अमेरिकनवारी भाग-2

           पहिल्या भागात मुलीकडील पहिल्या अमेरिकेच्या वारीच्या भेटीची सुखद तोंडओळख, संस्कृती, कभटकंतीचा पहिल्या टप्प्याचा आढावा घेतला.त्यामध्ये मुलीचे कॉलेज आणि 17 माईल्सचा ऊल्लेख करायचा राहुन गेला होता. San Jose State University चा  कॉलेज परीसर हा आपल्या कडील कॉलेजच्या 20 पटींनी मोठे आणि तिथल्या विविध सोयीसुविधा उदा. ग्रंथालय(2 बिल्डींग), व्यायामशाळा, पोहण्याचा तलाव, प्रयोगशाळा, संशोधनासाठी असणारा वाव, सुंदर परिसर, सुरक्षा  बघून मन खरेच भरुन आले. अशा कॉलेज परिसरात मुलांना शिक्षणाची संधी मिळाली हे पाहून मनाला संतोष झाला. आपणही पुन्हा एकदा लहान होऊन शिकूया का असे मनात आले. दुसरा म्हणजे 17 माईल्सचा समुद्र-किना-यांची दिलेली धावती भेट या समुद्र किना-यावर 17 विविध नितांत सुंदर ठिकाणे असून तेथे पॅसिफीक महासागराचे, चौपाटीचे, विविध समुद्र जिवाचे अवलोकन करु शकतात. वारीच्या या दुस-या टप्प्यांत सुखद आश्चर्याचे धक्के आणि लेक टोहो येथील नैसर्गिक चमत्काराची धावती भेट घडवून आणणार आहे. अमेरिकेत आल्यापासून सारखे वाटत होते की आपण सगळे इकडे मजा करत आहोत. धाकटी लेक अमेरिकेत Master of Science साठी नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात तीची इंटर्नशिप चालू असल्यामूळे आम्हाला भेटायला येवू शकत नाही किंवा ती विद्यार्थी असल्यामुळे आम्हीही तिथे जाऊ शकत नाही. ती अमेरिकेच्या पुर्व टोकाला 6 तासाच्या विमानाच्या अंतरावर उत्तर कॅरोलिना राज्यात  शिकते तर आम्ही आता मोठ्या लेकीकडे अमेरिकेच्या पश्चिमेच्या किनारपट्टीवर नेवार्क, सॅनफ्रेन्स्किस्को येथे. धाकट्या मुलीने मात्र मला भेटल्याशिवाय तुम्ही जायचे नाहीअसे मुंबईहून येतानाच बजावले होते. आम्ही तिची इंटर्नशिप, कॉलेज यामूळे पुढच्या वेळी नक्की येऊ तुझ्याकडे असे आश्वासन दिले होते.  मोठी मुलगी म्हणत होती की, जुलै महिन्यात तुमच्या जाण्याचे बघू काही करता येईल का म्हणून. सार्वजनिक सुट्टीस जोडून मी 2 दिवस सुट्टी घेतली आहे, आपण 4 दिवस लोन्ग वीकेंडला अमेरिकेतील टाहो तलाव परिसरात भटकंती करण्यासाठी बाहेर जात आहोत असे मुलीने सांगितले आणि त्याप्रमाणे प्रवासाची तयारी सुरु केली. दोन्ही मुलींची आपआपसात विकेंडची चर्चा (खलबते) चालू होती. त्यांच्यात काहीतरी चालू आहे असा अंदाज होता पण ताकास तूर लागत नव्हता. दुस-या दिवशी सकाळी 10च्या सुमारास सॅनफ्रेन्स्किस्को विमानतळाजवळून नेहमीच्या मार्गाने पुढे जायचे असा बेत ठरला त्यामूळे कुठे संशयाला जागा राहिली नव्हती.

       सकाळी सॅनफ्रेन्स्किस्को विमानतळावर गाडी घेउन पोहोचलो तर साक्षात छोटी मुलगी समोर दत्त म्हणून उभी.  आश्चर्याने काय बोलावे ते आम्हा दोघांनाही सुचेना, पटकन डोळ्यात पाणी आले.  दोघांनी मिळून कार्यक्रम आधीच आखून झालेले होते. मग काय धम्माल आम्ही टाहो तलाव परिसरात 2 दिवसांचे  हॉटेल बुकिंग पासून ते टाहो परिसरातील स्थळावर फिरणे, खाणे, बर्फात जाणे, कपडे, गप्पा, गाणी, आलटून पालटून ड्रायव्हिंग, एकमेकांची चेष्टामस्करी, बोलणे, धमाल किस्से, त्यांच्या अमेरिकेतील अनुभवाबद्दल सांगणे एकदम मजेत चालले. पहिल्या दिवशी आम्ही गिराल्डी चॉकलेट फॅक्टरीला भेट दिली. तिथे वेगवेगळया प्रकारची चॉकलेट पाहिली. तिथले वर्ल्ड फेमस संडे आईस्क्रिम खाऊन भटकंतीला सुखद सुरुवात झाली. तिथे जवळच समूद्र किनारा आहे.  त्याच दिवशी कॅलिफोर्नीयाची राजधानीलासुद्धा  भेट दिली. समुद्र-किना-यावर थोडे खाणे-फिरणे झाले, संध्याकाळी हॉटेलवर परत येऊन आराम केला.

         दुस-या दिवशी सकाळी ऊठून प्रसिध्द अशा टाहो तलाव परिसर आणि सोबतच्या  जंगलात सफारी करायची होती. लेक टाहो हा अमेरिकेतील सिएरा नेवाडा पर्वतातील गोड्या पाण्याचा मोठा तलाव आहे. हा तलाव  कॅलिफोर्निया आणि नेवाडाच्या सीमेवर पसरलेला आहे.  तलावाभोवतीचे किनारे, विविध प्रकारचे बोटींग, आजूबाजूच्या सुंदर परिसरामूळे प्राप्त झालेले सौंदर्य आणि स्की रिसॉर्टसाठी प्रामुख्याने ओळखले जाते. या तलावाच्या नैऋत्य किनार्‍यावर, एमराल्ड बे स्टेट पार्कमध्ये 1929 ची नॉर्डिक-शैलीतील हवेली विकिंगशोल्म आहे. टाहो हा तलाव 24 लाख वर्षापुर्वी भूगर्भातील 2 प्लॅटस एकमेकावर सरकल्यामूळे डोंगर परिसर आणि त्यात एक मोठा खोलगट भाग तयार झाला. तदनंतर खोलगट भागात डोंगरावरच्या बर्फाने पाणी जमा होत गेले. येथील जंगलातील झाडांचे वैशिष्ट्य म्हणजे उभी वाढत जातात,अगदी शिस्त लावल्यासारखी, एक झाड वाकडे-तिकडे दिसत नाही. आजुबाजूचे  पक्षी-निरीक्षण, रमत गमत तळ्याच्या काठाने एक तास चालणे, झाले तरी थंड हवेमूळे प्रवासाचा थकवा अजिबात जाणवत नव्हता.  

        त्यानंतर आलो टाहो लेकला, जे एक नैसर्गिक आश्चर्य म्हणावे कि चमत्कार ते कळत नाही. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे बर्फाच्छादित (हीम शिखरे) एका बाजुला,दुस-या बाजुला घनदाट जंगल तर मध्येच सरोवर तयार झालेले आहे तेही बर्फ वितळून. पाणी एकदम स्वच्छ आणि पारदर्शक, खोलवर तळ दिसणारे हिरवेगार (झाडांमूळे) तर काही ठिकाणी निळेशार (दुस-या बाजुने). तलावाचे आणि सोबतच्या परिसराचे किती कौतूक करावे ते कळत नाही. येथे गाडीने शिखरावर समुद्रसपाटीपासून 6000 फुट चढून ऊरलेले 2200 फुट अंतर ट्रामने वर चढून गेलो. बर्फात चालण्याचा अनुभव अविस्मरणीय तर अवर्णनीय होता. यावेळी पाऊस ऊशीरा होता म्हणून आम्हाला आरामात वर चढायला आणि बर्फाची शिखरे बघायला मिळाली. इतर वेळी पुर्ण रस्ता आणि शिखरसुद्धा बर्फाखाली झाकल्यामुळे वर जाणे शक्य नसते. इथे बर्फावरील विविध खेळ जसे की स्केंटीग, पर्वतारोहण केले जाते.  ऑलिंपिक मध्ये स्कीइंग आणि बर्फावरील खेळावर आधारित सामने भरविले जातात आणि अन्य वेळी सामन्याची तयारी करुन घेतली जाते. एकूणच एक आगळे-वेगळे ठिकाण बघितल्याचे समाधान लाभले. संध्याकाळी  हॉटेलला परतून आराम केला.  

         तिसरा दिवस टाहो तलावाची दुसरी बाजू, जी निळीशार होती त्या दिशेने गाडीने गेलो. सकाळ असल्यामूळे एकदम प्रसन्न वातावरण होते. सगळेजण पाण्याचा, काठाने चालण्याचा, पाण्यात असलेल्या दगडावरून चालण्याचा मनसोक्त आनंद घेत होते. दुसरीकडे बोटिंग, पेरा-सेलींग, स्कीइंगचा आनंद घेत होते. बाकी पाण्यात, समुद्रावर खेळायचा, मनसोक्त त्याचा सहवास लुटणे, निसर्गाच्या सहवासात रमणे, स्केटींग, ट्रेकिंग याचे अमेरिकन लोकांना लहानपणापासूनच बाळकडू दिले जाते असे वाटते. अगदी काही महिन्याची  बाळे, छोटी मुले  आणि मोठी माणसे, ज्येष्ठ नागरिकसुद्धा दिसत होते. त्यांचा ऊत्साह, सकारात्मक वृत्ती, दुस-यांना मदत करणे, हसत खेळत मजा अनुभवणे हे खूप आवडले. लेकीने फोल्डींगचा तंबू आणि सोबत मोठा पतंग सोबत आणला होता. तंबू पसरवून त्यात आराम आणि खाणे-पिणे केले. पतंग ऊडवण्याचाही आनंद लेकीने मुद्दाम घ्यायला लावला. थोडा वेळ लागला पण नंतर हवेत उंच पतंग उडू लागला आणि लेकिंचा आनंद गगनात मावेनासा झाला. सोबत दोन्ही लेकींचा सहवास सुखवत होता. येताना छोट्या लेकीने गाडीचा ताबा घेऊन 4 तास 70-80 च्या स्पिडने ड्रायव्हिंग केले ते पहाणे सुखद होते. वाटेत एका हॉटेलमध्ये अमेरिकन खाणे खाल्ले आणि घरी परत आलो. आणखीन एक सरप्राईज बाकी होते त्यामुळे तर घाई करावीच लागली. आम्ही शनिवारी संध्याकाळी घरी परतलो. अमीर खानच्या भाषेत म्हणावेसे वाटतेम्हारी छोरियॉं, छोरोंसे कम नही!

               सरप्राईज काय होते ते बघू वारीच्या पुढच्या भागात,भेटू लवकरच!




Comments

  1. Excellent details of American tour.
    Enjoy....Our Blessings to Pradyana. Prachi.

    ReplyDelete
  2. So nice and thanks for sharing.

    ReplyDelete
  3. This is Geetatai.

    ReplyDelete
  4. सुंदर प्रवास वर्णन मलाही प्रवास अनुभवता आल्या सारखं वाटलं👌👍cm

    ReplyDelete
  5. Wa! Really enjoyed your article. Small small details are fantastically caught!

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyawad & suswagatham Madhuri Tai!🙏

      Delete
  6. Taho lake che varnan ani mulina bhetanyacha anand amerikechya gaganatun amhalahi milala. Khup chaan

    ReplyDelete
  7. छान, मजा आली. धाकटीचे expert driving वाचून त्याचा video असला तर पाहायला आवडेल.

    ReplyDelete
    Replies
    1. Vedeo nahi kadhlela pan photo ahe,apn kon ,nav lihiytar what's appvar pathavu shaken!
      Dhanyawad & suswagatham!

      Delete
  8. Replies
    1. Dhanyawad,name please 👏👍🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव