परदेशी शैक्षणिक महोत्सव-2024
छोट्या मुलीच्या नॉर्थ कॅरोलीना विद्यापीठातील पदवीदान समारंभासाठी अमेरिकेत येण्याचे प्रयोजन होते. त्यासाठी मोठ्या मुलीच्या सॅन फ्रेंन्सिको येथील घरी आलो. तेथे मुली कडील प्रेमळ पाहुणचार 20 दिवस घेतल्यानंतर नियोजन केल्यानुसार विमानाचे धाकट्या मुलीच्या “पदवीदान” समारंभासाठी मोठ्या मुलीसोबत नॉर्थ कॅरोलिना येथे आलो. त्याप्रमाणे आम्ही 2 मे, 2024 तारखेला निघून 4 तासाच्या प्रवासानंतर 3 मे, 2024 रोजी उत्तर कॅरोलिना, रॅली येथे सकाळी 8.00 वाजता घरी पोहोचलो. मोठ्या मुलीने कॅरोलीना मधील वास्तव्यासाठी एक गाडी 3 दिवसासाठी भाड्याने घेतली होती. अमेरीकेत ओला / उबेरपेक्षा गाडी भाड्याने घेणे त्यामानाने स्वस्त पडते. अमेरिकेत गाडी भाड्याने घेतात आणि स्वत: चालवतात. छोट्या मुलगी साबुदाणा खिचडी आणि चहा तयार ठेऊन वाटच पहात होती. खाऊन झाल्यावर आंघोळ आणि छान साडी व मुली ड्रेस घालून तयार झाल्या. नॉर्थ कॅरोलीना विद्यापीठातील दुपारी 1.00 वाजताचा पदवीदान कार्यक्रम बघण्यासाठी घरून 12.30 ला निघालो. तिथे गेल्यावर ( कॉलेजचा) एका सभागृहात मोजक्याच विद्यार्थ्यांसोबत हा सोहळा पार पडला. पदवीदान समारंभाच्या वेळी मुलीने छान भाषण केले आणि तीचा पेहराव छानच दिसत होता. तसेच त्यांच्या विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुखांचे स्वागतपर भाषण आणि ओळख एवढाच छोटेखानी कार्यक्रम अल्पोपहार घेउन संपला. या सुंदर समारंभास उपस्थित रहाण्याचे आम्हाला भाग्य लाभले.
दुस-या दिवशी मुख्य कार्यक्रम महाविद्यालयाचा
(University) होता जो “मुख्य
आकर्षण” आणि भव्य-दिव्य
असा होता ज्यासाठीच तर एवढा सगळा खटाटोप पदवी
मिळालेल्या सर्व मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी केलेला होता. हा कार्यक्रम सकाळी 10.00
वाजता होता पण आम्ही सगळेजण 9.00 वाजताच तिथे स्टेडियमवर पोहोचलो कारण पालक आणि विदयार्थी
वेगवेगळे बसणार होते. इंग्रजी साहेबाचे सगळेच भव्य-दिव्य या उक्तीनुसार सगळा महोत्सवच
वाटणारा असा होता. एकूण क्षमता 1 लाखापेक्षा जास्त क्षमता असलेले स्टेडियम त्यासाठी
सजविण्यात आले होते. अवतीभोवतीचा परिसर तर छानच होता. व्यवस्थापन आणि मांडणीसुद्धा
आकर्षकच होती. बरोबर 10.00 वाजता कुलगुरु, प्रमुख पाहुणे आणि इतर मंडळींचे आगमन टाळ्याच्या
गजरात आणि त्यांच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
रसायन शास्त्र विषयाचे नोबेल पारितोषिक
विजेते मा. विल्यम डी पाहुण्यांची ओळख, प्रस्तावना आणि पदवीदान समारंभ असे एकूण नियोजन
होते. महाविद्यापीठाने सन 2024 मधील एकूण 14000 विद्यार्थी यावर्षी (पदवीधर, द्विपदवीधर
आणि पी.एच.डी.धारक) उत्तीर्ण झाले होते शिवाय त्यांचे पालक,नातेवाईक आणि कर्मचारी,
अधिकारी, शैक्षणिक खात्याचे सबंधित असे एकुण खुपच गर्दी होती पण कुठेही अव्यवस्था,गोंधळ
किंवा गडबड दिसुन आली नाही. चारी बाजूला स्क्रीन लावलेले होते. शिस्त ही त्यांच्या पाचवीलाच पुजलेली असावी. अगदी
पार्कींगपासुन ते बैठक व्यवस्था किंवा विध्यार्थ्यांचे कौतुक असू दे, सगळीकडे शिस्तच
शिस्त!
प्रमुख पाहुणे नोबेल पदक विजेते( 2021-रसायनशास्त्राचे
मानकरी) होते पण त्यांचे भाषण एवढे हसत-खेळत आणि थोडी चेष्टा-मस्करी करण्यांत पार पडले.
कोणताही गंभीर भाव न आणता अगदी सौजन्याने विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्षन केले.
महत्वाचे म्हणजे कार्यक्रमाचे नांवच त्यांनी “कमेन्समेंट
प्रोग्राम-2024” दिल्यामुळे
अर्धे अधिक काम झाले. शैक्षणिक कार्यक्रम संपला तरी त्याची अंमलबजावणीची सुरुवात होणे
अपेक्षित आहे असे तर सांगायचे नसेल त्यांना (आयोजकांना)? एकूण काय कार्यक्रमाच्या टॅगलाईनपासुन
ते आयोजनापर्यंत ते किती दक्ष असतात ते लक्षात आले. कुलगुरु व इतर शैक्षणिक अधिकारीही
कमी-अधिक असेच खुसखुशीत बोलत होते. नंतर आला विद्यार्थ्यांचा कौतुक-सोहळा. त्यात वैद्यकिय,
इंजीनियर्स, विशेष प्राविण्यधारक, डॉक्टरेट मिळालेले आणि सैंन्यातले विद्यार्थांचाही
समावेश होता. शिवाय सगळ्यांचा आदर-सत्कार आणि ओळख-परेडही होतीच. पुढील आयुष्याची सुरुवात
आम्ही करुन दिलेली आहे,आता ते प्रभावीपणे अंमलात आणा असाच सगळ्यांचा रोख होता.या सगळ्या
सोहळ्याचे लाईव्ह टेलिकास्ट जगभर होत होते आणि ज्यांना येणे शक्य नाही ते घरबसल्या
बघूही शकत होते. याशिवाय मुक-बधिरांनाही याचा आनंद घेण्यात यावा यासाठीची विशेष भाषांतर
व्यवस्थाही करण्यांत आली होती. यावरून समाजातील
सर्व स्तराची किती काळजी घेण्यांत येते हे यावरुन दिसुन येते. “नयनरम्य“
आणि भव्य-दिव्य असेच सोहळ्याचे वर्णन करता येईल. साहेबाचे तसे सगळे भव्य-दिव्यच असते.
पैसा,आवड आणि सवडही आहे तर सगळे शक्यही होत असावे.
भारताचा विचार केल्यास मुळात शिक्षण हा “सोहळा”
असतो हेच आपल्याला मान्य नसते. शिक्षण हा एक
गंभीर आणि तणावात करायचे, पोटा-पाण्याची व्यवस्था करण्याचे साधन एवढाच हेतु पालक आणि
पर्यायाने मुलेही समजत असतात. त्यासाठी करावी लागणारी धडपड आणि पैसे याचा विचार केल्यास
तसे परदेशी शिक्षण महाग पडते पण भावी संधी आणि कमी स्पर्धेची चिंता विद्यार्थ्यांना
परदेशी जाण्यासाठी भाग पाडत असावीत. तरी आता बरेच प्रयत्न शिक्षणासाठी सरकार, वेगवेगळ्या
संस्था करीत असतात त्यामुळे प्रोत्साहन मिळतच असते पण ते तुलनात्मकरीत्या सगळ्यांना
मिळतेच असे नाही. वास्तविक मोठ-मोठ्या कंपन्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर म्हत्वाच्या
पदावर आपले भारतीयच दिसून येतील. सत्या नांडेला, सुंदर पिचाई,….असे अनेक मातब्बर मंडळी,
अर्थव्यवस्था आणि उद्योग सांभाळण्यासाठीचे योगदान देतात. आय.आय.टी.एन., एन.आय.टी. मधील
मुले तर हमखास परदेशात मागवली जातात. त्यांना आकर्षक पॅकेजेस दाखवुन परदेशात बोलावले
जाते. तिथे बुद्धीमत्तेला योग्य न्याय दिला जातो असे म्हणतात शिवाय आपले विद्यार्थीही
योग्य ती मेहनत घेऊन भविष्य उज्वल करण्याचा प्रयत्न करतात हेही तेवढेच खरे !
परदेशी शिक्षण घेणे तसे सोपे नाही. मध्यम वर्गीयांना तर कर्जे काढूनच मुलांना
पाठवावे लागते. शिवाय खाणे-पिणे, वातावरण सगळेच एकदम भिन्न पण त्याही परिस्थीतीत मुले
शिकतात आणि नोकरी मिळवतात हे नक्कीच कौतुकास्पद आहे. दोन्ही मुली द्विपदवीधर झाल्या
याचा आम्हाला मोठा अभिमान आहे. मोठीच्या वेळी “कोविड
“ असल्यामुळे (मे-2020) पदवीदान समारंभ
झाला नव्हता. आता मात्र नेत्रदीपक सोहळा, आम्ही चौघे एकत्र असा दुर्मिळ योग आला आणि
आमचा आनंद द्विगुणित झाला एवढे खरे!
हा आनंद अजुन पुढे साजरा करायचा होताच. कसा ते बघूयात यानंतरच्या लेखात भारतातून!


Mast chitra ubhe kelay Madhavi!
ReplyDeleteDhanyawad Madhuri Tai 🙏
Deleteप्राचीचं खूप खूप अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा----गीताताई
ReplyDeleteDhanyawad,nav lihile Aste tar!🙏👍
Deleteप्राची आणि प्रज्ञा दोघींचे अभिनंदन !त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा तसेच मला परत फील झाले की कॉन्व्होकेशनला मी स्वतःच हजर राहिली आहे . इतके छान वर्णन केलेले आहे तुम्ही तुम्हा दोघांचेही आई-वडिलांचे खूप खूप अभिनंदन
ReplyDeleteIt's possible due to all your blessings!
DeleteDhanyawad 🙏
DeleteDhanyawad Geetatai 🙏
ReplyDeleteCongratulations Dear Prachi Madhavi Hemant Bhangle..
ReplyDeleteKeep it up..God bless
Dhanyawad,nav lihile aste tar!🙏👍
DeleteCongratulations 💐
ReplyDeleteDhanyawad 🙏👍
DeleteDhanyawad 🙏👍
ReplyDeleteNav lihile Aste tar!
पदवीदान कार्यक्रमाचे सुंदर चित्र उभ केलय ब्लॉगमधून.
ReplyDeleteप्राची, प्रज्ञा यांच व तुम्हा सर्वांच अभिनंदन.
Dhanyawad,nav lihile aste tar!🙏👍
Delete