नमन करु नटवरा...

           चित्रपटापेक्षा नाटक पाहणारे प्रेक्षक कमी पण दर्दी रसिक मुद्दाम वेळ काढुन नाटकाला जाणारे असतात. मला पण चित्रपटापेक्षा नाटक अगदी लहानपणापासुन बघायला आवडते. लहानपणी संगीत नाटकातली गाणी अजुनही माझी आवडती आहेत. “सर्वात्मका सर्वेश्वरा..,  मर्मबंधातली ठेव ही..., काटा रूते कुणाला..., खरा तो प्रेमा..., कशी केलीस माझी दैंना.. , उगवला चंद्र पुनवेचा आणि वद जावु कुणाला शरणागत” अशी अनेक गाणी आठवतात. रेडिओवर ऐकलेली नभोनाट्य रुपांतरीत “आम्रपाली” नाटक व इतर अनेक नाटके विशेष लक्षात आहेत. नारायण श्रीपाद राजहंसऊर्फ बालगंधर्व या नावाने  लोकप्रिय  असलेले    विसाव्या  शतकाच्या           सुरुवातीच्या काळातील ऊर्फ बालगंधर्व या नावाने लोकप्रिय असलेले  विसाव्या शतकाच्या  सुरुवातीच्या काळातील  सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक, आणि नाट्यनिर्माते होते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात  रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहूब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे  बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरीगझलदादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. त्यांनी संगीत नाटकासह एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. प्रशांत दामलेनी अभिनय सामर्थाने नाट्यक्षेत्रात अनेक विक्रम रचत आहेत.

     कोणताही जिवंत अभिनय, ध्वनीमुद्रितपेक्षा जास्त प्रभावी ठरतो, जो फरक नाटक आणि चित्रपटामध्ये असतो शिवाय लोकांचा प्रतिसादही समोरासमोर बघायला मिळतो. नमन करु नटवरा म्हणून पडदा वर गेला की, एका वेगळ्याच दुनियेत आपण प्रवेश करतो/ रंगतो.  नुकताच रंगभूमी दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. मी पाहिलेले नाटके आणि त्यातल्या लक्षात राहिलेल्या स्त्री भुमिका महत्वाच्या वाटतात. जसे की,  आई रिटायर होतेय(भक्ती बर्वे ) सविता दामोदर परांजपेमधली (सुकन्या कुलकर्णी), ती फुलराणी (अमृता सुभाष), पाऊल न वाजविता (सविता प्रभुणे), प्रेमाच्या गावा जावे (वंदना गुप्ते), मित्र मधली फैयाज, यु-टर्न (ईला भाटे), अनन्यामधली ऋजुता बागवे अशा या निवडक भुमिका कधी विचार करायला लावणा-या तर कधी मन सुन्न करणा-या होत्या. याशिवाय इतर अनेक पुरुष भुमिकाही महत्वाच्या होत्या जसे की रायगडाला जाग येते (प्रभाकर पणशीकर), नटसम्राट (श्रीराम लागु), मी नथुराम गोडसे ( शाम पोंक्षे), सही रे सही आणि लोच्या झाला रे मधला भरत जाधव, नवा गडी नवे राज्य (उमेश कामत आणि प्रिया बापट) मी इंदिरा (इंदीरा संत) तसेच इतर अनेक आवडलेल्या भुमिका आणि अजरामर नाटके आणि त्यांची नावे लिहित बसल्यास लेख खूप मोठा होईल.

         लग्नानंतर आणि मुली झाल्यावर हळूहळू नाटक पाहण्याचे प्रमाण कमी होत गेले.  व्यावसायिक नाटकांचे पास मिळत असल्याने विनासायास चांगली स्पर्धेतील नाटक बघता आली.  घरातील अन्य तिघांनाही तशी आवड कमीच आणि एकच सुट्टी मिळायची ती कधी संपायची ते कळायचेच नाही. टि.व्ही.वर ची काही नाटके थोडी तहान भागवायची पण मजा येत नसे. आता निवृत्त झाल्यावर मात्र नाटकासाठी मुद्दाम वेळ काढायचे ठरविले आहे. मध्यंतरीच्या काळात नाटकेही जास्त येत नसत. कोविडमुळे तर नाट्यव्यवसायावर गदाच आलेली पण त्यानंतर रंगभूमी पुन्हा सुरु झाली बघुन बरे वाटले. प्रायोगिक, व्यावसायिक आणि बाल-रंगभुमी असे अनेक नाटकाचे प्रकार आहेत. आणखीन एक, हारबेरियम-(जुनी नाटके मर्यादित प्रवेशासाठी पुनर्जीवित करणे ) नाटकेपण चांगली वाटतात. नाटक जशी कला आहे तसेच शास्त्रसुद्धा आहे. राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या भाषेत नाटके रंगभूमी गाजवित असतात.  बरेच कलाकार हे नाटकातून सिनेमात जातात नाटकात कामकरणे हे कलाकारांना एक आव्हान वाटते.

        नाटक ही कला जुनी व पारंपारीक वारसा जपणारी असून सामाजिक भान/तळमळ आणि अभिनयाचा कस यामुळे एखादे नाटक अजरामर ठरते. कालिदासापासुन ते शेक्सपिअर पर्यंत आणि बालगंधर्वापासुन ते आताच्या सुबोध भावेपर्यंतचे कलाकार अजूनही रंगभुमीलाच आपलेसे करतात. “एकच प्याला” बघितल्यानंतर दारु पिणे सोडून देणारे जसे होते, तसेच संगीत शारदावरुन “बालविवाहास” प्रतिबंध घालणे शक्य झाले. “चारचौघी” सारखे नाटक महिलांच्या समस्येकडे सहानुभुतीपुर्वक बघायला शिकविते. मोरुची मावशी, हसवाफसवी सारखी नाटके विनोदी भुक भागविते तर अथांग, काटकोन-त्रिकोण सारखी नाटके विचार करायला लावणारी ठरतात. त्यामुळे नाटक हे एक सामाजिक भान ठेवुन व करमणूक हे दुय्यम साधन मानले जाते. किर्लोस्कर, ग़डकरी यांचे नाट्य क्षेत्रातले योगदान महत्वाचे ठरते.

          हल्ली शासनही अनुदान, प्रोत्साहन, पारितोषिक आणि व्यावसायिक व बिगरव्यावसायिक स्पर्धा भरवून वेगवेगळे मंच कलाकार, नेपथ्य, निगदर्शन गुण दाखविण्यासाठी काही प्रोत्साहने उपलब्ध करुन देत असते. वेगवेगळ्या स्पर्धा, बक्षिस आणि खुला रंगमंच उपलब्ध केल्यामुळे तरुणाईसुद्धा आकर्षित होते. जीवन हे एक नाटकच आहे त्यातील आपापल्या भुमिका बजावणे आणि यशस्वी होणे हेच एकमेव ध्येय प्रत्येकाचे असते, दिग्दर्शक मात्र पडद्याआड असतो. विशेष म्हणजे एकाच आयुष्यात वेगवेगळ्या परस्परविरोधी भुमिका, बहुआयामी भुमिका बजवायला लागतात. हेही सगळे “तोच” ठरवितो. कधी प्रवेश करायचा आणि विंगेत कधी परतायचे! वाट्याला आलेली प्रत्येक भुमिका समरसतेने जगणे आणि त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हीच यशाची खात्री असते. काहीजण सहज ही भुमिका जगतात तर काहीजण नाईलाजाने तर काहीजण त्या भुमिकेचे सोने करुन टाकतात. त्यासाठी लागणारी तळमळ आणि गरज लक्षात घेतल्यास कोणतेही नाटक यशस्वी होणारच. पुरुषोत्तम दारव्हेकर ते आताच्या चंद्रकांत कुलकर्णीपर्यंतचे सर्व निगदर्शक म्हणूनच यशस्वी मानले जातात. सई परांजपेपासून ते आताच्या प्रतिमा कुलकर्णीपर्यंतच्या स्त्री दिग्दर्शकांनीही आपला वेगळा ठसा नाटकावर उमटविला आहे. आज सिनेमा आणि दुरदर्शन,त्यातील विविध तंत्रामूळे नाट्यव्यवसायास मोठे आव्हान उभे राहिलेले आहे.

         काही नाटकांचे नंतर चित्रपटही तयार होतात हेही एक विशेष. अगदी हॅम्लेटपासून ते आताच्या कट्यार काळजात घुसलीपर्यंतचे सर्व प्रयोग लोकांनाही आवडलेले दिसून येतील. परदेशातसुद्धा नाटकाला विशेष महत्व आहे. म्हणून नाटक जगवले पाहिजे. ही परंपरा जपण्यासाठी, वारसा पुढे नेंण्यासाठी “चला नाटकाला जाऊ या” हे सगळ्यांनीच मनावर घेतले पाहिजे.




Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव