आधुनिक युगातला मातृभक्त पुंडलीक

                              If you take care of your parents,

                  Your children will be take care of their parents.

                                  - Dr. Vithal Indira Venakatesh Kamath.

        नुकतेच विट्ठल कामथ लिखित यश, अपयश आणि मी हे पुस्तक वाचनात आले. याधी मी त्यांचे इडली, ऑर्किड व मी हे वाचले होते. खरेच या माणसाचे किती आणि कसे कौतुक करावे तेच कळत नाही. होटल व्यावसायिक,पर्यावरणप्रेमी आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्वाबरोबरच मातृ-पितृभक्त विट्ठल अशी नवीन ओळख आणि असाध्य ते साध्य पर्यंतचा त्यांच्या जिद्दीला सलाम करावासा वाटतो. त्यांच्या वैयक्तिक जीवनातील केलेल्या संकटावर केलेली मात  असे थोडक्यात सांगता येईल.

          आधुनिक श्रावण बाळ किंवा मातृभक्त विट्ठ्ल का म्हणावेसे वाटते ते तुम्हाला पुस्तक वाचल्यावरच लक्षात येईल. पार्किसन्स, डिम्नेशिया आणि अल्मायझर या तिन्ही रोगांनी ग्रस्त अशा आईला त्यांनी जिद्दीने बरे करुन दाखविले ते कसे याचे विश्लेषण म्हणजे हे पुस्तक होय. मातेची ओढ तर आहेच पण ज्या कारणांनी ह रोग जडतो आणि डॉक्टरांनी याच्यावर काहीही उपाय नाही असे सांगितल्यावर एखादा हातपायच गाळून बसला असता. हाच तर फरक यशस्वी आणि सामान्य माणसांमध्ये असतो ना ! अथक प्रयत्न, रोगाची विषदता आणि आईला यातून बाहेर काढण्याची जिद्दीला काय म्हणावे तेच कळत नाही. 85 वर्षाच्या आईला 2 वर्षे सतत सोबत राहून (स्वत: आजोबा असताना), कुटूंबाची साथ मात्र परिस्थीतीमूळे आलेल्या रोगाला पळवून लावून ,समज-गैरसमजाला फाटा देऊन स्वत: वैयक्तिक व व्यावसायिक व्यवधाने सांभाळून हे शिवधनुष्य पेलणे तसे सोपे नव्हते. एखादा हात वर करु शकला असता (भाऊ,बहिणींने केलेच की) पण नाही जबाबदारी घेणारा कसाही घेतोच हे या प्रकरणावरुन दिसून येते.

            आज आई-वडिलांना कस्पटासमान वागवणा-या मुलांना तर ही चांगलीच चपराक आहे असे म्हणावेसे वाटते. हे पुस्तक खरेच आजच्या तरुण पिढीने सुद्धा वाचले पाहिजे असे आहे. आयुष्यातल्या दु:खद घटना लक्षात राहतात पण दैंनंदिन घटना विसरायला लावणा-या या आजाराला डिम्नेशिया असे म्हणतात. अशा परिस्थितीत आईला पुर्वस्थितीत आणून सर्व-साधारण जगायला शिकविणे, तिचा आत्मसम्मान तिला पुन्हा मिळवून देणे आणि एक मुलगा म्हणून जे काही करता येणे शक्य आहे ते ते सर्व करणे तेही स्वत:चे सगळे व्याप सांभाळुन. खरेच धन्य ती माता आणि धन्य तो पुत्र! योग्यवेळी योग्य त्या व्यक्तीला वेळ देणे, संयम बाळगणे, सकारत्मक दृष्टिकोन बाळगून दुस-याचाही वाढविणे हे किती कठिण होते ते प्रत्येक घटनेवरुन, प्रसंगानुरुप त्यांनी सांगितले आहे. जगापुढे एक आदर्श मुलगा तर आहेच पण आजारपण का होते आणि त्यावर आपण कसे मात करु शकतो याचाही परामर्ष त्यांनी घेतलेला दिसून येतो.

             मुळात हा डिम्नेशिया  आजार का व कशामुळे होतो याचा सखोल अभ्यास करुन त्याप्रमाणे आपली योजना आखणे, प्रसंगी आजारी व्यक्तीलाही त्यात आपलेसे करुन त्यांचे सहकार्य मिळवूण उपचारात सामील करुन घेणे आणि रोग वाढू नये किंवा समूळ नष्ट व्हावा या हेतुने त्यांनी दिलेला निकराचा लढा आणि कधी कधी येणारी निराशा यावरही मात करुन आईला मात्र सतत वेगळे वेगळ्या प्रसंगाने, हसत-खेळत कुठेही चिडचिड न करता शांतपणे 2 वर्षे घालविणे हे खायचे काम नाही. क्वीन एलिझाबेथ असे बहुमानाने बोलाविणारा आणि प्रसंग़ी तसेच वागायला लावणारा विठ्ठ्ल मातृभक्तीत पुराणातल्या पुंडलिकापेक्षा कांकणभर जास्तच आवडून जातो आणि डोळ्यात पाणी येते जेव्हा आई विचारते तुझ्या पुस्तकाचे प्रकाशन करायला कधी जायचे?

               असाध्य ते साध्य" करतानाचा प्रवास खरेतर अवर्णनीय आहे पण तरी कुठेही स्वत:चा मोठेपणा न घेता आईलाच केंद्रस्थानी मानून लिहिलेले पुस्तक खरे तर कॉलेजात अभ्यासाला किंवा शाळेत वाचून दाखवावेसे असेच आहे. काही प्रसंगात तर विट्ठल मोठा होतो आणि आई लहान होते तेव्हा अक्षरश: मन गहिवरुन येते. तशा आईला घेऊन नंतर विट्ठल प्रवासही करुन येतो आणि पार्टीलाही नेणारा विट्ठल म्हणूनच आधुनिक युगातला पुंडलिक वाटतो. आधी केले मग सांगितले तसे वरील उद्गार त्यांचे जास्त मनाला भावतात व आईचे संस्कारही यामागे दर्शवितात. गरज पडल्यास असेच विट्ठल घडोत ही परमेश्वरचरणी प्रार्थना. तसेच मुलगा किती आज्ञाधारक/प्रेमळ व जिद्दी होता/आहे आणि आई आधी कशी होती व नंतर कशी झाली, का झाली अशा अनेक प्रश्नांवरुन / प्रसंगावरुन लक्षात येते. आपणही विशेषत: ज्येष्ट नागरिकांनी जरूर वाचावे आणि तशी काळजीही घ्यावी हे पुस्तक सांगून जाते म्हणुनच नक्की संगृही असावे असे वाटते. 

Comments

  1. सुंदर लेख गीताताई

    ReplyDelete
  2. पुराणातील श्रावण बाळासारखा विठ्ठल 👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyawad 🙏
      Nav lihile aste tar!👍

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव