वचन, गुलाब आणि व्हॅलेंटाईन

             फेब्रुवारी महिना सुरु झाला की, हे सगळे ऐन बहरात असते. कथा, नाटक, किस्से, भेटी, सवलत, सेल आणि उत्सव असा सगळीकडे नुसता प्रेमाचा पूरच आलेला असतो. बाकी महिने अगदी कोरडे ठाक असतात जणू!

स्वर गंगेच्या काठावर वचने देऊन काही गाणी गाणारे अमर होतात तर शिवाजी-अफजलखानाची मिठी इतिहास घडवितात. फुले मग कोणतीही असो, मन प्रसन्न तर करतातच पण गुलाब मात्र (फुलांचा राजा म्हणून आणि किंमत) आणि बहुरंगी तसाच बहुअर्थी असल्यामुळे असेल कदाचित.

             आपणही साहित्यीक प्रेमात थोडे रंगून जाऊ म्हणून हा छोटासा प्रयत्न! प्रेमाचा रंग कसा यावर अनेक मतभेद असू शकतात. त्यावर आजपर्यंत जेवढे चित्रपट, गाणी, कविता आणि नाटके अजरामर झालीत उद्याही अनेक येतच राहतील कारण प्रेम विषयच अजरामर आहे. एकवेळ माणूस संपेल पण हा विषय संपणार नाही. मुळात प्रेमाचे भुकेले हे सगळेचजण असतात. पशु-पक्षी, प्राणी, वनस्पती अगदी झाडेसुध्दा. काही निर्जीव वस्तुंवरसुद्धा काहीजणांचे प्रेम असते त्याचेच दुसरे नांव  ऋणानुबंधअसेही म्हणतात. घर, गाडी (मोबाईल, दुचाकी, चारचाकी) अशा अनेक वस्तुंच्या प्रेमात बरेचजण असतात. व्यक्त करणे हे केवळ माणसांलाच जमते म्हणून तो सर्वश्रेष्ठ मानला जातो. वचन देणे आणि घेणे हेही माणसांलाच जमते. अलिखीत बांधिलकी, संस्कारातून आणि कृतीतूनही आपण भावना व्यक्त करीतच असतो.

        वचन कधी लिखीत तर कधी अलिखीत असते. काहीजण कर्तव्य समजून मरेपर्यंत वचन निभावत असतात. काहीजण स्वत:च स्वत:ला वचनबद्ध राहून त्याप्रमाणे वागतात आणि दुस-यासमोर एक आदर्श निर्माण करतात. आई-वडिल, भाऊ-बहीण हे तर रक्तामुळे बांधील असतात तर काहीजण माणुसकी, देशसेवा आणि समाजसेवा म्हणून कार्यरत असतात. (पोलीस, सैंनिक, डॉक्टर आणि शिक्षक) तसेच काही कलाकार आपल्या कलेवर प्रेम करुन दुस-यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात.

           प्रेम करणे/मिळविण्यासाठी कोणतेही दिव्य करायला माणसे मागेपूढे पहात नाही तर ते मिळाले नाही म्हणुन निराश होउन जगणे सोडून देणारेही असतात. कधी अति-प्रेमामुळे हक्क गाजविणे, गृहित धरणे होते तर कधी प्रेमाची जाणीव ती व्यक्ती जीवंत असेपर्यत एखाद्याला होतच नाही. भांडतांनासुद्धा प्रेमाचाच दाखला दिला जातो. अती-प्रेमापोटी काही गुण-दोष झाकले जातात किंवा झाकून ठेवले जातात. कधी आंधळे प्रेम-वाईट मार्गाला/संगत लागते तर कधी कधी प्रेमाने वाईट माणूस सुधारलाही जातो. सौंदर्य, हुशारी, धाडस तर कधी मोकळे व्यक्तीमत्व प्रेमात पडायला लावते, तर कधी निवड चुकीची ठरुन पश्चाताप करायला लावते. मोठ-मोठ्या भेटी देऊन, पैशावर/संपत्त्ती प्रेम आकर्षित करते आणि ते संपले की प्रेमही कमी होते. विश्वासाने प्रेम जिंकते तर संशय प्रेमाचा अंत करते. एकतर्फी प्रेमातून कधी कधी वाईट घटना घडतात तर निरपेक्ष प्रेम जग जिंकायला मदत करते.

        गुलाबाचे अनन्यसाधारण महत्वामूळे किती महाग होत चालला आहे याची कल्पना न केलेलीच बरी.  तसेही हल्ली फुले माळणे किंवा देणे /घेणे हे एक पद्धत म्हणुन ठीक आहे पण नंतर त्याचा कचराच होउन तिसरा दिवसही बघायला मिळत नाही. पर्याय म्हणून प्लॅस्टिक, वेल्वेट किंवा कागदी फुलेही वापरले जातात. खरेच अशी फुले देऊन / घेऊन प्रेम वाढेल किंवा कमी होईल का हा एखाद्याचा संशोधनाचा विषय ठरु शकेल.  इतर फुलेही तेवढीच आकर्षक असतात हे विसरुन चालणार नाही.

         पुर्वीचे संसार, नाती, भावना, संस्कार, आचार-विचार हे प्रेमामुळेच टिकून होते. आता मात्र सगळे काही असून यंत्रवत माणसे जगत असतात. काहीजण तर हे सगळे करायला वेळ कुठे म्हणुन चक्क दुर्लक्ष करतात. व्हर्चुअल (आभासी) जगणे एवढे अंगवळणी होत चालले आहे की, माणसांचे आपापली बेटे तयार होत चालली आहेत. विज्ञान, तंत्रज्ञानामुळे माणूस माणसांपासुन दुरावतोय की जवळ येतोय हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. याचे दिर्घकालीन काय परिणाम होतील याचा कोणी विचार करत असतील का? यावर ऊपाय काय? दिखाऊपणा करून सगळे यशस्वी झाल्यास काही हरकत नाही पण नंतर त्याचे दु:परिणामही सोसावे लागतात हेही लक्षात घेतले पाहिजे. निसर्गाच्याही सान्निध्यात प्रेम वाढीस लागते कारण हा माणसाचा नैसर्गिक स्थायीभाव आहे. कोणी कुणावर कसे व केव्हा प्रेम करावे हा ज्याचा त्याचा स्वभाव/वृत्ती असावी पण दुस-यांना त्रासदायक होऊ नये एवढीच माफक अपेक्षा.  तेव्हा सावध व्हा, ऐका पुढल्या  हाका, जागे व्हा आणि इतरांनाही जागे करा एवढेच सांगावेसे वाटते.



Comments

  1. प्रेम या विषयाचा छान उहापोह !!

    ReplyDelete
  2. पुर्वीचे संसार, नाती, भावना, संस्कार, आचार-विचार हे प्रेमामुळेच टिकून होते. आता मात्र सगळे काही असून यंत्रवत माणसे जगत असतात. काहीजण तर हे सगळे करायला वेळ कुठे म्हणुन चक्क दुर्लक्ष करतात.
    यावर उपाय काय?
    CM

    ReplyDelete
    Replies
    1. Lahanpanapasunach he shikave lagel🙏👍
      Dhanyawad!

      Delete
  3. आता मात्र सगळे काही असून यंत्रवत माणसे जगत असतात. काहीजण तर हे सगळे करायला वेळ कुठे म्हणुन चक्क दुर्लक्ष करतात.
    यावर आता उपाय काय?

    ReplyDelete
    Replies
    1. Ekmekana vel Dene/ ghene, janeev thevne evdhe kele tari pure!😀🙏

      Delete
    2. Manapasun eecha asel tar sagle mite!

      Delete
  4. Ekmekana vel Dene/ ghene, janeev thevne evdhe kele tari pure!😀🙏
    पण हे ही यंत्रवत असले तर काय?

    ReplyDelete
    Replies
    1. Mag vaat baghane yantra kadhi nadurust hoil yaachi😀👍

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव