रामराज्य, गणराज्य की स्वराज्य?
दि. 23-1-24 रोजी “न भुतो ना भविष्यती” असा धार्मिक सोहळा अयोध्या येथे पार पडला. सगळा भारत हा सोहळयानिमित्त भक्तीमय झाला होता. नविन वर्षातली रामनवमीसुद्धा जोरात साजरी झाली. गुढी-पाडव्या पासून सुरु होणारे हिंदु नववर्ष ख-या अर्थाने साजरे केले जात होते. अशा वेळीही काहीजण बोटे मोडीत होती तर काहीजण राजकीय रंग देऊ पाहात होते. त्यानिमित्त एक सिध्द झाले की, सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे? कोणताही धर्म देशापेक्षा मोठा नसतो. लोकांना एकत्र आणणे जसे आता कठीण आहे. तसेच तेव्हाही (प्राचीन काळी) होते. त्यातून मार्ग काढण्यासाठीच हे उत्सव, सण आणि निसर्गाची सांगड घालुन साजरे करणे हे मानवापुढे एक आव्हान ठेवण्यांत आले होते. त्यातुनच मग आदर्श कसा असावा यासाठीचे ग्रंथ निर्माण झाले रामायण आणि महाभारत. रामायण तर घडण्याआधीच लिहिण्यात आले होते असे सांगितले जाते. म्हणजे बघा, किती दुरदृष्टी त्यावेळच्या ऋषिमुनींमध्ये होती.
रामाप्रमाणेच “आदर्श”
असे रामराज्याचा उल्लेख केला जातो. जिथे एका धोब्यालासुद्धा राणीविरुध्द बोलण्याचा
अधिकार आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात. अशा या रामराज्याचा दाखला देऊन काहीजण राजकीय
खेळी करतात तर काहीजण कवीकल्पना म्हणून त्याची अवहेलना करतात. राजेशाही आणि साम्यवादाचे
एकत्रीकरण करुन वास्तविक आपण स्विकारलेली “लोकशाही
त्याचेच एक लघुरुप आहे. मोठी लोकसंख्या. मानसिकता आणि हक्क आणि कर्तव्याची जाणीव असेल
तर कोणतेही राज्य “ रामराज्य”
बनायला वेळ लागणार नाही. त्यासाठी लोकांना शिक्षीत आणि राजकीय इच्छाशक्ती असणे आवश्यक
असते. नेमके तेच होत नाही, बहुसंख्य आणि इतर गरीबीचे मुद्दे घोटून घोटून वारंवार लोकांना
अजुनही निवडणूक काळात आश्वासने दिली जातात. पण “ती”
पाळणे विसरुन जातात.
शिवाजी महाराजांचे असेच “स्वराज्य”
हे स्वप्न होते ते त्यांनी प्रत्यक्षात आणूनही दाखविले परंतु नंतर ते सांभाळणे आणि
त्याचे रुपांतर सुराज्यात करणे अजुनही आपल्याला जमत नाही. दर 5 वर्षानी आपण योग्य नेत्याची
निवड करतो आणि लोकशाहीचा पालक म्हणुन तेही गर्वाने राज्य करतात परंतु सर्वसामान्य माणसांच्या
गरजा संपतात का? संपणार आहेत का? याचे उत्तर मात्र कोणीही देऊ शकत नाही. जिथे अर्थव्यवस्था
जगात पहिल्या 5 मध्ये प्रवेश करीत आहे तिथेच अजुनही मुलभुत गरजांअभावी मरण पत्करणारी
माणसेही आहेत. अजूनही महिला सुरक्षित, सुशिक्षीत आणि स्वावलंबी पुर्णपणे झाल्यात का?
रामराज्याप्रमाणे आपले नातेवाइक, संपत्तीचे एकत्रिकरण होते का? शिवाजी-महाराजांनी लोकांना
तोशिस होऊ नये म्हणुन सुरत लुटली तर आत्ताचे नेते देशालाच लुटणे भुषण समजतात.
वैयक्तिक स्वार्थ आणि सत्तेचा
मोह यांना सोडता येतो का? लोकशाहीचे कित्येक तत्वे आणि घटकांचा विचार तरी केला जातो
का? बरे, लोकापवाद, न्यायालये, वर्तमानपत्रे आणि मतदान तरी प्रामाणिकपणे पार पाडले
जाते का? अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक यांचा हवा तसा वापर करणे हे महत्वाचे काम मात्र
इमाने-इतबारे केले जाते. जात-गरिबी, शिक्षण आणि रोजगार याचा नको तेवढा बाऊ केला जाऊन
लोकांना मुर्ख बनविले जाते आणि लोकही आशा ठेऊन जगतात. दरवेळी नवीन मुद्दा लोकांना आकर्षित
करण्यासाठी योजला जातो. अशा या स्वातंत्र्योत्तर लोकराज्यात आपण तरी खरेच जबाबदारीने
वागतो का? मग नेत्यांना दोष देण्यात तरी काय अर्थ?
बाय द वे, रामाचा, शिवाजी महाराजांचा, परकीय नेते लोकशाहीचे पालक ( अब्राहिम लिंकन, आत्ताचे ओबामा यांचे किंवा आपले नेते लालबहदुर शास्त्री, मनमोहन सिंग अटलबिहारी वाजपेयी यांचे) एक तरी गुण/तत्व (आताच्या राज्य-कर्त्याने) अंगिकारल्यास खुप काही साध्य करता येऊ शकेल. तुम्हाला काय वाटते आणि कसे अंमलात आणाल ते लवकरच कळेल.

अतिशय योग्य आणि सध्याच्या परिस्थितीशी सुसंगत असं लेखन
ReplyDeleteDhanyawad Madam 🙏
Deleteअतिशय सुंदर आणि समर्पक . पण एकच सांगावेसे वाटते कि यावर विंदानी छान कविता केलेली आहे , सब घोडे बारा टक्के .
ReplyDeleteEk Tari ghoda changla bighava na!🙏
Deleteमी म्हणते
ReplyDeleteजेव्हा गणराज्य सांभाळण्यासाठी रामासारख्या पुरुषोत्तमरूपी देवाची स्थापना होते त्या स्वराज्यात रामराज्य प्रस्थापित होते व गणराज्य आबाधित रहाते.
छान आहे लेख.
ReplyDeleteDhanyawad,name please 🙏
Delete