अज्ञेयवादी (नास्तिक)
हा शद्ब मी पहिल्यांदा ऐकला तेव्हा मला मोठी गंमत वाटली. त्याचा अर्थ कळल्यावर साधारणपणे लक्षात आले की, नास्तिक कि आस्तिक हा जुनाच वाद नव्याने होऊ घातला. हे कुणी सहसा कबूल करत नाही की, मी नास्तिक आहे, मात्र त्यांचा विरोध / आक्षेप केवळ देवधर्म, कुळाचार किंवा पैसे खर्च करण्यावर असतो. सरळ-सरळ ते दुस-यांना आवाहन करीत असतात की, दाखवा मला कुठे आहे तुमचा देव? किंवा अमुक एक वृत केले म्हणून हे काम झाले असे कसे असू शकेल? किंवा देवळात / भटजीला पैसे दिले की तुम्हाला काय देवाकडून (ओटीपी) /पावती येते का? कलियुगात हे असेच प्रश्न येणार पण दुसरीकडे देवळासमोरच्या रांगा काय दर्शवितात? देवळात/ साईबाबांना/ लालबागच्या राजाला सोने-नाणे अर्पाण करणारे भाविक समजायचे की व्यावाहरीक दृष्टिकोन समजायचा?
हिंदू समाजातच मुर्तीपुजा किंवा मुर्त स्वरुपात देवाला मानावे असे सांगण्यात आलेले आहे त्याचे कारणही हेच असावे. त्याशिवाय सर्वसाधारण माणूस निसर्गावर, दैवावर किंवा आपलया कर्मावर विश्वास ठेवणार नाही किंवा पाप लागेल ही भीती असल्याशिवाय चांगले कर्म त्याच्याकडून होणार नाही केवळ या हेतुनेच वेगवेगळे देवांचे अस्तित्व निर्माण करण्यांत आले असावे असे माझे मत आहे. ते मानणे किंवा न मानणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरी दुस-यांना (जे मानतात त्यांना) त्यावरुन कमी लेखू नये एवढेच माझे मत आहे. शेवटी श्रद्धा ही माणसाला कुठेतरी तारुन नेत असते. कुणी आभाळात बघतो, कुणी दोन हात जोडून नमस्कार स्वत:च्या हदयाला लावतो, कुणी कपाळाला हात लावतो असे अनेक प्रकारे त्याचे मन तो शांत करीत असतो.
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात आपण एकीकडे मंगळावर जात आहोत तर दुसरीकडे अजुनही “करवा चौथ”/ संकष्टी चतुर्थीला चंद्राला बघून, पुजा करुन उपवास सोडणारे अनेकजण आहेत. हे करु नये असे माझे मुळीच मत नाही. मग जन्म मृत्यूवर आपण अजून का नियंत्रण करु शकलो नाही? निसर्गावर मात करु शकलो का? प्रयत्न जरूर करीत आहोत पण यश आले काहो? अनैसर्गिक मृत्यूवर नियंत्रण आणु शकलो का? सगळे काही असूनही एक काहीतरी “कमी” प्रत्येकाला देवाने दिलेली असते. रोगराईवर आपण पुर्णपणे नियंत्रण आणु शकलो? गरिबी कमी करु शकलो? उपासमार थांबली का? सगळे प्रश्न, समस्या आणि त्यावर उपाय सापडलेत का आपल्याला? मग हा हातचा एक्का का राखून ठेवला जातो? कोण राखतो? का राखतो? या प्रश्नाची उत्तरे आहेत आताच्या एआय मॉडेलकडे?/ गुगलकडे? हवामान अंदाजाप्रमाणे निसर्गाची आखीव- रेखीव मांडणी करता येईल आपल्याला?
करोना, 26 जुलै,”केदारनाथ”चे/ डोंगरकड्याचे भु:स्खलन रोखता येईल लगेच? पुर,पाऊस आणि थंडी किंवा उष्णता थांबवू शकाल? खाण अपघात, बस / ट्रेन अपघात रोखू शकाल? एवढेच कशाला आपले शरीर, बुद्धी, मन आणि हदयाचा अंदाज बांधता येईल का? त्याचे मोजमाप किंवा कोणते व कसे कोण वागू शकेल याचा तरी अंदाज बांधता येईल का? मग जे अनिश्चित आहे त्याचा अभिमान कसला? अस्तित्वाबद्दल शंका का यावी? नाहीतर या वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तरी करावा. दुसरी मजेची गोष्ट अशी असते की, नास्तिक म्हणणारेच जास्त आस्तिक असतात हा माझा अनुभव आहे फक्त त्यांचे श्रद्धास्थाने वेगवेगळी असतात एवढेच.
साखर गोड आहे हे खाल्ल्याशिवाय कळेल का? देवाचे अस्तित्व तसे सिध्द करणे अवघड आहे, तो अनुभव असतो. श्वास, ह्दयाचे ठोके, हवा, वातावरण हे दृष्य स्वरुपात दाखविता येईल का? काही गोष्टी मोजता येतात का हो? समुद्राच्या लाटा, विजेचा कडकडाट आणि हवेतली आर्दता अशा अनेक गोष्टी आहेत त्याची उत्तरे अजून मिळायची आहेत तेव्हा आपण आहे ते स्विकारुन आपापले भले करुन घेणे आणि देणे एवढेच आपण करु शकतो. कोणती तरी अज्ञात शक्ती आहे जिच्यावर आपण अद्याप आपण अवलंबून आहोत असे नाही वाटत?
संकटात बरोबर देवाला आठवणारेही/ दोष देणारे महाभाग कमी नाहीत. बाय द वे, देवाचे अस्तित्व मानले तर आई-वडिलसुद्धा “देव” होऊ शकतात कारण त्यांना तर आपण बघू शकतो, तेच नसते तर आपला जन्म कसा झाला असता ?

माझ्या सासरची मंडळी सर्व नास्तिक आहेत आजेसासरे आजीच्या सांगण्यावरून देवपूजा करायचे पण मनापासून पूजा कधीच केली नाही सासरे पण थोडं थोडं करायचे मिस्टर आणि मुलगा पण करतात पण जेवढ्यास तेवढे एकंदरीत विश्वास हा कमीच . काहीतरी मोठे संकट आले तर देवासमोर उभं राहायचं
ReplyDeleteDhanyawad,nav kalale aste tar!🙏
Deleteअर्थात हे मी माझे वैयक्तिक सांगितले मला मात्र त्याची छान प्रचिती आलेली आहे मला वाटते मी आस्तिक आहे
ReplyDeleteDhanyawad,nav lihile aste tar!🙏❤️
Delete