“!! पुरुषपण भारी देवा !!
नुकताच “ बाईपण भारी देवा” हा चित्रपट बघण्यात आला. या चित्रपटाबद्दल जबरदस्त स्वागत, प्रसिद्धी आणि कोणते कोणते रेकोर्ड मोडल्याचा दावा करण्यात आला. “स्त्री” या विषयाला आपोआपच सहानुभुती मिळते हे आपण “ माहेरची साडी “ ते आताच्या अनेक मालिका,नाटक आणि चित्रपटातून बघत आलोच आहोत. चित्रपट प्रदर्शना निमित्त आलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्याची प्रतिक्रिया मात्र विचार करण्यासारखी आहे. “पुरुष काय वेदनाविरहित/समस्याविरहितच असतो का?” पण तो त्याचे भांडवल करीत नाही किंवा काही सहानुभूती मिळावी अशी त्याची अपेक्षाही नसते”. हे खरेही आहे आणि नक्कीच याही गोष्टीचा विचार झाला पाहिजे. वास्तविक कोणाच्या वैयक्तिक जीवनात डोकावण्याचा कोणालाच अधिकार नसतो आणि एक स्त्री म्हणून या विधानाचा मला राग आला पाहिजे असेही नाही. काही वेळा सत्य कधी कधी वेगळेच असते. प्रातिनिधीक समस्या ज्या काही दाखविल्या जातात त्या ख-याच तेवढ्या कठिण असतात का हो? त्यावर उपाय शोधून काही मार्ग नक्कीच काढता येऊ शकतो ना? शिक्षण, योजनांचे पाठबळ, कायद्याचे संरक्षण, आरक्षण, आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक जागृती यामूळे आणि ती स्वत: आता सक्षम होऊ लागली आहे. ना कोणतेही समाधान शोधायला. किती दिवस अबला म्हणून जगाची मदत घ्यायची/सहानुभूती मिळवायची सबला झाल्यावर?
मला एक यानिमित्त एक प्रसंग आठवतो. कामानिमित्त ब-याच वेळा माझे बाहेर जाणे
व्हायचे( व्याप-यांना भेटी द्याव्या लागायच्या) आणि काम जिकीरीचे असे. त्यावेळी एका वयस्कर गृहस्थाने
( सुमारे 15 वर्षापुर्वी तेही मुंबईत) मला विचारले, तुम्ही हे काम नाकारु शकत नाही
का? मला कळले नाही, मी विचारले का? तर ते म्हणाले”
जीवाची भिती शिवाय एक स्त्री म्हणून” मी म्हटले जे काम पुरुष करु शकतो, तेवढाच पगार मलाही
मिळतो मग काम का नाकारायचे? केवळ एक स्त्री म्हणुन लहानपणापासून आमच्या घरी भाऊ, बहिण
असा भेदभाव कधीच झाला नाही मग आता कशाला? लहान असल्यापासून सगळे आर्थिक व्यवहार, बाजार-हाट,
एकटी फिरणे हे सगळे मी करत आले त्यावेळी कुणी असे म्हटले नाही. आता 40 नंतर हा प्रश्न
मला अगदीच गैर-वाजवी आणि किंवा अनाठायी वाटला. तसेच एकदा एका भाषणात (कार्यालयाच्या)
असे ऐकले की, काही झाले की, स्त्रिया लगेच रडतात आणि सहानुभूती मिळवतात. तेव्हापासुन
कानाला खडा लावला, काहीही आणि कितीही वाईट वाटले तरी डोळ्यातुन पाणी अजिबात काढायचे
नाही. (निदान कार्यालयात तरी)
“ पुरुषपण भारी
देवा” चांगल्या/जबाबदार
पुरुषांना उद्देशून आहे. काही समस्या पुरुषच निर्माण करित असतो म्हणूनसुद्धा! आजुबाजूची
परिस्थिती, शिक्षण, संस्कार आणि वृत्ती हे पुरुषपण बहरायला मदतच करीत असते. पुर्वी
कसे लढाया, शेती, व्यवसाय यात पुरुष एकहाती व्यस्त असायचा. बहुतेक पिढिजात किंवा स्व-कर्तत्वावर
तो अधिकार गाजवित असे. स्त्रिया एकहाती घर सांभाळत असत. एका अर्थी श्रम-विभागणी आणि
त्याची आपोआप कामाची जबाबदारीची जाणीव एकमेकांना असे. संयुक्त कुटुंबात हे वेगळे शिकवायची
गरजही नसे. आता विभक्त कुटुंबात पुरुष थोडा विभागला जातो. नोकरी, करियर, घर, मुले आणि
संसार असा. त्यात स्त्रियाही नोक-या करायला लागल्यात त्यामुळे दुहेरी जबाबदारी त्यांच्यावरही
असते, अर्थात हे मानण्यावर असते. ”बाहेर
नोकरी कर,घरी आल्यावर पण सर्व कामे कर”
असे एकतर्फी झाल्यावर संघर्षाला सुरुवात होते. समजून सांगायला, ऐकायला कोणी घरात मोठे
माणूस नसते आणि असले तरी ऐकायची तयारी हवी ना! मणीपूरसारख्या घटना अजूनही अनेक ठिकाणीनघडतात
ते या मानसिकतेमूळेच. याला कुठे तरी खतपाणी
घरा-घरातुन, आंतर्जाल, नको ते साहित्य, चित्रपट, सामाजिक माध्यमे घालीत असतातच. आर्थिक
उन्नती सगळ्यांची झाली पण सामाजिक उन्नती कशी होणार ? त्यासाठी समानता सगळीकडेच असली
पाहिजे ना! अबलाची सबला झाली पण पुरुषार्थ कशात आहे हे शिकविले जाते का? ना शाळेत,
घरात ना आजुबाजुचे वातावरण ज्यामुळे आपले हक्क आणि कर्तव्याची जाणीव सगळ्यांनाच असली
पाहिजे. काहीही/केव्हाही/कसेही खाणे-पिणे/वागणे, बेधुंद स्वातंत्र्य, बिनधास्तपणा आणि
जरब दाखवायची खुमखुमी हे सगळे अत्याचार करायला भाग पाडते. योगा, शारीरिक व मानसिक मशागत
आणि पालक, शिक्षकांचे, कायद्याचे नियंत्रण असल्यास कोणताही अनाचार कधीच होणार नाही
आणि कुणी निष्पापाचा बळीही जाणार नाही.
यासाठी कोणते प्रयत्न केले जातात? बाईसाठी लढणारे पुरुष असतात पण पुरुषासाठी लढणारी एक तरी बाई असते का? पुरुषांवरसुद्धा अत्याचार होतात, प्रमाण कमी असेल पण नाहीच असे नाही. याशिवाय पुरुषांचे रडणे, मुळमुळीत असणे, नाजूक बोलणे ह्या गोष्टींवरसुद्धा लगेच ताशेरे ओढले जातात. का त्यांना भावना नसतात? साने-गुरुजींसारखे, विनोबाजींसारखे माणसांनी काय इतिहास घडविला नाही? 22 व्या शतकातसुद्धा ठराविक अपेक्षा बायकांकडून, तशाच पुरुषांकडूनही गृहित धरल्या जातात. एखादा/एखादी अपवाद असू शकतो हे मान्यच होऊ शकत नाही. एखादा अत्याचार होतो तेव्हा तो “ का झाला यापेक्षा झाला, झाला ” म्हणून नुसता तात्पुरता आरडाओरड होते नंतर शांत होते सगळे. याचा विपरीत परिणामही कुठेतरी पुरुषांवर होत असतो. कधी कधी याचा गैरफायदाही घेतला जातो. ”गरीब बिच्चारे पुरुष” अशी सहानुभुती मिळवणारेही काही कमी नसतात. बायकोसमोर आपले काही चालतच नाही असे भाव दर्शविणारेही कमी नसतात.
समानता दोन्ही पातळीवर आणल्यास नक्कीच फरक पडू शकतो. उदा. स्वयंपाक, बालसंगोपन मुलांचा सर्वांगिण विकास आणि घर चालविणे परिस्थितीनुसार एकमेकांना समजुन घेऊन तडजोड केल्यास नक्कीच काहीतरी मार्ग निघू शकतो. कायम एकावरच अपेक्षा लादणे / गृहित धरणे हितावह ठरणार नाही. तसेच अंगिभूत शौर्याचा वापर कुठे करणे अपेक्षित आहे हेही पुरुषांना (लैंगिक शिक्षणाबरोबरच) लहानपणापासूनच शिकविले पाहिजे. करोनाच्यावेळी बरेचजण परिस्थीतीवर मात करुन यशस्वी झालेले आपण आजुबाजूला बघत असतोच. स्त्रिया भारी असतातच, हो पण थोडा हातभार पुरुषाचाही असला तर नक्कीच सोन्याहून पिवळे नाही का? शेवटी समतोल सगळीकडेच हवा ना! कितीही झाले आणि काहीही प्रगती झाली तरी पुरषांचे स्वातंत्र्य, पुढाकार, महिन्यातील त्रासापासून सुटका, वंशवाढीच्या वेदनेतून सुटका, बालसंगोपनाची कमी जबाबदारी, रित-भातीतून अलिप्तपणा, लाज-लज्जा याची भिती नसणे यामूळे पुरुषजन्म आजही भारी आहे. यामूळे तुम्हाला काय वाटते?भारी आहे. यामूळे तुम्हाला काय वाटते?
🙏धन्नवाद एक स्त्री पुरुषा बद्दल लिहु शकते याचे कौतुक करावे तीतके थोड़ेच यातच पुरुष पण भारी
ReplyDeleteDhanyawad,ek manus म्हणून नक्कीच विचार झाला पाहिजे.🙏
DeleteCM
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
Delete