उत्तरायण
सप्टेंबर, 2024 महिना तसाही माझ्यासाठी महत्वाचा आहेच. एकतर या महिन्यात माझा (आता जावयाचा सुद्धा) वाढदिवस (गणपतीपण) येतो आणि यावर्षी तर सेवापुर्तीचा/समाप्तीचा आनंद देणारा होता. वयाच्या 20 व्या वर्षी (दि. 1-1-87) सुरु झालेला नोकरीचा हा यज्ञ दि.30-9-24 रोजी शासनाने थांबविला/थांबला. 6.1/2 वर्षे खाजगी आणि 31 .1/4 वर्षे सरकारी अशी एकूण 37 2/3 वर्षांची सांगता दि. 30-9-24 रोजी झाली. या यज्ञात कशा कशाच्या आहूत्या पडल्या आणि त्यातून कोणता लाभ झाला हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरू शकेल.
हा
प्रवास (90% आयुष्य व्यापणारा) कधी लक्षवेधी ठरला तर कधी आव्हानात्मक होता. अगणित व्यक्ती, स्वभाव, वृत्तींचे वेगवेगळे अनुभव
माझे आयुष्य समृद्ध करुन गेल्या. त्याचे प्रतिबींब माझ्या अनेक लेखातून तुम्हाला वाचायला
मिळाले असेलच.
“शेवटचा दिन गोड व्हावा”
या हेतूने होणारी ही सार्वजनिक/सरकारी सेवा पैशाशी संबंधीत असली तरी अनेक अडथळे आणि
म.ना.से.( महाराष्ट्र वर्तुणुक नियम) बांधित “डोक्यावर कायम टांगती तलवार आणि सोन्याचा
काटेरी मुकुट धारित” अशी असते. “सरकारी सेवक” हा कायम 24 तास तत्पर आणि कर्तव्यदक्षच
असावा, अशी सर्व-सामान्य नागरिक आणि व्यापा-यांची अपेक्षा असते. तसेच कायद्याचे अद्ययावत
ज्ञान, संगणकीय ज्ञानाची कसोटी आणि कायम आकडेमोड
(पैशाची/डाटा) संबंधीत असलेली ही सेवा प्रचंड
(64 %) महसुल प्राप्त करुन देणा-या शासन यंत्रणेचा मी एक
छोटासा भाग होते याचा मला अभिमान तर होताच आणि राहणार आहे.
नियुक्तीच्या वेळीच सेवानिवृतीची तारीख ठरते
आणि शासन यंत्रणेशी बांधिलकी कायम जपणारी
(दोघांनाही, सेवेत घेणारा आणि सेवा देणारा),
लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागणारी ही सेवा कायम इतर लोकांसाठी कुतूहुलाचा विषय ठरते.
एका ठराविक साचेबद्ध, नियमातच वागणारी/अनुसरणारी कामाची पध्दत कधी कंटाळवाणी तर इतर
दुरदृष्टी ठेऊन निर्णय घेणारी हळुहळू अंगवळणी पडत जाते. खाजगी नोकरीत किंवा व्यवसायात,
धंद्यात सेवानिवृत्ती ही ऐच्छीक/कधी कधी सक्तीची होते तर इथे मात्र ठराविक वयोमानानुसारच असते. सेवानिवृत्ती म्हणजे
एका मोठ्या कालखंडाचा निरोप आणि दुसया कालखंडात प्रवेश करणे होय. नवीन आयुष्याला सुरवात.
यालाच “उत्तरायण” म्हणता येईल. किंवा अपेक्षांची निवृत्तीसुद्धा म्हणता येईल. निसर्गातसुद्धा
ही निवृत्ती आपसुकच येते ज्याला काहिजण पानगळ किंवा आपल्याकडे “शिशीर” ऋतू म्हणतात.
आतापर्यंतच्या प्रवासाच्या, कामाच्या, वेळेच्या दगदगिला/धावपळीला, चिंतांना स्वल्पविराम हा हवाच असतो. (खरे तर पुर्णविराम
असतो पण शक्य नसते, दुस-या नवीन चिंता असतातच)
गेल्या 32 वर्षांत होणारे कालानुरूप बदल, कार्यालयीन बदल, वरिष्ट-कनिष्ट असे एकुणच वातावरण बदलत गेले. तरी मला माझे कार्यालय खुप आवडायचे. खेळीमेळीचे वातावरण, हवेशीर उंच व मोठी इमारत, मिळालेल्या मित्र-मैत्रीणी, सहकारी, एकमेकांच्या सुख-दु:खात सामिल होणारे, वेळीच मदत करणारे, एकमेकांना सांभाळून घेणारे, सहाय्यक शिवाय मदतनीस अगदी खाऊ, कपडे आणि पुस्तके घेऊन येणारे विक्रेतेसुद्धा (नोंदित) दैंनंदिन आयुष्य सुखकारक ठरवितात. कार्यालयीन कामकाज यशस्वी करणारा प्रत्येक घटक हा अविभाज्यच असतो. संपुर्ण महाराष्ट्राच्या कक्षेत फिरणारे कामकाज, प्रसंगी, आणीबाणीत, निवडणूकीत अगदी करोनासारख्या भयंकर संकटातसुद्धा भरीव योगदान देणारे आणि प्रसंगी जीवावर बेतणा-या प्रसंगातसुद्धा न डगमगणारे अनेक चेहरे अजुनही स्मरणात आहेत आणि कायमच राह्तील. खंत एकाच गोष्टीची आहे की, लाल-फीत, सेवेचे मोल (हवे तसे ) होत नाही. अशा या सेवेतून दिलेल्या निरोपाला आणि जीवनाच्या उत्तरायणाला दिलेल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद नक्कीच मला/आम्हा सर्वांना यश्वस्वीपणे तारुन नेतील व “शेवटचा दिन गोड व्हावा” या इच्छेसह/प्रार्थनेसह आता हा लेख इथेच थांबविते. कळावे, लोभ असाच राहावा.

Comments
Post a Comment