अमेरिकन वारी-भाग-3.
मागील भागात लिहिल्याप्रमाणे नेवार्क, कॅलीफोर्निया,
अमेरिका (पश्चिम) येथून अचानक धाकट्या लेकीकडे
नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका (पुर्वेला) जाण्याचा योग दोघींनी मिळून जुळवून आणला. धाकटी
लेक आम्हाला नेण्यासाठीच मुद्दाम नेवार्क, कॅलीफोर्निया, अमेरिका (पश्चिम) येथे आली
होती. दि. 4 जुलैला, रात्री सॅन फ्रेन्सिस्को
विमानतळावर नॉर्थ कॅरोलीना येथे जाण्यासाठी तिच्यासह विमानात बसलो आणि 6 तासाच्या विमान
प्रवासानंतर 5 जुलैला सकाळी तिच्या घरी ( नॉर्थ कॅरोलिना ) येथे पोहोचलो. विमान नेमके
2 तास उशीरा पोहोचले त्यामुळे छोट्या मूलीला त्या दिवशी सुट्टी घ्यावी लागली. तिच्या
मैत्रिणीने आम्ही येणार म्हणून पोहे, चहा, चिकन व चपाती (दुपारी जेवण्यासाठी) अगोदरच
बनवून तयार ठेवले होते. घरी सकाळी 9-00 वाजताच
ताजेतवाने होऊन आम्ही त्याचा समाचार घेतला. घर भाड्याचे असुनही ( 4 जणात विभागून) मोठे
व छान होते, आजुबाजूचा परिसरही मस्त होता. वातावरण थोडे ढगाळ होते तरी हवा ताजी व आल्हाददायक
होती. थोड्यावेळ गप्पा मारुन आम्ही झोपून गेलो दोघेही. मुलगी मात्र न झोपता दुस-या
दिवशीसाठीची तयारी केली. पाव-भाजी करीत होती.
पहिल्या भागात “विठ्ठ्ल पावला होता
तर आता “ रखुमाई” पावली होती. आणखीन
काय हवे असते आमच्या सारख्यांना!
नंतर उठून आम्ही मुली सोबत तिचे
(नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हरसीटी) कॉलेज बघायला 3 तास गाडीने फिरत होतो. मुलगी आम्ही यायच्या आधी एक महिनाच ग़ाडी (भाड्याने)
घेऊन शिकून तयारपण झाली होती. त्याची एक झलक निसर्गरम्य टाहो तलाव भटकंती करून परत
येताना दिसली होती. उत्तर कॅरोलिनात 1) नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हरसीटी,
2) ड्यूक युनिव्हरसीटी, 3)व्हर्सिटी युनिव्हर्सिटी आणि 4)नॉर्थ कॅरोलिना (खाजगी) अशा
4 जगप्रसिद्ध विद्द्यापीठे असून 3 शासनाची
व एक खाजगी आहेत. NC State Univarsity चे कॉलेज एका फार मोठ्या प्रांगणात असून त्याची
स्थापना सन 1887 साली झाली. विद्यापीठाच्या आवारातच एक मोठे तळे आणि घनदाट झाडी आहेत.
जिथे मुले, मुली फिरायला, चालायला किंवा क्वचित भेटायला/ बोलायला जमू शकतात. तसेच विध्यार्थींसाठीच्या
व्यायामशाळा, मोठी लायब्ररी, 3 तरण तलाव, मनोरंजन, खेळाच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी
दिलेल्या विविध सुविधा पाहून मुलीच्या भाग्याचा हेवा वाटला. खरे तर, छोटी मुलगी अमेरिकेत
कधी जाईल असे वाटत नव्हते पण मोठ्या बहिणीचे पारडे जड झाले. मागच्या वर्षीच ऑगस्ट
2022 मध्ये ती इथे शिकायला आली परंतु दोघी अमेरिकेत (पूर्व किनारा आणि पश्चिम
किनारा) अशा दोन टोकावर आहेत.
छोट्या मुलीने आई-वडीलासोबत स्थानिक स्थळे
फिरणे, प्रशिक्षण कालावधीतील नौकरी सांभाळून आमचे पुढील यात्रेचे सामान, तिकीट म्हणजे
6 दिवसाची दक्षिण-पुर्व-उत्तर-अमेरिका अशी यात्रा बुक करुन न्युयार्कची विमानाची तिकिटेसुद्धा
काढून झाली होती. काय म्हणावे दोघींना तेच कळेना. ह्यांच्या बकेट लिस्टमध्ये “ नायगरा पाहणे” होते हे मलाही माहित
नव्हते पण मुलिंनी मात्र बरोबर शोधून त्याप्रमाणेच यात्रेची आखणी केलेली होती. खरंच
मुली मनकवड्या ना किती! मग तो आईसाठी आणलेला झोपाळा आणि झकुझी का असेना! 3 दिवस ऑफिस
आणि 3 दिवस सुट्टी असा ह्या मुलीकडे आणि उरलेले 6 दिवस टुर असा एकूण कार्यक्रम आखून
झालेला होता. आधीच “ नो अपिल ” म्हणून सांगण्यात
आले आम्हाला!
छोटी मुलगी सकाळी 5 वाजता उठून स्वत:चे
सर्व आटोपून, आमचे दुपारचे जेवण बनवून, स्वत:चा डब्बा घेऊन जात होती. याच बरोबर आमची
विविध ठिकाणे गाडीने बघण्याची सोय देखील केलेली होती. तदनंतर कामावरून संध्याकाळी
6 वाजता परत आल्यानंतर परत आम्हाला परिसरात गाडी घेऊन फिरवून आणणे असा दिनक्रम तिचा
व आमचा सुरु झाला. ती गेल्यानंतर आम्ही आजुबाजुला सोय केल्याप्रमाणे परिचितांसमवेत
परिसर फिरुन येत होतो. शिवाय काही वेगळे प्रकार मुलींना खाऊ घालणे हेही मला करायचे
असे. हो, एक सांगायचे राहीले, मुलींचा भाड्याचा वार्षिक करार संपत आलेला असल्याने हे
घरपण बदलायचे होते त्यामुळे त्यांची (पॅकिंगची)
गडबड चालु होती. तिच्या मैत्रिणीचेसुद्धा खुप
सहकार्य मिळाले आम्हाला, काही हवे आहे का याचीही काळजी घेत होत्या. दुस-या दिवशी आम्ही
ठरविल्या प्रमाणे तिचे सहाध्यायांनी गाडीने पोहोचवुन 3 संग्रहालये बघितली. विज्ञान,
कला आणि इतिहासाची. लहानपणी आम्ही त्यांना शाळेत /पिकनिकला /खेळायला पोहोचवत होतो आता
त्या दोघी आम्हा दोघांना पोहोचवत होत्या! ड्ब्बा,
पाणी, सॅनिटायझर, मास्क आणि सोबत पत्ता लिहिलेले व्हिजीटींग कार्ड (हरविले तर)! किती
काळजी घेत होत्या, भुमिका बदललेल्या दिसत होत्या. मुली लवकर जबाबदारी घेतात का? वयाच्या
दहाव्या वर्षीच बाहेर पडल्यामुळे (कराटे स्पर्धा) ह्या मुलीला बाहेर सगळ्यांशी कसे
वागावे/ समजून घेणे/ समजावणे ह्या गोष्टी चांगल्या जमतात. याचेच प्रात्यक्षिक आम्ही
बघत होतो. मनातल्या मनात समाधान आणि कौतुकही वाटत होते. हे तिन्ही संग्रहालय अतिशय
उत्तम दर्जाची आणि माहितीपुर्ण होती. एक लघुपटपण दाखविला, “बुर्शी” ( Fungus हाही एक
विषय असु शकतो) खुप माहितीपुर्व, सुंदर आणि छान होता. जुने संदर्भ सांभाळुन ठेवण्याची अमेरिकन लोकांची
वृती वाखाणण्यासारखी आहे. इतिहाससुद्धा अगदी सविस्तर आणि चलतचित्रासकट बघायला (आम्ही
परदेशी असूनही) स्वारस्य वाटत होते. तीच गोष्ट
कला आणि विज्ञान संग्रहालयाबाबत म्हणता येईल. सजीव प्राणीसुद्धा आणि त्यासाठी लागणारे
वातावरण, राखीव कप्पे सगळे वाखाणण्यायोग्य होते. कलादालन तर वेगवेगळ्या संस्कृती, वेषभुशा
आणि राहणीमानाचे सविस्तर चित्रे, पुतळे आणि व्हिडीओजद्वारे विस्तृत माहिती देण्यात
आलेली होती.
सोबत
काही फोटो जोडलेली आहेत त्यावरुन कल्पना येईल.
दुस-या दिवशी थंड हवेचे आणि उंचीवरचे(
Blowing Rock) ठिकाणी गेलो. 3 तास गाडीने प्रवास करुन (पाऊस नसल्यामुळे) अतिशय आल्हाददायक
वातावरण, दुतर्फा गर्द झाडी, डोंगर-द-याचे निरीक्षण करित आम्ही मजेत फिरत होतो. 4 जुलैची
(अमेरिकन स्वातंत्र्यदिन) फुलांची सजावट, विद्युत रोषणाई व लोकांचा उल्हास जास्तच दिसत
होता. हे ठिकाण ट्रेकिंग व रोक क्लायबिंगसाठी प्रसिद्ध असुन नैसर्गिक सौंदर्याचे वरदान
लाभलेला हा प्रदेश व्यवस्थित स्वच्छ राखून ठेवलाय हे जास्त महत्वाचे. एका पार्कमध्ये
चक्क झोपाळासुद्धा खेळुन झाला. जांण्या-येण्यात 7-8 तास गेले तरी थकवा अजिबात जाणवत
नव्हता हे विशेष. आल्यावर एका मैत्रिणीचा वाढदिवस होता तोही एकत्र आमच्या साक्षीने
साजरा करण्यांत आला.
तिस-या दिवशी ड्यूक युनिवर्सीटी
आणि परिसर बघायला गेलो. हे एवढे मोठे होते
कि त्या आवारात चर्च, पार्क (सार्वजनिक) असून तळे आणि अवतीभोवती विवीध झाडे आणि फुले
यामुळे प्रसन्न वातावरण होते. नंतर एका तळ्याकाठी फिरायला गेलो होतो तिथे काजवेपण बघायला
मिळाले. तळे एवढे मोठे होते कि, पुर्ण गोल फेरी मारायला एक तास लागतो म्हणे! एकूणच
सगळीकडे निसर्गाची भरपुर मेहरबानी दिसून येत होती. निरर्भ आकाश बघून आणि स्वच्छता बघून
खुप छान वाटत होते. शेवटचा दिवस सर्व देवळे (3) आणि एक मोठा तलाव बघण्यांत गेला. मोठ-मोठे
देऊळे आणि भव्य परिसर बघून मन प्रसन्न झाले. संध्याकाळी आल्यावर वेळ कमी मिळायचा तरी
जवळपास सगळी महत्वाची स्थळे, देवळे दाखवून झाली आम्हाला. एकूण 6 दिवस कसे गेले ते कळलेच
नाही. छोट्या लेकीचाही पाहुणचार घेऊन दुस-या दिवशी सकाळच्या विमानाने न्युवार्क टुरला
जायचे होते. तयारी करुन निघायचे खरे तर सगळ्यांनाच अवघड झाले होते. त्यातल्या त्यात
एवढेच समाधान होते की धाकट्या मुलीचा सहवास 13 दिवस का होईना मिळाला. त्यांची धावपळ,
शिकण्याची धडपड आणि त्यासाठी चाललेला संघर्ष खरंच कौतुकास्पद वाटला. शिकताना काय काय
कसरती कराव्या लागतात हे त्यांच्याबरोबर राहून न सांगता कळले. “यशस्वी व्हा” म्हणून आणि पुढच्या
मे-24 मध्ये ( graduation ceremony) भेटण्याचे आश्वासन देऊन सगळ्यांचा निरोप घेतला.
आम्हाला पोहोचवायला गाडीने विमानतळावर न्युयार्कसाठी
( सकाळी 5.30 वाजता) मुलगी होती, लगेच तिला ऑफिससाठी निघायचे असुनसुद्धा! यात्रेचा सविस्तर वृतांत वारीच्या पुढच्या भागात
पाहुया! भेटू या लवकरच भारतात, आता घरचे वेध
लागलेत, निघायची तयारी करायची आहे!


मोठी व धाकटी दोघांचे कौतुक 👌सुंदर प्रवास आयोजन, तसं तुम्ही उभयतानी त्यांना घडवणं त्याचेच सुंदर फळ म्हणून तुमचंही कौतुक 👏 CM
ReplyDeleteDhanyawad & suswagatham 🙏👍👌
DeleteVery nice
ReplyDeleteDhanyawad & suswagatham 🙏
Deleteप्रवास वर्णन छानच आहे. पण त्यासाठी मुलींनी केलेल नियोजन व घेतलेले कष्ट पण कौतुकास्पद आहेत.
ReplyDeleteDhanyawad & suswagatham 🙏👍
Deleteखरंच खूप छान वाटलं वाचायला.पोरीपण लय भारी असंच म्हणावंसं वाटतं.
ReplyDeleteगीताताई
Dhanyawad & suswagatham 🙏👍
DeleteMastach Madam👌👍
ReplyDeleteDhanyawad & suswagatham!
DeleteNav lihile tar bare zale aste!🙏
👍👌👌
ReplyDeleteDhanyawad,name?
DeleteKhup sunder.
ReplyDeleteDhanyawad!
Delete