स्तोत्र आणि मंत्र महिमा
अध्यात्म्यात स्तोत्राचा महिमा पुराणात / ग्रंथात/ पोथी / पुस्तकात सांगण्यात आलेला आहे. मंत्र आणि स्तोत्र यात फरक आहे. स्तोत्र गातात तर मंत्र एक पुर्व निश्चित लयीत एका विशिष्ट कृतीपुर्वक जपतात. मध्यंतरी सुधा मुर्तीनेसुद्धा स्तोत्राचा महिमाबाबत एक ओडिओ क्लिप यावर केलेली आहे. पंचाक्षरी, अष्टाक्षरी असे अनेक प्रकारचे मंत्राबाबत त्यांचे विचार आवडले म्हणून त्याबाबत लिहावेसे वाटले. लहानपणापासून आपण देवास नमन करताना, पुजेत विविध स्तोत्र ऐकत असतो. मोठी माणसे आपल्याला काही ना काही याबद्दल सांगत असतात पण त्यावेळी आपण ते हसण्यावरी नेत असतो. नंतर जसे फळ हळूहळू परिपक्व होत जाते तसतसे स्तोत्राबाबतचा आपला दृष्टिकोन आणि त्याचे महत्व जाणवायला लागते. गणपती स्तोत्र, शिवकवच स्तोत्र, महाकाली स्तोत्र, नवग्रह स्तोत्र,मारुती स्तोत्र आणि व्यंकटेश स्तोत्र आपण नेहमीच म्हटलेली असतात. त्याचा अर्थ, व्याप्ती आणि उपयोग याकडे मात्र आपण दुर्लक्ष करित असतो. मुळात “जुने ते सोने” म्हणण्याऐवजी कालबाह्य किंवा वेळ कुठे आहे या सबबीखाली चांगले संस्कार विसरत चाललो आहोत. आता पुढील पिढी स्तोत्राबाबत संपुर्ण अनभिज्ञच राहील की काय असे कधी कधी वाटते. काहीजण स्तोत्र आणि स्त्रोत यामध्ये गडबड करु शकतात.
स्तोत्र
एक प्रार्थना, एक विवरण या एक वार्तालाप याची
एक काव्यात्मक संरचना असते. यात देवता आणि
देवतेची प्रशंसा / स्तुती करणे और व्यक्तिगत भक्ति काव्यात्मक स्वरुपात असते. पुस्तके,
धर्मग्रंथात विविध स्तोत्राबाबत सर्व लिहिलेले असते. साधे वाचन आपले आता होत नाही तेथे
हे स्तोत्र कुठे वाचणार असे काहीजण म्हणतील.
मग अन्य धर्मातील जे दिवसातून 5 वेळा न चुकता
नमाज वाचतात, शुक्रवारी मशिदीत जातात, काही जण रविवारी न चुकता चर्चमध्ये जाऊन प्रार्थना
करतात त्यांच्याकडे काही अधिक वेळ असतो का? काहीजण अनवाणी पायाने जैंन देरासरात जातात,
गुरुद्वा-यात न चुकता जातात. कुराणातल्या आयता, बायबलमधले वचने पाठ असतात ते काय वेडे
असतात का? उलट त्यांच्या शाळेत हे धार्मिक ज्ञान सक्तीचे असते. आपल्या मराठी शाळेत
तरी हे सक्तीचे आहे का? आपण किती वेळा देवळात जातो किंवा घरी तरी नियमितपणे कितीवेळा
देवाची आठवण करतो? माझ्या सास-यांनी लहानपणी
ऐकलेले, म्हटलेली ही वचने (कारवारला इंग्रजी शाळेत हे सक्तीचे होते त्यावेळी तेथे मराठी
शाळा नव्हत्या) वयाच्या 80 व्या वर्षीसुद्धा पाठ होत्या आणि मग ते नातींना सांगायचे,
आपले स्तोत्र, मंत्र, आरत्यापण पाठ झालया पाहिजेत. त्यांचे ऐकुन ऐकुन काही स्तोत्र
लहानपणी मुली म्हणायच्या. आता तर सगळाच आनंद आहे. “अर्थ सांग” तर म्हणते/म्हणतो असे
काहीजण म्हणतात. मंत्रांच्या पवित्र उच्चारामुळे शांत वातावरणाची निर्मीती होते. मंत्र-पठणामुळे
काही गंभीर रोगांवर मात करु शकतो हे विज्ञानानेसुद्धा सिद्ध करुन दाखविले आहे. प्रामुख्याने
ओमकार, विठ्ठलाचा गजर, गण गणात बोते, ओम साई नाथाय नम:, ओम नम:शिवाय असे आपण नेहमी
काही ना काही मनातल्या मनात म्हणत असतो. शास्त्रात गायत्री मंत्र हा श्रेष्ठ आणि शक्तिशाली
महामंत्र समजला जातो. “ॐ भूर्भव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्' एकूण 24 अक्षरांनी मंत्र बनला आहे. या मंत्राचा
अर्थ समजून एकाग्र भावनेने जप केला तर शरीर सकारात्मक ऊर्जाने भरुन जाते. काहीजण जप
करतात तर काहीजण पाठ असल्यामुळे कधीही वेळेनुसार, काम करता करतासुद्धा मनातल्या मनात
म्हणतात. आपल्या धर्माने सोय केली म्हणून आपण गैरफायदा घेऊ नये. शेवटी सगळे नियम, सोवळे
ओवळे, पुजा-अर्चा, स्त्रोत्र पठण, आरती, मंत्रपुष्पांजली हे सगळे आपल्या भल्यासाठीच
असते. सामुदायिक प्रार्थनेमूळे जास्त बळ प्राप्त होते शिवाय एकीची भावना निर्माण होते.
कोणतेही
स्तोत्र वाचायला घेतले तर त्यात प्रामुख्याने त्या त्या देवतेचे/देवाचे वर्णन/स्तुती
आणि आवाहन असते. साधारणपणे स्तुती केली की काही देवगण कधी ना कधी खुश होतात. खुश झाले
की मग आपल्याला काय पाहिजे ते मिळू शकते. त्याआधीची
पायरी जे मंत्र छोटे व सुटसुटीत असतात, ते तरी निदान म्हणावेत. मुंज झाल्यावर गायत्री
मंत्र म्हणायचा अधिकार प्राप्त होतो, महिलांनी म्हणू नये असे सांगितले जाते. पुर्वी
गैरसमज होता की ठराविक लोकांनीच हे सगळे करावे पण आता तसे काही राहिले नाही. प्रत्येकाने
आपापला वाटा उचलावा. हल्ली तर आपण सर्रास काहीही, केव्हाही करीत असतो. देवळासमोर रांगा
बघीतल्या की वाटते खरेच एवढे भक्त वाढलेत का? की “कामापुरते मामा” म्हणून संकट आले
की देव आठवतो. मुळात देव नाहीच आहे यावर ठाम मत असलेली पिढी देवळासमोर रांग कशी काय
लावू शकते हा ही एक प्रश्नच आहे. सगळ्या सोयी-सवलती असूनही आपण सुखी, समाधानी का नाही
हा प्रश्न आपणच आपल्याला कधी तरी विचारतो का? पुर्वीचे संस्कार, संस्कृती आणि आचार
सांभाळण्यात आपण कुठे कमी पडत आहोत का? हिंदी, मराठी आणि संस्कृत भाषेत असलेली ही स्तोत्रे
आपणांस पुस्तके, गुगल भाऊ अगदी ओडीओ व अर्थासकट मिळतील. पुराणात तर वेगवेगळी स्तोत्रे
म्हणून योध्यांना विविध अस्त्रे (प्राप्त केलेली) वापरुन युद्धे जिंकत असत. जसे की,
वायव्य अस्त्र, पर्जन्य अस्त्र, आग्नेय अस्त्र, ब्रम्हास्त्र आणि पाशुपत अस्त्र इत्यादी.
त्याकाळी कठोर तपश्चर्या करुन, साधना करुन विशिष्ट देव-देवतांना आवाहन करून त्यांना
प्रसंन्न करुन अस्त्रे आणि शस्त्रे प्राप्त करुन घेत होते. आता आपण असे म्हणू शकतो
की पुराणात विशिष्ट मंत्रांच्या उच्चाराने काही शक्ती जागृत होत असाव्यात. आजच्या युगात
विशिष्ट यंत्रे, विविध संयुगे, आज्ञावल्या, स्फोटके इत्यादीचेच विशिष्ट मिश्रण करून
पुराणातील अस्त्रे प्रत्यक्षात आलेली दिसतात.
आधुनिक
विज्ञान, तंत्रज्ञान आणि विचारसरणी आपल्याला या सगळ्यापासून दूर कुठे तरी घेऊन जाते
का? कष्ट, मेहनत आणि परिस्थिती प्रत्येकाची वेगळी असते. म्हणून काम/श्रम टाळून किंवा
मेहनत नाकारुन सुखी होऊ शकतो का? सुखासीन आयुष्य जगायला आधी भरपुर मेहनत केलेली आहे
का? दुस-यांच्या कष्टांवर आपला अधिकार असतो का? आयते/न कमावता किती दिवस पुरणार? या सगळ्यांचा उहापोह आपणच आपल्याशी
करीत नाही तोपर्यंत आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. राहिला मुद्दा हा
“स्तोत्र/मंत्र” का वाचावीत/म्हणावीत? मन:शांती, स्थैर्य आणि समाधानासाठी. नियमितपणे
म्हटल्यास फायदा जरी झाला नाहीतरी नुकसान नक्कीच होणार नाही. उदा. मुळव्याधीचा मंत्र,
कॅन्सर, हृद्यरोग, काविळ, सुर्यमंत्र, दृष्टीदोष, हरवलेली व्यक्ती सापडणे, कुबेर मंत्र,
अन्नपुर्णा मंत्र असे अनेक आपल्याला माहित असतात. स्तोत्र/मंत्र म्हटल्यामुळे पाठांतर
छान होते, ताणतणाव कमी होतो, धैर्य मिळते आणि मनाची प्रसन्नता वाढते. अजून काय हवे
आपल्याला? संकटात जसा आपण देवाचा धावा करतो त्याच्याऐवजी हा कोणताही मंत्र/ स्तोत्राची
तुम्हाला जमेल तसा, जमेल तेवढा जप केल्यास, असा नित्य-नियम ठेवल्यास ऐनवेळी ताण येणार
नाही आणि मनात विश्वास निर्माण होईल. संकट/अपघात अगदी देवालाही चुकले नाही, फक्त सहन
करण्याची ताकद, ऐनवेळी मदत करण्याची/ घेण्याची बुद्धी देणे/ होणे हे सगळे सुचणेही महत्वाचे
असते. रोज रामरक्षा म्हणुन बघा, आपल्यालाच आपलयामध्ये फरक जाणवेल. नमुन्यादाखल मी सोबत
एक गणपती स्तोत्र जोडत आहे. गणपती स्तोत्र हा संस्कृतमधील मूळ गणपती स्तोत्रांचा अनुवाद
आहे जो नारद मुनी यांनी तयार केला व तोच मराठीमध्ये श्रीधर स्वामी यांनी अनुवाद केला
आहे. त्या त्या स्तोत्राचे वेगवेगळे फयदे/महत्वही अधोरेखीत केलेले असते. बघा
वेळ जमेल तसे ऐकणे, म्हणणे किंवा वाचणे आणि मुलांनाही त्याचे महत्व विशद करुन सांगणे. काहीजण ध्वनिमुद्रीत लावून ठेवतात त्यामुळे घरातले वातावरण शुध्द राहते पण स्वत:च्या
तोंडून म्हणणे जास्त उत्तम.
!!देव तुमचे भले करो !!

Me Ramrsksha Ganpati Maruti Ani Laxmi stotra everyday mhantech .Tasech Mazi mulgi darroz Vishnusahastra naam mhante natu pan sarv stotra Gayatri mantra Tasech dandhyavandan karto.
ReplyDeleteKhup chan!
DeleteOlakhale nahi,nav first time lihave lagte!
Dhanyawad 🙏
Sandhyavandan* natu karto Gayatri mantra mhanto
ReplyDeleteDhanyawad 🙏
ReplyDeleteNav lihile tar olakhata ale aste!