रॅगिंग एक दहशत
कॉलेजमधील पहिले काही महिने, म्हातारपण, भोळेपणा,
नवीन लग्न झालेली नवरी, नवशिका उमेदवार, गरीब वृत्तीचा नौकर/नोकराणी, एकूणच सहनशील
व्यक्तीला हा सामना कधी ना कधी करावाच लागतो. रॅगींग करणा-याला( मुलांना विशेषत:) फक्त
मानसिक समाधान मिळते की बघा कसे मी समोरच्याला नमवले! कुठेतरी दादागिरी करायची वृत्ती, मोठेपणा दाखविण्याची,
शक्ती प्रदर्शन करण्याची तीव्र इच्छा हे करायला भाग पाडत असावी. परंपरागत समज-गैरसमज,
पुरुषी अहंकार, माझ्या सासूने मला त्रास दिला मग मीपण माझ्या सुनेला दिलाच पाहीजे असे
अनेक चुकीच्या धारणा किंवा आर्थिक गळचेपीसुद्धा हे करायला कधी कधी भाग पाडते असे मला
वाटते.
रॅगिंगसारख्या गंभीर विषयावर पालक अथवा विद्यार्थी
असतील यांना केवळ महाविद्यालयात रॅगिंग करणार नाही असे प्रतिज्ञापत्र देणे (Anti
Ragging Affidavit) आणि महाविद्यालयातील नोटीस बोर्डवर रॅगिंग केल्यास कारवाई करण्यात
येईल एवढ्याच तरतुदीची माहिती असते. तसेच रॅगिंगसारखा घृणास्पद अपराध करणारा केवळ जुजबी
कारवाई होऊन सुटेल असा गैरसमज असल्याने त्याविरोधात पिडीत विद्यार्थी लढा देत नसल्याचे
धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रॅगिंगसारख्या घृणास्पद अपराधाविरोधात असलेले राज्यशासनाचे
कठोर कायदे व नियम, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या निर्देशांना अनुसरून विद्यापीठ
अनुदान आयोग (यूजीसी) तसेच राज्य शासनाने काढलेले परिपत्रक व भारतीय दंड संहितेची असलेली
कलमे, युजीसीची २४ तास चालू असलेले टोल-फ्री सुविधा इ. बाबत जनतेस माहिती व्हावी, रैगिंगसारख्या
अपराध व अन्यायाविरोधात कसा लढा द्यावा याची माहिती सामान्य जनतेस होणे आवश्यक आहे.
रॅगिंगसारख्या
गंभीर अपराधाविरोधात राज्य शासन असेल, विद्यापीठे असतील असेल अथव युजीसी (विद्यापीठ
अनुदान आयोग) असेल यांचे खालीलप्रमाणे अत्यंत महत्वाचे कठोर कायदे व नियम आहेत.
रॅगिंगसाठी शिक्षा (Punishment for
Ragging)-
रॅगिंगसारख्या गंभीर अपराधात केवळ विद्यार्थीच
नाही तर चौकशीत अथवा कारवाई करण्यात कर्तव्यात कसूर करणाऱ्या शैक्षणिक संस्थाच्या प्रमुखांवरही
कारवाई करण्याची कठोर तरतूद करण्यात आलेली आहे.
(i) महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९
कलम ४ नुसार जो कोणी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या रॅगिंग करत असेल, त्यात भाग घेणे,
त्यास प्रेरणा देणे किंवा त्याचा प्रचार करणे असले प्रकार करत असेल तर, अपराध सिद्ध
झाल्यानंतर दोन वर्षांपर्यंत कारावासाची आणि दहा हजार रुपये दंड करण्याची तरतूद करण्यात
आलेली आहे.
(२) कलम ५ नुसार कलम ४ अंतर्गत अपराध सिद्ध झालेल्या
विद्यार्थ्यास शैक्षणिक संस्थेतून काढून टाकण्यात येईल आणि ज्या दिवशी त्याला काढून
टाकण्यात आले आहे त्या दिवसापासून पाच वर्षांच्या कालावधी करता त्याला इतर कोणत्याही
शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही अशी कठोर तरतूद करण्यात आली आहे.
(ii) कलम ६ नुसार सात दिवसाच्या आत चौकशी करणे आणि विद्यार्थ्यास
निलंबित करणे-
रॅगिंगचा एक अघोषित आणि अनोंदित प्रकार
म्हणजे मुलगी नोकरी करते म्हणून घरातील कामे नाकारण्याची कारणे नको, सगळे व्यवस्थितच
झाले पाहिजे. कर्ज काढून सण नको साजरा करायला, आमच्याकडे असे चालत नाही, तुमच्या माहेरी
चालते का? माहेरी जायला कोणी आजारी आहे का? आजोळी जाऊन मुले बिघडतात, मुली 5 वर्षांच्या
झाल्या की त्यांना कामाला लावले पाहिजे, मुलांना सोडून नोकरी कशाला करायला पाहिजे?
भरपूर खा, इतरांची काळजी करु नको, अशा अनेक वाक्यांची बरसात कमी-अधिक प्रमाणात अजुनही
होत असते तेव्हा यालाही रॅगिंगचा एक प्रकार असे म्हणावेसे वाटते. दहशतीचे लघुरूप असलेले
हे बोलणे मनावर कायमस्वरुपी कोरले जाते. तेव्हा मनाला काय भोके पडतात का? असे शहाजोगपणे
विचारणारेही कमी नसतात. एका कानाने ऐकायचे आणि दुस-या कानाने सोडून द्यायचे, त्यात
काय मोठे? असे तुम्ही म्हणाल पण तो क्षण आणि ती परिस्थीती कोणीच बदलू शकत नाही एवढे
मात्र खरे.
घराघरात
असे रॅगींग कमी-अधिक प्रमाणात घडत असतेच, नाईलाज म्हणुन कोणी याची जाहीर वाच्यता करीत
नाही. याकडे दुर्लक्ष केले तरी दुरगामी होणारे मनावर आणि नात्यावर होणारे परिणाम आपण
टाळू शकतो ना! समानता आणि माणुसकी जरी मनात असली तरी हे कमी होऊ शकेल. त्यासाठी लागणारे
संस्कार आणि समानतेची जपणूक लहानपणापासुनच मनावर रुजवली पाहिजे. नुकतेच एक मैत्रिण
सांगत होती, अमेरिकेसारख्या प्रगत देशातसुद्धा रंग-रुपावरून रॅगिंग चालते हे ऐकून आश्चर्य वाटले.
कार्यालयातही नवीन असताना हा अनुभव कधी कधी येतो तेव्हा काय करावे तेच समजत नाही. पुर्वीची आणि आताची परिस्थीती फक्त भौतिकरुपीच सुधारली, बाकी मानसिकता/ परिस्थीती सुधारायला आणखीन किती वर्षे लागतील ते काय माहित! सध्या या शिक्षणाची जास्त गरज आहे असे मला हल्ली वाटायला लागले आहे. मनोरंजन क्षेत्रातही उमेदीच्या काळात रॅगींगच्या नावावर जे चालते ते कधी बंद होणार? स्त्रीविषयक दृष्टिकोन कधी बदलणार? असे अनेक प्रश्न अजूनही मनात निर्माण होतात.

छान कथा
ReplyDeleteDhanyawad 🙏
DeleteNav lihike aste tar kon mhanun kaly shakle aste.