अमेरीकन वारी

          आम्ही अमेरिकेला येऊन आज बरोबर 15 दिवस झाले.   पुर्वी जीवाची मुंबई करणे असा एक वाक्यप्रचार होता,  आता जीवाची अमेरिका केली असे म्हणावे लागेल.  70-80 वर्षापुर्वी आमचे पुर्वज जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा  त्यांनासुद्धा आणि गावातील कुटूंबियांना मुंबई आताच्या अमेरिका सारखी वाटत असेल.   आता असंख्य भारतीय मूले उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला धावतात, आधी शिक्षणासाठी, मग धंद्यासाठी, नोकरीसाठी आणि फिरायला काहीजण. तसेही विमानाने 17 तासांत थेट अमेरिकेत पोहोचणे शक्य झाल्यामूळे आणखीन सोपे झाले.  पुर्वी एसटीने जाण्यासाठी कारवारला जायला 24 तास लागायचे आता ट्रेनने 16 तास लागतात. एकूण काय अमेरीका म्हणजे कारवार आणि मुंबईची मोठी (भव्यदिव्य) प्रतीकृती म्हणता येईल. लेकींच्या आग्रहांमूळे आमचे एकदाचे सॅन फ्रेन्सिस्को विमानतळावर आगमन झाले आणि आता तेथील नेवार्क येथे स्थिरावलोदेखील. 
      आल्या   दिवशीच घरी जाताना लेकीने तिची कंपनी आणि भव्य आणि दिव्य परिसर पासून मन प्रसन्न झाले. कंपनीने परिसरात स्थापन केलेल्या एका काचेच्या गार्डनचा व्हिजिटर्स सेंटरचा धावता दौरा केला.  संध्याकाळचे 8 वाजले तरी सुर्यप्रकाश आणि स्वच्छ वातावरण आणि लेकीच्या गाडीने   घरी 9 वाजता पोहोचलो तरी 12 डिग्री सुंदर आणि शांत वातावरणामूळे अजिबात दमल्यासारखे   वाटत नव्हते किंवा प्रवासाचा शीण जाणवत नव्हता हे विशेष! लेकीचे घर बघून तब्येत आणखी खूश.  लेकिच्या केलेले डोसे, चटणी आणि बटाट्याची भाजी खाऊन मस्तपैकी ताजेतवाने झालो.   छानपैकी गप्पा मारता-मारता कधी गाढ झोप लागली ते कळले देखील नाही. नंतर 4 दिवस लेकबाई घरीच राहून अमेरीकेतील स्थळांचे मार्गदर्शन, कुठे काय काय आहे आणि काय   खबरदारी घ्यायची याचे बौद्धिक घेऊन झाले. दुस-या दिवशी फ्रिमोंट येथील स्वामिनारायण  मंदिरातील देवदर्शनाने भटकंतीला सुरुवात झाली.  ब्रेंटवूड येथे चेरी गार्डन येथे चेरी पिकिंग केले आणि थोड्या विकत घेतल्या. तेथे झाडाला मोठ्या प्रमाणात लगडलेल्या चेरी पाहिल्या   व पोटभरून खाल्ल्या. जवळच्या अनेक धार्मिक स्थळांना (लिव्हरमोर येथील  शिव-विष्णू मंदीर)  भेटी दिल्या. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अनेक देवतांची देवळे आहेत. देवळात  अनेक देवांच्या मोठ्या मुर्ती स्थापन केलेल्या आहेत. एलीझाबेथ लेक, शोरलाईन लेक येथील तलावात बोटींग केले. सुंदर जपानी हाकूना  गार्डन आणि केली पार्क गार्डन पाहिले.   माऊंटनव्हू येथील संगणक (Computer history) संग्रहालय आणि Rosicrucian इजिप्तशिअन (ममीस) संग्रहालय पाहिले. मोठी स्टॅंड्फोर्ड युनिव्हर्सिटी, पॅलेस औफ फाईन आर्टस, टेझर आयलंड, मॉंन्टरेल येथील खोल समुद्रात जाऊन व्हेलमाशाचे दर्शन आणि वेगवेगळे समुद्र-किना-यांवर फिरवूनसुद्धा आणले.  एकुण काय मुलीच्या जीवावर मजा चालू आहे. बहीणीचा मुलगा आणि दिराचा मुलगा स्नेहाने भेटून गेले, आम्हीही त्यांच्या घरी जाऊन आलो. अत्यंत प्रेमाने आस्थेने पाहूणचार झाला. मुलीने /आठवड्यातून 3 दिवस कार्यालय, 2 दिवस घरुन काम आणि 2 दिवस सुट्टी अशी विभागणी केली. ती नसताना घरासोबतच्या परिसरात फेरफटका, आजूबाजूची सुंदर घरे आणि परिसर बघणे आणि इतर वेळी  मुलीसोबत स्थळ-दर्शने असा आमचा दिनक्रम सुरु झाला. 

       संसारातील 31 आणि नोकरीच्या 36 वर्षांत पहिल्यांदाच आम्हा दोघांना एवढा निवांत एकांत आणि दिड महिना सुट्टी मिळाल्यामुळे कसे छान वाटतंय. त्यातच लेक करत असलेले स्वागत, घेत असलेली काळजी/खबरदारी , ऐसपैस घर, झोपाळा आणि सकाळी फिरणे, खाणे-पिणे यात दिवस कसे जातायत ते कळतच नाही. अमेरिकेत येण्यापुर्वी आधी वाटत होते, कसे होणार आपले? वेळ कसा जाणार? काय करणार? वातावरण सुट होईल का ? मुलांना कामाच्या रगाड्यात वेळ देणे शक्य होईल का? पण तसे काही झाले नाही. गप्पा, गाणी, चेष्टामस्करी, भटकंती, बैठे खेळ, बॅडमिन्टन, लॉन टेनिस आणि नातेवाईकांचा प्रेमळ सहवास, दिमतीला हक्काचा कारवान (मुलगी गाडीसह) आहे. शांत परिसर, शुध्द वातावरण, विविध झाडे आणि फुलांनी नटलेला सुंदर आणि स्वच्छ परिसर असे त्याचे वर्णन करता येईल. इथे ब-याच ठिकाणी भारतीय दिसतात. सकाळी फिरतांना छोटी बाळे, कुत्री आणि त्यांच्यासोबत स्मितहास्य करणारी माणसे बघितली की प्रसन्न वाटते. 

         5 वर्षापुर्वी शिक्षणासाठी अचानक  मुलीने अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आश्चर्य,  काळजी आणि कौतुक अशी संमिश्र भावना होत्या.  आता इथे आल्यावर आणि एकुणच तिची प्रगती बघून तिचा निर्णय योग्य होता याची जाणीव झाली. तसेही मुलांचे भले होणे हेच प्र्त्येक आई-वडिलांचे स्वप्न असते आणि ते पुरे झालेले बघणे हे त्याहुनही जास्त समाधानकारक असते. अर्थात त्यासाठी लागणारी   जिद्द, मेहनत, धावपळ, स्वयंपुर्ण होणे हेही तेवढेच महत्वाचे असते. एकूण काय, अमेरिकन वारीत हाच मोठा विठ्ठ्ल आम्हाला पावला हेही नसे थोडके! वास्तविक आम्हाला कधी   एवढ्या लवकर अमेरिका बघायला मिळेल असे वाटले नव्हते कारण मागे मे-2020 मध्ये एकदा येण्याचे ठरविले तेव्हा नेमका करोना आला. नंतर व्हिसाचे काम एवढे लांबत गेले कि  आम्ही आशाच सोडून दिली. व्हिसा मिळाला तरी मे-24 पर्यंत तरी जाणे शक्य होईल का असे वाटत होते आणि अचानक या मे-23 मध्येच अमेरिकेत जाणे ठरले. विमानाची तिकीटे काढली आणि 8 जुनला लगेच अमेरिकेत आगमनही झाले. सगळी मुलींची इच्छाशक्ती  आणि योगायोगच म्हणावा लागेल. अजुन एक महिना मुक्काम बाकी आहे, अमेरिकेतील सुंदर स्थळे पहाताना उच्च शिक्षणासाठी येणारी भारतीय मूले दिसत होती. त्यांचे कष्ट, मेहनत, संघर्ष, अभ्यास, रहाण्यासाठी पैसे कमविण्यासाठी आणि पालकांना कमी आर्थिक भार पडण्यासाठी केलेल्या इंटर्नशिप, नौकरी, त्यांचे शेअरींग मधील काटकसरीने रहाणे, कमी पैशात प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन रहाणे, अन्न धान्य पुरवून वापरणे.  रहाण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कसे मिळवितात आणि त्याहून जास्त कसे खाण्या-पिण्यावरील खर्च वाचवून वातावरणाशी कसे जुळवून घेतात हे पण लक्षात यायला लागले. चांगली नौकरी लागल्यावरही काटकसरीने जगणे चालू असतात तरी आई-वडील, भाऊ- बहीण आल्यावर त्यांना काही कमी पडत नाही. परदेशात  घरा पासून आणि आई-वडीलांपासून दूर रहाणे,  आर्थिक नियोजन करणे त्याबरोबर भारतात नौकरी करणे, घरी रहाणे आई-वडीलांसोबत दिवस घालवणे याबद्दल काय बरोबर व योग्य अयोग्य  यावर वेगळा लेख होईल.

          या सगळ्या भटकंतीमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपण हे सगळे का नाही करु शकत? उदा. कारवारला एवढे किनारे आहेत पण व्यावसायिक दृष्टिकोन नाही. मुंबई आणि अमेरिकेत बरेच साम्य आढळते पण थोडया सुधारणा, लवचिकता केल्यास आणि माणसांनी संयम दाखविल्यास सर्व काही शक्य होईल.  फुटपाथ मोकळे ठेवणे, सर्वात महत्वाचे स्वच्छता ठेवणे आणि अवतीभोवती हिरवळ राखणे शक्य नाही का? स्वच्छता, वाहतुकीचे नियम, संयमित पण जलद गती आणि अनोळखी दिसले तरी स्मित करणे किंवा हाय, हॅलो करणे, मदतीचा हात, शिष्टाचार पाळणे, माहीती पुरविणे हेही आपणास शक्य होत नाही का? कित्येकदा आपण ओळख असुनही ओळख दाखवत नाही. चालणा-याकडे गाडीवाला माणुस तुच्छतेने किंवा अरेरावी करीत असतो. चालणारेपण वाहतुकीचे आणि सिग्नलचे नियम किती जण पाळतात? बाकी सगळे आपण त्यांचे अनुकरण करतो, मग या गोष्टी का नाही बघत? या विचाराने मात्र अस्वस्थ व्हावयास होते.

बाय द वे, जुन महिन्यातील सर्व लेख अमेरिकेतूनच लिहितेय हे तुम्हाला कळले असेलच. भेटू पुन्हा वारीच्या दुस-या भागात… 



Comments

  1. उच्च शिक्षणासाठी येणारी भारतीय मूलांचे कष्ट,, मेहनत, संघर्ष, अभ्यास, रहाण्यासाठी पैसे कमविण्यासाठी आणि पालकांना कमी आर्थिक भार पडण्यासाठी केलेल्या इंटर्नशिप, नौकरी, त्यांचे शेअरींग मधील काटकसरीने रहाणे, कमी पैशात प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन रहाणे, अन्न धान्य पुरवून वापरणे, खाण्या-पिण्यावरील खर्च वाचवून वातावरणाशी जुळवून घेण्याचे प्रयत्न इथे आल्यावर ठळक पणे जाणवतात 👍


    हेमंतचा शालेय मित्र 🙏🏻

    ReplyDelete
  2. सुंदर👌

    ReplyDelete
  3. अमेरिकेचे एवढे सुंदर वर्णन केले आहे कि वाचताना मी स्वतः अमेरिकेत आहे असे वाटले.

    ReplyDelete
  4. Dhanyawad madam!

    ReplyDelete
  5. अरे वा!! छान चालू आहे तुमची अमेरिका वारी.
    सुंदर प्रवास वर्णन.

    ReplyDelete
  6. Enjoy and keep writing. Geetatai here.

    ReplyDelete
  7. Dhanyawad & suswagatham!🙏

    ReplyDelete
  8. सर्व details वाचतांना मजा वाटली. लेकींची नावे वाचायला जास्त बरे वाटले असते.

    ReplyDelete
    Replies
    1. Mothi Pradnya & Shakti Prachi!
      Aaplepan nav kalale Aste tar bare zale aste!
      Dhanyawad & suswagatham!

      Delete
  9. Replies
    1. Dhanyawad, please write the name 👍🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव