ऊंच माझा झोका
एकेकाळी “ऊंच माझा झोका “ या नावाची मालिका झी टिव्हीवर खूप प्रसिद्ध होती. महादेव रानडे आणि रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारीत असलेली मालिका, त्या दोघांचा (विक्रम गायकवाड आणि स्पृहा जोशी) सुंदर अभिनय करणारे आणि विषयाची पार्शभूमी लक्षात घेऊन मालिकेची एकूणच चांगली भट्टी जमली होती. या सदाबहार मालिकेची आठवण म्हणून या शिर्षकावर आधारीत निरनिराळ्या क्षेत्रात यशस्वी महिलांना “ऊंच माझा झोका” हा पुरस्कार देऊन नावाजले जाते. त्यालाही आता 10-12 वर्षे होउन गेली, नुकताच हा सोहळा पार पडला त्यानिमित्त हे लिखाण.
२२ ऑक्टोबर २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील
एसडीएससी एसएचएआर येथून चांद्रयान-१ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. चंद्राच्या
रासायनिक, खनिजशास्त्रीय आणि फोटो-जिओलॉजिकल मॅपिंग करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता.
तथापि मुदतीपुर्वी २९ ऑगस्ट २००९ रोजी अंतराळयानाशी संपर्क तुटला होता. चंद्रयान-2
14 ऑगष्ट 2020 रोजी चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी सोडण्यात आले. यात चंद्राच्या अनोळखी
दक्षिण ध्रुवाचा शोध घेण्यासाठी ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हरचा समावेश होता. लँडिंगच्या
तयारीसाठी विक्रम लँडर ऑर्बिटरपासून वेगळे करण्यात आले होते. चंद्राच्या पृष्ठभागाच्या २.१ किमी उंचीपर्यंत सामान्य
कामगिरी दिसून आली. त्यानंतर लँडरचा ग्राउंड स्टेशनशी संपर्क तुटला. आणि ते चंद्रावर
अनियंत्रितपणे आपटले. सोबतचा चंद्राभोवती ऑर्बिटर आपल्या आठ अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणांचा
वापर करून चंद्राच्या उत्क्रांतीची आणि ध्रुवीय प्रदेशातील खनिजे आणि पाण्याच्या रेणूंचे
मॅपिंग 1 वर्षच्या एवजी वाढीव 7 वर्ष करणार आहे. या मोहिमेत आलेल्या काही अपयशाने खचून न जाता कमीत
कमी खर्चात आपल्या इस्त्रोच्या महिला वैज्ञानिकांनी ही मोहिम यशस्वी करून दाखविली.
यामागे त्यांचे आणि भारतीय शास्त्रज्ञांचे कष्ट, मेहनत शिवाय दुरदृष्टीचे आणि अभिमानास्पद
कामगिरीचे कौतुक करावे तेवढे कमीच म्हणावे लागेल. एखादी मोहिम यशस्वी करण्यामागे सरकार,
पैसा, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञानाचा मोठा सहभाग असतो. भारतासारख्या विकसनशील देशाला
या सगळ्याची काय आवश्यकता आहे? अजून गरिबी हटविली जात नाही आणि हा खर्च खरंच आवश्यक
आहे का? अशा अनेक किंतू परंतू वर एक ठोस उत्तर
दिले गेले हेही नसे थोडके.
अथांग अवकाशात नेमके काय आहे? समुद्राच्या खोलीत
काय दडलेले आहे?वेगळे जीव शोधणे, नविन शोध लावणे. होणा-या घटनां मागचे कारण काय? अवकाशात
सजीव आहेत का? या विविध ग्रहगोलांचे, दिर्घीका(orbits), ब्लॅक होल यांचे रहस्य काय
हे शोधण्याकडे मानवाचे आदिम काळापासून सहज सुलभ कुहूतूल असते. तथापि एकीकडे खेळ (क्रिकेट),
बॉलिवुड आणि राजकारणात एवढा पैसा ओतणारी माणसे त्यात अशी गुरफटून गेलेली आहेत की अशा नाविन्यपुर्ण
शोध किंवा आधुनिक प्रगतीला जेवढे पाहिजे तेवढे
लक्ष देत नाही हेही एक कोडेच आहे. सामान्य माणूस तर आपाआपल्या दैंनंदीन गरजा भागविताना
हैराण झालेला असतो. असे असले तरी अशा मोहिमांकडे त्यांचे बारीक लक्ष असते. चांद्रयान
3च्या उड्डाणाच्यावेळी सगळे जग या क्षणांवर डोळा लावून बसला होता. यावरुन त्यांचे कुतुहल,
जिज्ञासा आणि काहीतरी नवीन घडतेय/नवीन सापडतेय याला नक्कीच पाठिंबा दिसून येत होता.
चंद्रयान 3 वरून बरेच विनोद, श्रेय लाटण्याचेही अनेक प्रकार झाले. कोणाच्याही
मदतीने का होईना सुर्य उगवणे महत्वाचे! (कोंबडा झाकून ठेवला तरी).
अवकाश, खगोल आणि फिजिक्स क्षेत्राकडे बाकी भारतीय मुले का आकर्षित होत नाहित?
हा प्रश्न माझ्या डोक्यात आला आणि अनेक प्रश्न निर्माण झाले? केवळ दक्षिण भारतीय आणि
मद्रासचीच मुली, मुले का या क्षेत्राकडे वळतात? या क्षेत्रात कसे प्रवेश घ्यायचे हेही
काहीजणांना माहीत नसते. बहुतेकजण डॉक्टर, इंजीनियर, लेखा परिक्षक आणि सरकारी नोकर होतात
पण या क्षेत्राकडे पाठ फिरवितात. याला कारण म्हणजे या क्षेत्राची माहिती नसणे, भाषेचा
प्रश्न, अन्य राज्यात जीवन कसे काय व्यतीत
होईल? याची माहिती नसणे, संशोधनाचा कंटाळा (संयम) वास्तविक ही (इस्त्रो) संस्था केंद्रसरकारच्या
अखत्यारीत येते. या “Indian Space Research Organisation (ISRO)” संस्थेत इंटर्नशिप,
विविध पदावर भरती ही शासकीय नियमानुसार होते. यात पगारही आकर्षक आहे. नोकरीसाठी आवश्यक
ते विषय ही पदाच्या जाहिरातीत ठेवलेली आहे. त्याची अधिक माहिती समाजमाध्यमावर उपलब्ध
आहे. या पदाबाबत महाराष्ट्रात मोठी एवढी अनास्था
का? त्यापेक्षा त्यांना परदेशी जाणे का योग्य वाटते? तरी याचापण विचार व्हावा असे वाटते.
स्त्रीने ठरविले तर ती काहीही करू शकते
हेही पुन्हा एकदा अवकाश क्षेत्रातून सिद्ध
झाले. एकीकडे “भारीपण बाई देवा” असे म्हणत जुनेच “अत्याचाराच्या/अन्यायाच्या” कथा पुन्हा
आळवायच्या तर दुसरीकडे अशा क्षेत्रात महिलांनी आघाडी मिळवायची यासारखा विरोधाभासावर
हसावे की रडावे हेच कळत नाही. आता स्त्रिया सगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवित असताना
त्यांचे कौतुक करायचे की “किती ग बाई हा त्रास”
म्हणून आळवणी करीत बसायचे? एखादाच “मंगलयान”, “रॉकेटरी” काढून आपल्याला या क्षेत्राची
माहीती देण्यांत येते. अजून मराठी चित्रपटसृष्टी मागे का असाही प्रश्न पडतो. अशा कर्तत्ववान
महिलांवर काढा ना सिनेमा!
आताच्या स्त्रियांचा झोका नक्कीच उंचावलाय हे मलाही
मान्य आहे. त्याला कारण शिक्षण, प्रोत्साहन आणि तिच्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन.
तरीही काही ठिकाणी अजून बरीच मजल गाठायची आहे. पल्ला बराच आहे आणि अजून ब-याच क्षेत्रात
त्यांचा प्रवेश अपेक्षित आहे जसे की उत्पादन, मेकॅनिकल आणि संशोधन व तंत्रज्ञान. घर, मुले आणि संसार ह्या तिच्या झोका उंचावयाला कधी
कधी बाधा आणतात. अशा वेळी तिला स्वत:लाही ही जाणिव होणे आणि त्यासाठी योग्य तो संघर्ष
करण्याचीही तयारी ठेवावी लागते. जसे देशाच्या काना-कोप-यातुन गायक-गायिका, नर्तक शोधण्यासाठी
वेगवेगळे प्रयत्न केले जातात तसेच अशा शास्त्रप्रीय हुशार मुले, मुलींचा शोध घ्यावयास
काय हरकत आहे? त्यानंतर त्यांना उच्च- शिक्षण,
प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शिक्षक,पालक यांनीसुद्धा विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
उद्याचा भारत घडविण्यासाठी अशा नवनवीन बुद्धिमंतांची आणि नाविन्यपुर्ण कल्पनांची आवश्यकता
आहे. जे आधीच परदेशी जाऊन त्यांचे भले करीत आहेत त्यांना परत येण्यासाठी प्रोत्साहन
देऊन नव-नवीन शोध, संशोधन करण्याची गरज आहे.
स्त्रीयांनीसुद्धा नुसते संतूर गर्ल ( दिखाऊ
सुंदर) न बनता त्यांचे “पिढी घडविण्याचे काम” इमानेइतबारे करावे लागेल. अब्दुल कलाम,
जयंत नारळीकर हे आई-बाबांच्या योग्य संस्काराशिवाय घडूच शकले नसते, मान्य की ते हुशार, कष्टाळु आणि ध्येयवादी
होते. आजचा प्रज्ञानानंद आई-बाबांशिवाय पुढे
जाऊ शकला असता का? ज्या शास्त्रज्ञ महिलांचे कौतुक होते आहे त्यांनासुद्धा कोणीतरी
घरुन पाठिंबा दिलयाशिवाय त्या पुढे गेल्या असत्या का? याचाही विचार झाला पाहिजे. तेव्हा
झोका उंच जाताना येणा-या अडचणींवर मात करणेही तेवढेच महत्वाचे आहे. समाजाची सर्वांगिण
प्रगतीच अपेक्षित असते.
बाय द वे, आपल्या माहितीसाठी लिन्क सोबत
जोडित आहे ज्यावर या क्षेत्राची अद्ययावत माहिती मिळू शकेल. निदान पुढची पिढी तरी मनात
विचार करुन अंमलात आणू शकेल. अंतराळ संशोधन क्षेत्र वाढत आहे. अधिक माहितीसाठी वेबसाईट iist.ac.in मधील
“Opportunities” आणि “Placement” पहावी.
To help aspirants compiled
list of Space Research Centres in India.
|
Indian Space Research
Centers & Units |
|
|
Location |
Space Centres |
|
New Delhi |
DOS branch secretariat |
|
ISRO branch office |
|
|
Delhi earth station |
|
|
Dehradun |
Indian Institute of Remote Sensing |
|
Centre for Space Science and Technology
Education in Asia-Pacific (CSSTEAP) |
|
|
Byalalu |
Indian Deep Space Network (IDSN) |
|
Indian Space Science Data Centre (ISSDC) |
|
|
Lucknow |
ISTRAC Ground Station |
|
Kolkata |
Eastern RRCC |
|
Aluva |
Ammonium Perchlorate Experimental Plant |
|
Bhopal |
Master Control Facility-B (MCF) |
|
Chandigarh |
Semi-Conductor Laboratory (SCL) |
|
Shillong |
North Eastern Space Application Centre |
|
Hyderabad |
NRSA or NRSC – National Remote Sensing
Agency /Centre |
|
Tirupati |
NMRF-National Atmospheric Research
Laboratory |
|
Sriharikota |
Satish Dhawan Space Centre (SDSC), SHAR |
|
Port Blair |
Down Range Station |
|
Mahendra Giri |
ISRO Propulsion Complex |
|
Thiruvananthapuram |
Vikram Sarabhai Space Centre |
|
Liquid Propulsion Systems Centre |
|
|
ISRO Inertial Systems Unit |
|
|
Indian Institute of Space Science and
Technology (IIST) |
|
|
Hassan |
Master Control Facility |
|
Banglore |
Space Commission |
|
Department of Space and ISRO Headquarters |
|
|
Civil Engineering Programme Office |
|
|
U R Rao Satellite Centre (URSC) |
|
|
Laboratory for Electro-Optical Systems
(LEOS) |
|
|
Southern RRSC |
|
|
Human Space Flight Centre (HSFC) |
|
|
INSAT Program Office |
|
|
NNRMS Secretariat- National Natural
Resources Management System |
|
|
Antrix Corporation |
|
|
ISTRAC-ISRO Telemetry Tracking and Command
Network |
|
|
New Space India Limited (NSIL) |
|
|
Liquid Propulsion Systems Centre |
|
|
Mumbai |
ISRO Liaison office |
|
Nagpur |
Central RRSC-Regional Remote Sensing Centre |
|
Mount Abu |
Infrared Observatory |
|
Ahmedabad |
Space Application Centre (SAC) |
|
Physical Research Laboratory (PRL) |
|
|
Development & Educational Communication
Unit (DECU) |
|
|
Jodhpur |
Western RRSC – Regional Remote Sensing
Centre |
|
Udaipur |
Solar Observatory |

माहितीपूर्ण लेख
ReplyDeleteDhanyawad 🙏
ReplyDelete