गौतम बुद्धांची शिकवण
गौतम बुद्ध (इ.स.पू. ६२३/ ५६३ ते इ.स.पू. ५४३/ ४८३) शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी क्षत्रिय कुळामध्ये इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे बुद्धाचा जन्म झाला. या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ (पाली भाषेत सिदार्थ गौतम) असे नांव ठेवण्यात आले. राजघराण्यात जन्माला आलेल्या गौतम बुद्धांनी मनात आणले असते तर ऐषाआरामी चैनीत जीवन जगले असते. लहानपणापासूनच गौतम बुद्ध ( सिद्धार्थ ) यांस कोणत्याही प्रकारच्या दुख:पासून कोसो दुर ठेवले जात होते. अशा राजकुमाराने एके दिवशी शहरात रथातून फेरफटका मारीत असताना म्हातारापणामूळे जराजर्जर झालेली एक वृद्धा पाहिली, रस्त्याच्या कडेला तडफडणारा रोगी पाहिला. तसेच जीवनाचा जमाखर्च संपवून ताटीवर आडव्या पडलेल्या माणसाची प्रेतयात्रा पाहिली. त्यानंतर एक संन्यासी त्याने पाहिला आणि त्याची झोप उडाली. त्यांचे सुखात मन रमेनासे झाले. आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी हीच अटळ असेल तर कठीण आहे असे त्याच्या मनाने घेतले. यांतून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरवून या सर्वांवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी घराबाहेर पडण्याचा निश्चय केला. सुंदर पत्नी व गोंडस मुलाचा मोह आवरुन त्यांनी जगातल्या दु:खावर इलाज शोधण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. सिद्धार्थ आणि इतर तत्सम पाच सहसंन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला. ऐहिक सुखाचा पूर्णं त्याग हे सूत्र त्यांनी धरले. अन्नपाण्याचाही त्याग करण्याचा आत्मक्लेषी हा मार्ग अतिशय बिकट होता. तदनंतर सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली. “आत्मक्लेष” मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही या विचाराने त्याने आता ध्यानाचा मार्ग पत्करला. बोधगया येथे एका अश्वत्थ (पिंपळ) वृक्षाखाली बसून त्याने अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होईतो न उठण्याचा निश्चय केला. ४९ दिवसांच्या अखंड अविरत तपस्येनंतर, वयाच्या ३५व्या वर्षी बोधिवृक्षाच्या छायेत अखेर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. चांद्रमासांपैकी, काही विद्वानांच्या मते तो पांचवा महिना होता, काहींच्या मते तो बारावा महिना होता. इथून पुढे त्यास बुद्ध म्हटले जाऊ लागले. सिद्धार्थ ते गौतम बुद्ध होईपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. केवळ मानव जन्माच्या हितार्थ त्यांनी एवढे कष्ट सहन केले. अनेक अनुयायी तयार केले, नवीन धर्माची स्थापना करुन त्यावर चालण्यासाठी देशोदेशी पदयात्रा केल्या. वेगवेगळ्या मार्गांनी त्यांना मार्गदर्शन केले.
“बुद्ध” हे नांव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे. ही
उपाधी अथक प्रयत्नांनी मिळते. स्वत:सोबतच संपुर्ण
जगाचा उत्कर्ष करु शकणारा महाज्ञानी “बुद्ध”होय. या महामानवाला जगाच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ
स्थान आहे. बौध्द धर्म हा आशिया खंडात मुख्य आहे. तसेच भारतातील कोट्यवधी दलित व हिदुधर्मीयांनी
आणि जगातील मानवतावादी, विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे.
गौतम बुद्धांचे तत्वज्ञान पाली भाषेत मांडले गेले. भारत ही बौद्ध धर्माची मूळ भूमी असूनही हा धर्म इथे
थोडा दुरावलेला दिसुन येतो. म्यानमार, कंबोडिया
व श्रीलंका या देशांमध्ये या धर्माचा खूप प्रभाव दिसून येतो. भारतीय जीवनाच्या सामाजिक,
सांस्कृतिक, राजकीय आणि विशेषत: धार्मिक बाजुंवर बौद्ध धर्माची शिकवणीची जास्त छाप
आढळते. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तुप, मठ व लेणी या प्रतिकांच्या रुपाने स्पष्ट
दिसतो. काही ठिकाणी त्यांचे स्तुपांना (पॅगोडा) असे म्हणतात. त्या ठिकाणी विपश्यना
शिकविली जाते. ज्यांना येते ते तिथे बसून ध्यान करुन शकतात. लहानपणी ऐकलेली अंगुलीमल
दरोडेखोराच्या गोष्टीतून कसे बुद्धांनी त्याचे मतपरिवर्तन केले हे आपण बघतोच/वाचतोच.
बौद्ध धर्माच्या स्थापनेबरोबरच गौतम बुद्धांनी
नीती व सदाचाराला महत्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी चार आर्यसत्ये- दु:ख, तृष्णा,
दु:ख निरोध आणि प्रतिपद्व, तर सदाचारासाठी अष्टांग मार्ग सुचविलेले आहेत. ते आहेत- 1) सम्यक दृष्टी 2) सम्यक संकल्प 3) सम्यक
वाचा 4) कर्मांत 5) आजीवीका 6) व्यायाम 7) स्मृती आणि 8) समाधी. त्याचबरोबर बुद्ध धर्माची तीन अंगे सांगितलेली आहेत.
1) शील, समाधी आणि प्रज्ञा. हे सर्व त्यांनी
6 व्या शतकात सांगितलेले आहे ज्याची आवश्यकता आज 22व्या शतकातही आहे यावरुन त्यांची
किती दुरदृष्टी आणि समाजाविषयीची तळमळ दिसून येते. तसेच त्यांनी सांगितलेली पंचशील
तत्वे तर जगन्नमान्यच म्हणता येतील. ती आहेत- अहिंसा, चोरी करणार नाही, अनाचार करणार नाही, खोटे बोलणार
नाही आणि मोहात पडणार नाही. या तत्वांचा अवलंब केल्यास कोणताही मनुष्य कधीच दु:खी होऊ
शकणार नाही.
हिंदु धर्म आणि बौद्ध धर्मात बरेचसे साम्य आढळते
मात्र केवळ धार्मिक तेढ, भेदाभेद, चातुर्वर्ण व्यवस्था, कर्मकांडाचा अतिरेक, संस्कृत
भाषा यामुळे सर्वसामान्य जनता हिंदू धर्मापासुन दुर जायला लागली. त्यांना परत आणणे
यासाठीही काही विशेष प्रयत्न केले गेले नाहीत. परकीय आक्रमण, अज्ञान, गरीबी आणि स्वेच्छेने
स्विकृती यावरचा विश्वास यामुळे हिंदू धर्म काहीसा मागे पडला. आता तशी परिस्थिती नाही
तरी अनिर्बंध स्वातंत्र्याची अपेक्षा असते ती मात्र मिळत नाही म्हणुन काहीजण नाराज
असतात. चौकटीशिवाय स्वातंत्र्य शक्यच नसते हे मात्र ते मान्य करीत नाहीत. समाजसुधारक, विज्ञानाची मदत, शिक्षण आणि सोयी-सवलतींमुळे
हल्ली ब-याच जाचक अटी शिथिल झालेल्या आहेत. तरीही इतर धर्मांचे आकर्षण अजूनही कमी होत
नाही. त्यासाठी स्वधर्माची शिकवण, जागरुकता आणि योग्य अयोग्याची समजच देशाला, समाजाला
आणि व्यक्तिला येणा-या विवीध संकटांपासून / दु:खांपासून वाचवू शकेल असे वाटते. कोणताही
धर्म कधीच काही चुकीचे शिकवत नाही फक्त आपण त्यातून अर्थ कसा काढतो यावर आपले जीवन
अवलंबून असते. सगळ्यांनीच हे लक्षात घेऊन वर्तन केल्यास काहीही अशक्य नाही. तुम्हाला
काय वाटते?
बाय द वे, मुंबई येथील गोराईस्थित “पॅगोडा “ला जरूर भेट द्यावी. उत्कुष्ट स्थापत्य कला आणि ध्यानधारणेचे हे एक उत्तम स्थान असून त्याने मन शांत व समाधानी होते.

छान लिहिलय
ReplyDeleteDhanyawad 🙏kon te kalale nHi.
Deleteव्वा,मस्तच
ReplyDeleteDhanyawad 🙏nav lihile aste tar kalae aste.
Deleteछानच आहे
ReplyDeleteDhanyawad!
DeleteOlakhale nahi, sorry!