रंग बरसे…..

              ‘रंग बरसे’ हे गाणे आणि अशी अनेक गाणी होळीनिमित्त आपल्याला ऐकायला मिळतात. नवरंग मधले  “जारे नटखट असु दे  नाहीतर मराठीतील खोडी कशी काढली..” “रंगात रंगुनी.ऱाधा बावरी असू दे. रंगाचे महत्व तसेच कृष्णाचा खोड्करपणा अधोरेखीत करणारी ही गाणी ऐकून, बघून, नाचून वेड  लावतात. वर्षाच्या शेवटचा सण म्हणून होळी”  रंगपंचमी साजरी केली जाते. कोकणी माणूस तर गणपती आणि होळीला गावी गेल्याशिवाय राहूच शकत नाही. एक निसर्गाची अवस्था ( येऊ घालणारी), थंडी कमी होते, पाने झ्डतात, नवीन पालवी फुटायची वेळ झालेली असते. रंगांची ओळख आपल्याला लहानपणीच करुन दिली जाते. त्याचे आकर्षण शेवटपर्यंत असतेच. शेतात धान्यपण (उन्हाळी) पेरा यची वेळ झालेली असते या सर्व हेतुने या सणाला विशेष महत्व दिसून येते. रंगाच्या दुनियेत माणुस, फुले, पाने, फळे,  पशु-पक्षीसुद्धा हरवून जातात. काही ठराविक रंग कोणाला आवडीचे असतात तर काही जणांना अजिबात आवडत नाहीत विशेष करुन काळा, तपकिरी, ग्रे. या रंगाशिवाय जगण्याची शिक्षा देव काहीजणाना  देतो तेव्हा वाईट वाटते. रंग माझा वेगळा म्हणून जगणारी आणि इतरांच्या आयुष्यात रंग़ भरणारीही माणसे असतात.     

         काही देश, पंथ, राजवटीमध्ये सुद्धा रंग़ांना अनन्यसाधारण महत्व असायचे. जरिपटका म्हणजे भगवा पेशव्यांनी स्विकारला होता. बुद्धांनी पांढरा, भारताचा तिरंगा, अमेरिकेचा निळा, पाकिस्तानचा हिरवा असे अनेक रंग मान्य करण्यात आलेले आहेत. त्यामागे त्यांची काही भुमिका असते ज्यामुळे रंगाचे महत्व तसेच भावनात्मक स्पष्टिकरण होते. हिरवा शांतीचा, पांढरा-संयमाचा तर भगवा त्यागाचा असे अनेक भाव दर्शविताना दिसतात. नवरात्रीत सुद्धा देवीच्या आवडीचे आणि सात दिवसांचे सात रंग मिरवले जातात. सगळ्यात महत्वाचा रंग माणुसकिचा जो देवालाही सगळ्यात आवडतो. देवांचेही आवडते रंग आहेत, गणपती व देवी-लाल, शंकर-पांढरा, हनुमान-शेंदरी, काही देवांच्या मुर्त्या काळ्याच असतात. हो, काळा रंग काहीजण अशुभ मानतात तर शोक दर्शविण्यासाठी पांढरा रंग परिधान करतात. काहीजण काळा रंग अभिमानाने मिरवतात (black is beauty) म्हणून. रंग-बिरंगे कपडे, वस्तु, कधी कधी खरेदीसाठी मोहात पाडतात.  या सात रंगांनी आणि त्यांच्या छटांनी तर सगळी दुनिया भारलेली असते कायम. डोळ्यांची पारख या रंगांवरुन केली जाते  की याऊलट त्यासाठीच देवाने डोळे दिले असावेत असे कधी कधी वाटते.

          नैसर्गिक इंद्रधनुष्य तर निसर्गातली हिरवाई, आभाळाचा निळा रंग, पाण्याचा पारदर्शकतेचा (बेरंग-ज्यात मिसळतो तसा रंग येतो)  गुण तर माणसाला वेडा बनवते. पानी रे पानी.. जिस्मे मिलाऊ तैसा.. असे वागल्यास सगळ्यांची सोबत मिळते. कलाकाराची रंगसंगती, फॅशनच्या, कपड्यांच्या, खेळण्यांच्या दुनियेत रंगावरुन त्याचा दर्जा, कलात्मकता, किंमत ठरविली जाते. कित्येक उद्योग या रंगावर अवलंबून असतात. गृहिणीच्या स्वयंपाकघरात रंगांची उधळण तर असतेच पण तिचे पाककौशल्यसुध्दा रंगावरुन सिद्ध होते. (पिवळीधमक बटाट्याची भाजी, पुलाव, गुलाबजाम, लाडूचे भाजणे, तळणे हे त्याच्या रंगावरुन त्याची खाण्याची सक्षमता दर्शविते. रंगाच्या वेगवेगळया छटा तर निवडीची प्राधान्ये ठरवितात. काही स्त्रिया सासरच्या रंगात रंगून जातात (आपलेसे करतात) तर काही माझा रंग वेगळा म्हणून वेगळे अस्तित्व सिद्ध करतात. काहीजण प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघतात तर काहीजण देशाच्या रंगात स्वत:चा जीवही द्यायला मागेपुढे पहात नाहीत. शांती, समाधानासाठी संत महात्मे पांढरा/ केशरी/ भगवा रंग परिधान करुन अध्यात्माची शिकवण देतात तर काहीजण त्याग/ सेवा दर्शविण्यासाठी पांढरा रंग परिधान करतात. (डॉक्टर, नर्स, शिक्षक).

        सुखावणारे आणि दुखवणा-या रंगाचा माणसाला कधी ना कधी संबंध येतोच, नाईलाज असतो. शक्यतो चांगले रंग दाखवले तर बरे असे मला वाटते. अध्यात्मात नेहमी सांगितले जाते, षडरीपूवर संयम बाळगा आणि चांगले गुण ( सात्विक्ता, प्रामाणिकपणा, नि:स्वार्थ आणि सचोटी) वृद्धिंगत करायचा प्रयत्न करा ते यासाठीच. रंग उडाल्यावर एखाद्या वस्तुची किंमत कमी तर होतेच पण कधी कधी माणसांच्या चेह-यावरचा रंगही उडतो. (प्रासंगिक कारणांमुळे) तर कधी चेहरा आनंदाने/उत्साहाने उजळून उठतो. कातडीच्या उजळ रंगामुळे कित्येकजण आवडते होतात तर काहीजण कायम नावडते असतात. जातीचा रंग देऊन काहीजण भेदभाव करतात तर राजकारण करुन काहीजण रंगाला अती-महत्व देतात. प्रत्येक रंगाचे महत्व परिस्थितीनुसार, वयानुसार बदलत असते. सगळ्या माणसांचा रक्ताचा रंग तर लालच असतो मग जातिभेद कशाला? स्त्रियांच्या बाबतीत तर रंगाला जास्तच महत्व दिले जाते. अशा या रंगांचे महत्व आपण बाहेर बघतो पण आपला स्वत:चा रंग (अंतरंग) कसा आहे याचा परिचय आपल्याला होतो का? हा मोठा प्रश्न आहे.

                               नवीन वर्षाच्या खूप (रंगबिरंगी) शुभेच्छा

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव