जेव्हा रायगडाला जाग येते...

          “जय जय महाराष्टृ माझा ...“ या गीताला राज्यगीत म्हणून मान्यता मिळाल्यावर खुप अभिमान वाटला. आता सगळ्या शासकीय कार्यक्रमातून हे गीत वाजविले जाते. लहानपणी हे गाणे ऐकल्यावर जसे स्फुरण चढत असे तसे मात्र आता होताना दिसत नाही. एक औपचारिकता म्हणून केवळ हे गाणे वाजविणे आणि गाणे वाजविल्यामूळे महाराष्टाचा खराच अभिमान वाटतो का? ही एक विचार करण्याची गोष्ट आहे असे मला वाटते. मला कळायला लागल्यानंतर पहिले ऐतिहासिक नाटक पाहिले होते, ते होते “जेव्हा रायगडाला जाग येते.” खुले रंगमंच, प्रभाकर पणशीकर यांचा अभिनय, आवेश आणि एकूणच ऐतिहासिक संदर्भामुळे या नाटकाने मनावर कायमचा ठसा उमटविला होता. कित्येक दिवस मनामध्ये नाटकाचे संवाद रेंगाळत होते. नुकताच रायगडाचा व्हिडिओही बघण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हे अनेकांचे आराध्य दैवत आहे. आता याची आठवण येण्याचे कारण आम्ही नुकतीच रायगड किल्याला दिलेली भेट.  मुंबई ते संदोशी एसटीने मुंबईवरून रात्रीचा प्रवास केला. भल्या सकाळी रायगड्याच्या पायथ्याशी पोचलो. तेथून बसने रायगड रोप वे ग़ाठला. महाड वरून सुध्दा रायग़डवर जाण्याची व्यवस्था होऊ शकते.  उन्हाळ्यात सकाळी सकाळी गडावर जाणे उत्तम. रायग़डावरून परत येताना महाड येथे पोहचून पुढे मुंबई येथे प्रवास पुर्ण केला. गडाच्या परिसरात रहाण्याची सोय आहे. ग़डावर जाण्यासाठी 1435 पाय-यांची तसेच  रोपवेची व्यवस्था आहे. 

       रायगडावर जगदिश्वराचे मंदिर, टकमक टोक, राणी महाल, मंत्री महाल, रायगड म्युझीयम, शिवथर घळ, गंगासागर तलाव, हत्तीतलाव, कुशावर्त तलाव, छत्रपती शिवाजीमहाराज राज्याभिषेक स्थळ, महाराजांची समाधी,  सचिव मंडळीसोबत राज्य शकट चालविण्याचा महाल ही स्थळे बघण्यासारखी आहेत. किल्यावर खुबलढा बुरूज, नाना दरवाजा, मशीद मोर्चा, महादरवाजा, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, नगारखाना, शिरकाई देऊळ,  चोरदिंडी, जवळच पाचाडचा आई जिजाईचा वाडा आहे. स्थळाची माहिती सांगण्यासाठी गडावर गाईड उपलब्ध आहेत. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर आग लाऊन, लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. किल्ले रायगडाचे प्राचीन नाव रायरी  हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप  असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे याच्या ताब्यात होता. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते.

       अशा या किल्लयावर   ब-याच वर्षापासुन जाऊ जाऊ  म्हणून ठरविलेली रायगड किल्याला अचानक दिलेली एक दिवस 24 तासात दिलेली भेट. खरे तर जायच्या आधी खूप उत्सुकता होती मनात, गेल्यावर मात्र काहीसे निराश झाले मन.  भव्य-दिव्य इतिहास लाभलेला हा किल्ला आता चढण्याची मजा राहिलेली नाही. रोपवेने सरळ गडावर जाता येते. “कालाय तस्मै नम: “ अनुसार काही सुधारणा अपेक्षितच असतात. मुळ गाभ्याला हात न लावताही सुधारणा करता येतात.  हे एक नैसर्गिक आव्हान तर आहे पण त्याचा कुठेही मागमुस दिसत नव्हता. पाण्याची दुर्मिळता, अनास्था, गडाखाली चाललेले अपरिमित खोदकाम आणि सगळीकडे व्यावसायिक बजबजपुरी बघुन वाईट वाटले. साधे वाहतूकीचे रिक्शा, टॅक्सी, बस  पुरेश्या प्रमाणात उपलब्ध केले असते  किंवा किल्ल्यावरची झालेली पडझड जरी दुरुस्त केली तरी जरा बरे वाटले असते. वर्षातील ठराविक दिवस (जेव्हा महाराजांची जयंती आणि राज्याभिषेक एवढ्यापुरतेच) त्याचे महत्व दिसून येते. इतर दिवशी कोणी जाऊ नये, गेल्यास स्वत:चे वाहन आणावे अशी धारणा दिसून आली.  पाण्याचे दुर्मिळता अजुनही शासनाला/ स्थानिक कार्यकर्त्यांना दुर करता आलेली दिसून येत नाही. एप्रिलमध्ये ही अवस्था, तर पुढे मे-जुन मध्ये काय होईल याची केवळ कल्पना केलेलीच बरी!

             याआधी आम्ही मुरुड-जंजिरा, कर्नाळा, दौलताबाद,  प्रतापगड, शनिवारवाडा, सदाशिवगड, कुल्हडगड, बेळगांव, गोवा, कारवार येथील  अनेक छोट-मोठे किल्ले बघीतले पण एवढी अनास्था कुठेच दिसली नाही. शिवाजीच्या नावावर एवढे राजकारण करणारे, गड-किल्ल्यासाठी दरवर्षी अनुदान जाहीर करणारे, स्वत:ला शिवप्रेमी म्हणवून घेणारे कुधीतरी /केव्हातरी  याचा विचार करतील का? स्थानिक रहिवासी तरी याचे महत्व समजून घेतील का? किल्ल्यांवरील निवडक स्थळे, रायगडावरील म्युझियम, जिजाऊबाईंची समाधी तरी किमान हौसेने दाखवावी असे वाटते. त्यासाठी पायी चालणे शक्य नसल्यास पर्यायी व्यवस्था करण्यांत यावी. पुढील पिढी आणि परदेशस्थ मंडळींना आकर्षित करण्यासाठी एखादी योजना राबविण्यांत यावी. माहितीपट, विडिओ, चित्रफित, इतिहास, भुगोल, जावळी जंगलाचे महत्व, इतिहासवाचन, प्रेरणा वा उत्साह वर्धक असे काहीतरी करण्याची गरज आहे.  बयाच ठिकाणी झाडे लावणे  आणि किल्ले संवर्धनासाठी आवश्यक ते सगळे करणे, वाहतुकीची नानाविध उपलब्धता याचा विचार व्हावा. आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाचे महत्व त्याकाळी महाराजांनी कसे आत्मसात केले असेल याचाही विचार व्हावा. त्यांचे विचार, दुरदृर्ष्टी, समाजहीत आणि धाडसीपणा यासाठीचे मार्गदर्शन, ग्रंथालय, विवेचन यासाठी लागणारे शिक्षक/व्याख्यान यांचे आयोजन करावे.

            महाराष्टाचे गड-किल्यांचे महत्व/ वैशिष्ठे अधोरेखित करणारे, नैसर्गिक संरक्षण आणि इतिहास-संवर्धन या सगळ्यांचा संगम असणारे गड-किल्ले हे गिर्यारोहकांना कायम आकर्षित करतातच. कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना काय वाटेल याचा तरी निदान विचार व्हावा. तिथल्या लोकांना रोजगार, शेती आणि गावाची प्रगती हे उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कार्यक्रम आखावेत. गडांचे गतवैभव सांभाळणे, त्याची जपणूक/संवर्धन करणे, पुनर्बांधणी/डागडूजी  करुन गड किल्ल्यास उर्जित अवस्था प्राप्त करुन देणे,  हवे असल्यास वर्गणी देण्याचे आवाहन करुन, लोक-सहभाग नोंदवावा. स्वेच्छेने कोणी श्रमदान करुन  काही करावयास तयार असल्यास त्यांना प्रोत्साहन देणे, मुलांना किल्ल्याचे महत्व अधोरेखित करावे. सहल, पर्यटन आणि इतिहासाची ओळख असा एकुण संस्कार कसा करता येईल याचा विचार व्हावा. पारंपारिक आणि साहसी खेळ (दांड्पट्टा, तलवारबाजी, मुष्टियुद्ध)  शिकविणे किंवा त्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविणारे तेथे असावेत. तसे गडाखाली वर्ग भरवावेत. शाळेतील मुलांची सहल काढावी. ( सुट्टीत/शनिवार/रविवार) अपेक्षित सुराज्य कसे असावे याचे निदान जाणीव तरी मुलांच्या मनात तयार व्हावी.

            आता प्रत्यक्ष लढाया होत नाहीत पण जे काही होते ते (अप्रत्यक्ष/ छूपा शत्रुशी लढणे)  जास्त कठिण असते. त्यासाठी लागणारी मानसिक तयारी/अवस्था जोपासणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी नैसर्गिक धडे देणे शिक्षक, पालक आणि समाज यांची सामायिक गरज आहे. सगळ्यांनी मनावर घेतल्यास काहीही कठीण नाही. मग विचार काय करता? चला लागा कामाला!  केवळ हाच नाही तर सगळ्या किल्ल्यांचाही या दृष्टीकोनातून विचार व्हावा ही अपेक्षा. बाय द वे,  मुंबईतपण किल्ले

आहेत. Castella de Aguada (बांद्रा किल्ला), वरळी किल्ला, शिवडी / सिवरी किल्ला,  सायन किल्ला,  कर्नाळा किल्ला, Bhassein किल्ला (वसई किल्ला), माहूली किल्ला, कुलाबा किल्ला  अजून पण काही असतील तर अवश्य शोधावेत आणि बघावेत थोडा वेळ काढून!  अशा त-हेने रायगडा आणि मराठी माणसाच्या मनाला लवकरच जाग यावी असे वाटते.   



Comments

  1. It's really easy to write down our frustrations, especially when we visit our so called most important and Historically holy places...but how many of us actually go and do something about it?? Do we help them physically or financially or politically??? We all are expertin suggestions, but please do something about it!! If you really feel bad with the conditions!!! Imagines what happens to the people who have to live there day in and day out!!!??

    ReplyDelete
    Replies
    1. Agreed with 🙏👍
      May I know your name please! 👏
      How the situation is to be handle is the question?

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव