अधिक मास आणि आपण
सध्या (अधिक) श्रावण मास चालू आहे, त्याच्या कथा, वृत, जावयाचा मान-पान आणि लेकीचे कौतूक असा एकूण माहोल आहे. हिन्दू कैलेंडरनुसार प्रत्येक तीन वर्षानंतर कालगणनेनुसार एक अधिक महिना येतो. अधिक महिन्याची जन्मकथा असेही सांगते की, दर महिन्याला सुर्य हा एकेका राशीतून संक्रमण करतो. या महिन्यात हे संक्रमण होत नाही म्हणूनच याला “मलमास” “पुरुषोत्तम मास” किंवा “धोंड्याचा महिना” असेही म्हणत असावेत. हिन्दू संस्कृतीमध्ये अधिक महिन्यात स्त्रिया व्रत, दान, पूजा पाठ करतात. अधिक मासात भगवान विष्णुची की पूजा केल्यास शुभ फल-प्राप्ती होते असे म्हणतात. देवांचे पुजन करुन सर्वांनी भक्तीभावाने वागावे व श्रद्धापुर्वक जीवन निदान एक महिना तरी जगावे असे आपल्या पुर्वजांना वाटत असावे. अधिक मास महिन्यात पितरांच्या नावाने दान पुण्य कर्म केले जाते. अधिक मासातील अमावस्यामध्ये वस्त्र, अन्न, चप्पल, काळे तिळाचे आणि दिप-दान केले जाते.
या महिन्यात दानधर्म, उपवास, पोथीवाचन, संयम आणि एकूणच शरीराचे व मनाचे आरोग्य सांभाळणे शक्य होऊ शकते. खाण्या-पिण्यांमध्ये या महिन्यात पुरणाचे मोदक किंवा पुरणपोळी, अनारसे, मैसुरपाक, असे अनेक जाळीचे प्रकार 30+3 प्रमाणात (बहुधा) जावयाला दान दिले जातात किंवा इतरांनाही देवळात किंवा संस्थेलासुद्धा देणगी दिली जातात. काहीजण एखादी आवडती वस्तू खाण्याचे सोडून देतात. जावयाचे कौतुक (पुर्वी दशम ग्रह म्हणून आणि त्यांनी आपल्या मुलीची आयुष्यभर जबाबदारी घेतलेली असते म्हणून ) करायला तेवढेच निमित्त्य हवे म्हणून असावे. अधिक म्हणजे “बोनस” असेही समजायला हरकत नाही मग तो मिळालाच नाही असे गृहीत धरुन काहीजण जास्तीचा खर्च करीत असतात. हल्ली जावई हा “जावई” नसून मुलगाच समजला जातो. त्यामुळे जावयाचे कितीही कौतुक केले तरी कमीच असते शिवाय मुलीलाही त्यानिमित्त काहीतरी देणे-घेणे होते. “अधिक माहिना” यावरुन काही विनोदही रचले जातात. (या महिन्यात अधिक काम करावे लागते तरी शासनाने अधिक मासासाठी अतिरिक्त मासिक वेतन आणि निवृत्तीवेतन देण्यास हरकत नाही असे) मुलगी गरीब असेल तर नक्कीच मदत करावी. हल्ली गरीब कोणी दिसतच नाही मात्र विचाराने गरीब असू शकतात.
नकारात्मक अर्थाने “दुष्काळात तेरावा महिना” असे म्हटले जाते. हा महिना मात्र त्याला अपवाद असावा. याला नवीन आयाम द्यायचे ठरविलयास आपण वेगळ्या प्रकारे हा महिना साजरा करु शकतो. दर 3 वर्षांनी आपली संपत्ती, पैसा, जमीन-जुमला, साधनसामुग्री यांची मोजदाद करण्यांत यावी. त्यातील मिळणारा अतिरीक्त फायदा, व्याज, काही वस्तूंचा वापर होत नसल्यास वापरायोग्य होऊ शकेल का याचा विचार करुन त्याचे वाटप करावे. आपल्या गरजेनुसार काय अतिरीक्त ठरु शकेल याचाही आढावा घेण्यांत येऊन अतिरीक्त वस्तू गरजूंना देण्यास हरकत नाही. कपडे-लत्ते, खोटे दागिने, कटलरी, फर्निचर, इलेक्ट्रोनिक्स वस्तु, ओटोमॅटिक वस्तू, भांडी-कुंडी... अशा अनेक वस्तू” देता येत नाहीत पण ठेवताही येत नाही अशा पडून असतात, त्याही मोठ्या मनाने इतरांना देऊन टाकाव्यात. आता अधिक मास आहे त्याचा अधिक खर्च आहे. कालगणनेनुसार महिना अधिक होतो.
परदेशात ही एक गोष्ट चांगली वाटली, ते लगेच आपल्या वस्तु बाहेत विकावयाला ठेवतात आणि त्यांना वापरलेल्या वस्तु ( सेकंड सेल)वा परायला कमीपणा पण वाटत नाही हे विशेष. हल्ली महागाई एवढी वाढलीय त्याला तोंड देणे थोडेफार शक्य होऊ शकेल या निमित्त्याने. शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी (पुस्तक, पेन्सिल, वह्या, कागद) लागत असतात. जर त्या स्वस्तात मिळाल्या किंवा कोणी फुकट देऊ केल्या तर हव्याच असतात. वृद्धाश्रम, अनाथालयात किंवा काही संस्था (चॅरिटीकरणा-या) हे काम नि:स्वार्थी भावनेने करत असतात. अशा वेळी आपण त्यांनाही अप्रत्यक्षरित्या मदतच करू शकतो. चांगल्या स्थितीतले किंवा दुरुस्त करून olx वर टाकणारे बरेच जण असतात पण नेहमीच विकले जाते असे नाही, तेव्हा गरजूंना देणे जास्त महत्वाचे वाटते. कृतज्ञता दान असेही याला म्हणता येईल.
आपल्याकडील ज्ञान, कला-कौशल्य, अनुभव हेही आपण या महिन्यात मोफत किंवा कमी दरात आकारुन समाजसेवा साधू शकता. शेवटी आपल्याला समाधान कशाने मिळते याचा शोध घेणे महत्वाचे हेच यातुन साधावे यासाठी हा (अधिक) महिना असावा असे वाटते. कलाकार, समुपदेशन, वैद्यकिय सल्ला, इलाज किंवा व्यापारीसुद्धा कमी दरात किंवा मोफत काही वस्तू विकून आपला हातभार लावू शकतात. दानाची संकल्पना आता आपण विस्तारुन देहदान, अवयव-दान, रक्तदान, नेत्रदान, पेशीदान, प्लाझ्मा दान याही स्वरुपात किंवा दानाची तशी तजवीज करून ठेऊ शकतात. संपत्तीचे वाटप, वापर आणि विनियोग योग्य रितीने करण्याची तयारीही (ईच्छापत्र) करू शकता. शिक्षण, बचत, आरोग्य, स्वच्छतेचे महत्व आणि शिस्त पाळण्याबाबतचे मार्गदर्शन व स्वत: तसे वागणे किंवा सुरूवात करणेही स्वागतार्ह ठरु शकते.नाना पाटेकरांच्या शब्दात “ओजळ भरुन वाहून जाण्याआधीच त्यातील थोडे इतरांना द्यावे.” पुन्हा भरणे परमेश्वराच्या हातात असतेच.
बाय द वे, हा विचार याच अधिक महिन्यात केला पाहिजे असे काही नाही. एक तास, एक आठवडा, एक महिना कधीही तुम्हाला वाटेल तेव्हा करु शकता. पुण्य मिळेल म्हटले की, लोक मनापासून करतील असे आधी वाटायचे म्हणून असे महिने, काही देवांच्या नावाने सांगितले जायचे. अजून वेगळे काही आपणांस सुचत असल्यास तेही आपण सांगू शकता/करू शकता, बघा पटते का तुम्हाला!

Aapan sangitlyapramane ne ya adhikmassala Mazya mothya bahinila Vaastusathi drayadaan ( Dhan) kele aahe jya mule mala manasik samadhan milale. Jase ki Onjal bharun te khali sandu naye ani dilyane ti parat parat bharel.
ReplyDeleteAple nav lihile aste tar kalale aste.
ReplyDeleteKhup chan kele apan, taycha उल्लेख Kiva Apexa,kautuk talave hi vinanti.
Mazya lekhache sarthak zale ase vatale.
Dhanyawad & suswagatham! God bless you always!🙏👍👌❤️