. त्याग आणि इतर स्त्रियांना दिलेले महत्व लक्षात घेता हा एक दोष सोडूनच द्यावयास हवा.

      माझा आजचा विषय आहे “रामायणातील स्त्रिया,” त्याबाबत थोडे बघूया. पहिली स्त्री-सीता. भुमीतुन प्रकट आणि शेवटही भूमीत समाविष्ट होणारी,  आदर्श मुलगी,  पत्नी, माता, सुन आणि राणी. त्याग आणि कोणत्याही परिस्थितीत निर्भिड राहाणारी, एक मर्यादाभंग झाल्यामुळे संकटात सापडलेली, पतीवृता आणि आपल्या चरित्र्यावर संशय घेऊनही मातेचे कर्तव्य निभावणारी, शेवटी असह्य झाल्यावर भुमीलाच जवळ करणारी अशी ही आदर्श स्त्री.

      दुसरी स्री ऊर्मिला:- सीतेपेक्षा तुलनात्मकरित्या कमी महत्व प्राप्त झालेली परंतू तेवढीच पतीवृता, अनुल्लेखित पती लक्ष्मणाच्या कर्तव्यपुर्ती आड न येता. कोणताही गाजावाजा न करता वनवासी कालावधीत व्रतस्थ राहून मोठी त्यागमुर्ती. या त्यागाला महत्व दिलेले दिसून येत नाही.

     तिसरी स्त्री मंदोदरी: - रावणाला प्रत्येक प्रसंगात सन्मार्ग सुचविणारी तरीही वाईट प्रसंगात साथ न सोडणारी आदरणीय पतिवृता.               

    चौथी स्त्री कौसल्या:- रामाची सख्खी आई असूनही रामाच्या वनवासाला विरोध न करता पतीने दिलेल्या वचनाला महत्व देणारी. रामावर निस्सीम प्रेम करताना कर्तव्याला प्राधान्य देऊन पतीनिधनानंतर कैकयीला समजून घेणारी.  

    पाचवी स्त्री सुमित्रा:- रामाची सावत्र आई आणि लक्ष्मणाची आई. स्व:ताच्या मुलाला कोणती वचन आणि आवश्यकता नसताना लक्ष्मणास (रामाच्या प्रेमापोटी) वनवासात पाठविणारी.

   सहावी स्त्री कैकेयी (खलनायिका):- रामाची सावत्र आई, पतीला संकटात मदत करणारी, भरतापेक्षा रामावर जास्त प्रेम करणारी,  मंथरेच्या बदसल्ल्यामूळे मिळालेल्या वराचा (भरताला राज्य मिळण्यासाठी ऐनवेळी) गैरवापर केल्यामुळे जगासमोर बदनाम होऊन रामाला वनवासात जाण्यासाठी, पर्यायाने रावणाचे पारिपत्य करण्यास कारणीभुत ठरणारी, खलनायीकत्व पत्करणारी स्त्री जी कोणाच्याही आयुष्यात असुच शकते. तरी राम तिचा द्वेष न करता मात्रृप्रेमास महत्व देणारा आणि युद्ध जिंकुन परतल्यावर तिची प्रथम भेट मागणारा आदर्श ठरतो.

     सातवी स्त्री शुर्पणखा:- रावणाची बहीण ही राक्षस कुळातील अरण्यवासी होती.  खर आणि दुषणाच्या मृत्यूमूळे कोपित होऊन रामचे नुकसान करण्यास गेली असता स्वत:चेच नुकसान (नाक आणि कान कापले) करुन भावाला( रावण ) रामाचा बदला घेण्यासाठी उद्युक्त करणारी आणि अप्रत्यक्षरीत्या राम-रावण युद्धास कारणीभुत ठरणारी.

     सहावी स्त्री शबरी:- आदिवासी असूनही रामाची तन्मयतेने वाट पहाणारी, राम आल्यावर  किडके किंवा आंबट बोरे रामाने खाऊ नयेत म्हणून स्वत:  चोखून रामाला देणारी.  तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन तिचे महत्व जाणणारा असा हा श्रीराम  (कोणताही भेदाभेद न करता).

    सातवी स्त्री अहिल्या:- गौतममुनीनी शाप दिल्यामुळे युगानयुगे शिळा होऊन पडलेली, रामाच्या प्रतिक्षेत असणारी, रामाच्या स्पर्शाने उद्धार झालेली अहिल्या, पतिवृता आणि आदर्श ठरणारी.

    शेवटची अनामिक राहिलेली स्त्री:- रामायण जिच्यामुळे लिहिले गेले ती वाल्या कोळ्याची पत्नी. पतीच्या पापात हिस्सा नाकारणारी (आताच्या काळात भ्रष्टाचा-याच्या विरोधात), परिणामी वाल्या कोळ्याचे परिवर्तन वाल्मिकी ऋषीत झालेला बदल आणि त्यातून महान ग्रंथ ”रामायण“ (घडायच्या आधीच ) रचिता जगाला देणारी महान स्त्रीला प्रणाम.

   रामायण म्हणजे आदर्श वस्तुपाठ सांगणारा “धर्मग्रंथ” होय. लहानपणापासुन आपली कधी ना कधी रामाची, त्याच्या कर्तव्य-पारायणतेची, ओळख कुठूनही होतच असते. संस्कृत शिकताना “राम रामेति रामेति, रमे रामे ...” अशी बाराखडी, रामरक्षा पाठांतरासाठी मिळणारे बक्षिस, प्रवचन, किर्तनातून (रामनवमी निमित्त) होणारे रामाचे गुणगान, मोठेपणी रामाविषयी वाटणारे कुतूहल दिवसेंदिवस वाढत जाते. आताच्या जगात एवढे आदर्श वागणे शक्य नाही हे समजुनही काहीजण अंमलात आणण्याचा प्रयत्न करणारे, भितीपोटी का होईना रामनाम जपणारे, आजारपणात सगळे उपाय संपल्यावर शेवट तरी वेदनारहीत असावा या हेतुने रामरक्षा म्हणणारे किंवा वाचन करणारे असे अनेकजण आपल्या आजुबाजूला दिसतात. “ अमुचा रामराम घ्यावा, आम्ही जातो आमुच्या गावा / !!रामनाम सत्य है !! म्हणत “समाधानाने जगणे” हे  अंतिम सत्य स्विकारणे आणि शक्यतो राम समजून आणि उमजून घ्यावा या इच्छेसह हे रामपुराण इथेच समाप्त करते. 



Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव