फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

           नुकतीच एका घरगुती पार्टीला जाण्याचा योग आला नेहमीप्रमाणेच घरी बनवलेले कमी आणि बाहेरुन आणलेले/ मागवलेले जास्त असे अनेक पदार्थांची रेलचेल होती. सगळे काही झाल्यावर काही पाहूणे  थोडे उशीरा यावयाचे असतात त्यांच्यासाठी आणि स्वयंपाकाचे उरलेली सामान आवरण्याची गृहिणीची कसोटी लागते तेव्हा हा फ्रिज / शीतपेटी अगदी मदतीला धाऊन येते.  मोठे सामान मुकपणे सर्व काही पोटात सामाऊन घेत असतो.  तरी नाक मुरडणारे जेवण  थंडच होते हो  म्हणून सगळा मूड घालवणारेही कमी नसतात. वेळेवर सगळे मागवणे, वाढणे, फजिती  होऊ नये म्हणून आदल्या दिवशीच तयारी करुन ठेवणे. कच्चा माल तयार ठेवणे  (खोबरे किसून ठेवणे, मसाला वाटून ठेवणे, कोशिंबीर किसून ठेवणे, स्टार्टर कच्चे तयार ठेवणे..) अशा अनेक कामात मदत करणारा यांत्रिक मदतनीस आणि जेवण वाया जाउ न देणारा उपकारक/ देव म्हणून या फ्रिजचे  नक्कीच मोठे कौतूक वाटते.

          आमचे घर मात्र या फ्रिजच्या बाबतीत उपाशीच राहत असावा. सकाळचे जेवण संध्याकाळी न खाणा-यांना कसले आले आहे कौतुक? 1857 साली बनवलेलेस का? म्हणून विचारल्यावर कोण परत ऐकून घेणार? त्यामुळे माझा फ्रिज कायम रिकामाच असतो. दुध, भाजी, फळे आणि आता कुठे मासे ठेवायला मी सुरूवात केली आहे यावरुन तुम्हाला कल्पना येईल. तरी मी नोकरी करते म्हणुन हा ए्‍क्सकुज (excuse) मला मिळालेला नाही आणि मी ए्‍क्सकुज (excuse) घेतही नाही कारण मला स्वत:ला ते थंड गरम करा मग खा हे आवडत नाही. क्वचित कधीतरी जास्त झाले अन्न तर ते मलाच खावे लागते मग कशाला हे विकतचे दुखणे आणि ऐकून घेणे! व्यवहारीक तत्वावर तर याची गरज असतेच. होटॅल, औषधाची दुकाने, हॉस्पीटल्स, किराणा दुकाने आणि पार्लेर्स यांचे तर फ्रिजशिवाय पानच हलणार नाही. शेतक-यालाही शीतकपाटे/ शित गोदामे मोठ्या प्रमाणावर उप्लब्ध करुन दिल्यास त्याचे होणारे नुकसान आपण टाळू शकतो. नवीन एक संकल्पना काही ठिकाणी राबविली जाते. बहुधा गावात राहिलेले अन्न इतरांनी साठवून गरजुंनी येऊन घेऊन जाणे. हे जर सगळीकडे शक्य झाल्यास वाया जाणा-या अन्नाची नासाडी कमी होऊ शकते.(community fridge)

       हल्ली वारंवार सांगितले जाते की फ्रिजमधले अन्न खाऊन विकतचे दुखणे लाऊन घेऊ नका पण ऐकतो कोण? आम्ही मात्र पुर्वीपासुन हे धोरण ठेवल्यामुळे कदाचीत आजारपण कमी आले असावीत असे म्हणावयास हरकत नाही. आता मला लहानपणची आठवण होउन फ्रिजला वाचा फुटली तरअशी कल्पना सुचली. कायम आळोखे-पिळोखे देणारा फ्रिज कोणाच्या हातचे कोणाच्या पोटातअसे गाणे म्हणत असावा. कधी एकदा दार उघडून माझे पोट रिकामे होऊन मला मोकळा श्वास घ्यायला मिळेल याची वाट बघत असावा. बये दार उघड बये दार उघड असे म्हणून वाट पहात असावा.  गृहिणीच्या दुरदृष्टीचे कौतुक करावे की किव करावी असा त्यालाही प्रश्न पडत असावा. अगदी एक दिवसापासुन महिन्यापर्यंत आणि वर्षभराची बेगमी करणारे अनेकजण असतात. त्यांच्याकडे केव्हाही, काहीही आणि कोणत्याही वस्तुंचा तुटवडा भासणार नाही असे मला वाटते. ही पद्धत आपण पाश्चात्यांकडून विकत घेतली. त्यांची परिस्थिती आणि आपली वेगळी आहे हे मात्र कोणी लक्षात घेत नाही. अगदी 2-2 फ्रिज असणारेही लोक आहेत. त्यात मग सुके कडधान्यापासून ताज्या अन्नापर्यंत सर्व काही उपलब्ध असते. पाहुणे आले तर अगदी फजिती होण्याची शक्यता नसतेच शिवाय घर भरलेले आहे हे एक गृहिणी म्हणून समाधान असते ते वेगळेच.  ऐनवेळी होणारी धावपळही टाळता येऊ शकते.  पुरुषहो, कधी तरी फ्रिजमध्ये डोकावून बघत जा,तुमची सगळी सोय केलेली असते. (बायको गेली माहेरी/फिरायला, काम करी फ्रिजवरी) करोनात तर त्याची खुपच मदत झाली. एका गृहिणीने तर त्याचा कपाट म्हणून उपयोग केल्याचे कळले तेव्हा तर मला तिचे कौतुकच वाटले. (दार थोडे किलकिले ठेवावे लागले).

         तोच फ्रिज जर बोलायला लागला तर अनेक गृहिणींची स्वयंपाकघरातील गुपिते बाहेर पडतील. ताजे, सकस अन्न खाल्ले तर कधीही चांगलेच. मुंबईसारख्या ठिकाणी तर 12 महिने सर्व काही ताजे मिळते तर खरेच आवश्यकता आहे का? कधीतरी याची मदत घेण्यास हरकत नाही, याचेवर पुर्णपणे अवलंबून राहणे योग्य आहे का याचा जरूर विचार व्हावा असे मला वाटते. थोडे खा पण चांगले खा असे पुर्वी सांगायचे ते खरेच आहे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

वसंतोत्सव